Search This Blog

Wednesday, 26 September 2018

जलयुक्त शिवार प्रसिध्दी अभियानासाठी पुरस्कार योजना प्रस्ताव सादर करण्यास 20 ऑक्टोंबर पर्यंत मुदत वाढ

चंद्रपूर, दि.24 सप्टेंबर  राज्य शासनाच्या महत्वाकांक्षी जलयुक्त शिवार अभियानात उत्कृष्ट योगदान देणाऱ्या पत्रकारांना पुरस्कार देण्यात येणार आहे. जलयुक्त शिवार अभियानाची प्रचार व प्रसिद्धी  तसेच जनजागृती केली आहे. अशा पत्रकारांच्या प्रवेशिका 20 ऑक्टोंबर 2018 पर्यंत जिल्हा माहिती अधिकारी यांच्याकडे स्विकारण्यात येणार आहे.
जलयुक्त शिवार अभियानात उत्कृष्ट योगदान देणाऱ्या पत्रकारांसाठी सुरु करण्यात आलेल्या पुरस्कारासाठी जिल्हास्तरीय विभागीय स्तरीय तसेच राज्यस्तरीय  पुरस्कार देण्यात येणार आहे. यामध्ये जिल्हास्तरावर पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर जलमित्र पुरस्कार राहणार असून यामध्ये प्रथम पुरस्कार 31 हजारद्वितीय पुरस्कार 21 हजार  व तृतीय 15 हजार बक्षीसाची रक्कम राहणार आहे. यासाठी जिल्हास्तरीय समितीकडे  प्रवेशिका सादर करणे आवश्यक आहे. या स्पर्धेसाठी बातमीदाराकडून 1 जानेवारी 2017 ते 31 डिसेंबर 2017 या कालावधीत प्रकाशित झालेले साहित्य संपादकाच्या शिफारशीसह तीन प्रतीत मागविण्यात येत आहे.
विभागीय पुरस्कार राजमाता जिजाऊ जलमित्र पुरस्कार या नावाने देण्यात येणार असून प्रथम पुरस्कार 50 हजारद्वितीय 35 हजार व तृतीय 25 हजार रुपये आहे. राज्यस्तरावर महात्मा ज्योतीराव फुले जलमित्र पुरस्कार या नावाने देण्यात येणार असून यामध्ये प्रथम पुरस्कार 1 लाख रुपयेद्वितीय पुरस्कार  71 हजार व तृतीय पुरस्कार 51 हजार राहणार आहे.
इलेक्ट्रॉनिक मीडियासाठी राज्यस्तरावर तीन पुरस्कार असून यामध्ये प्रथम पुरस्कार 1 लक्षद्वितीय पुरस्कार 71 हजार तर तृतीय पुरस्कार 51 हजार रुपये आहे. यासाठी राज्यस्तरावर इलेक्ट्रॉनिक मीडियामध्ये मराठी वृत्तकथा प्रसारित करणाऱ्या प्रतिनिधींना हा पुरस्कार देण्यात येणार आहे.   
                                                                000

No comments:

Post a Comment