Search This Blog

Wednesday, 5 September 2018

राष्ट्रीय चारित्र्यसंपन्न शिक्षण देण्याची गरज- देवराव भोंगळे जिल्हयातील 16 आदर्श शिक्षकांचा गौरव




चंद्रपूर, दि.5 सप्टेंबर  आज ज्या शिक्षकांना आदर्श शिक्षक पुरस्कार देवून गौरवण्यात आले आहे, अशा शिक्षकांनी आपल्या तालुक्यातील विद्यार्थ्यासमोर आदर्श निर्माण करुन चारित्र्यसंपन्न शिक्षण देण्याचा प्रयत्न करण्याची गरज असल्याचे जिल्हा परिषदेचे अध्यक्ष देवराव भोंगळे यांनी आज  कर्मवीर दादासाहेब मा.सा. कन्नमवार सभागृहामध्ये आयोजित शिक्षक दिनाच्या कार्यक्रमात बोलतांना व्यक्त केले.
            यावेळी जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी जितेंद्र पापळकर, उपाध्यक्ष तथा शिक्षण सभापती क्रिष्णा सहारे, वित्त व बांधकाम सभापती संतोष तंगडपल्लीवार, समाज कल्याण सभापती ब्रिजभूषण पाझारे, कृषी व पशुसंवर्धन सभापती अर्चना जिवतोडे, महिला व बाल कल्याण सभापती गोदावरी केंद्रे, शिक्षणाधिकारी (माध्यमिक) संजय डोर्लीकर, शिक्षणाधिकारी (प्राथमिक) दिपेंद्र लोखंडे, शिक्षण व क्रीडा समितीचे सदस्य पृथ्वीराज अवताडे, रणजित सोयाम, गोपाळा दडमल, नितू चौधरी, रोशनी खान, कल्पना पेचे, योगीता डबले, मेघा नलगे, जे.डी.पोटे आदी उपस्थित होते.
            जिल्हा परिषदेचे अध्यक्ष देवराव भोंगळे यांनी शिक्षक हा समाजाला दिशा देण्याचे काम करण्यासोबतच बालमनावर प्राथमिक शिक्षणाचे चांगले संस्कार देण्याचे कार्य करीत असल्याचे त्यांनी सांगितले. शिक्षकांनी आपल्या शाळेचे विद्यार्थी कसे पुढे जाईल आणि आपल्या तालुक्याचा, जिल्हयाचा नाव कसा पुढे येईल यावर लक्ष देवून शिक्षण दिले पाहिजे, असेही ते म्हणाले. प्रतिभा संपन्न, नितिमूल्य जोपासणारे शिक्षण देण्याची गरजही असल्याचे त्यांनी स्पष्ट केले. आता नवीन टेक्नॉलाजी जरी आली तरी ग्रामीण भागातील शिक्षकांनी ते आत्मसात करुन विद्यार्थ्यांना ज्ञान देण्याचे काम शिक्षकांनी करावे असेही त्यांनी सांगितले.
            कोणत्याही  विद्यार्थ्यांमध्ये दोष नसतो आधीच्या आणि आताच्या शिक्षण पध्दतीत आमुलाग्र बदल झालेला असल्याने शिक्षकांनी विद्यार्थ्यांना चांगले गुण देण्यासाठी सतत प्रयत्न करावे, असे जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी  अधिकारी जितेंद्र पापळकर म्हणाले.  उपाध्यक्ष तथा शिक्षण सभापती क्रिष्णा सहारे यांनी आपले मनोगत व्यक्त केले. या कार्यक्रमाला राज्याचे वित्त, नियोजन व वनेमंत्री तथा पालकमंत्री ना.सुधीर मुनगंटीवार आणि केंद्रीय गृहराज्यमंत्री ना.हंसराज अहिर यांनी पाठविलेले शुभेच्छा संदेशही  वाचून दाखविण्यात आला.
 ज्या शिक्षकांचा आज आदर्श शिक्षक पुरस्कार देवून सन्मान करण्यात आला त्यामध्ये दिलीप पायपरे, हेमंत वाग्दरकर, दिपलक्ष्मी म. कापकर, अर्चना नवघडे, जिवनदास डोंगरे, गजेंद्र जवंजाळ, प्रमोद तुपट,  विठ्ठल वनसिंगे, कमलेश सावसाकडे, गंगाधर गायकवाड,  अरूण  झगडकर, प्रमिला डाहुले,  वैशाली तुम्मे,  विष्णु बडे, चंदा धारणे,  नरेश  बोभाटे  यांचा समावेश आहे.  
या कार्यक्रमाचे प्रास्ताविक शिक्षणाधिकारी (प्राथमिक) दिपेंद्र लोखंडे यांनी तर संचालन विस्तार अधिकारी अर्पण माशीरकर यांनी केले. आभार प्रदर्शन विस्तार अधिकारी (प्राथमिक) अरुण काकडे  यांनी केले. यावेळी मोठया संख्येने शिक्षक वर्ग उपस्थित होते.
                                                            000

No comments:

Post a Comment