Search This Blog

Wednesday, 26 September 2018

चंद्रपूरच्या ज्युबली हायस्कूलमध्ये गावाकडच्या गुणवंतांचा बोलबाला लोकराज्यवर आयोजित स्पर्धा परीक्षेत ग्रामीण विद्यार्थ्यांनी रोवला झेंडा



चंद्रपूर दि.25 सप्टेंबर  महाराष्ट्राच्या अर्थमंत्र्यांना घडविणाऱ्या चंद्रपूरच्या ज्युबिली हायस्कूलने आपली गुणग्राहकता सुरूच ठेवली आहे. या शाळेमध्ये आजही गरीब परिस्थितीतून वाटचाल करणाऱ्या ग्रामीण भागातल्या गुणवान विद्यार्थ्यांची चलती आहे. नव्हे या शाळेने अशा गुणवान विद्यार्थ्यांना आपल्या मायेची उब दिली आहे. नुकत्याच झालेल्या एका सामान्य ज्ञान स्पर्धेत या शाळेतील ब्रह्मपुरी, नागभीड, केळझर येथील गरीब विद्यार्थ्यांनी आपल्या गुणवत्तेचा ठसा उमटवला आहे.
महाराष्ट्र शासनातर्फे माहिती व जनसंपर्क महासंचालनालय गेल्या महिन्याभरात लोकराज्य वाचक अभियान राबवित आहेत. स्पर्धा परीक्षांमध्ये आपले भवितव्य घडविणाऱ्यांच्या विश्वात लोकराज्य या पुस्तकाला अनन्यसाधारण महत्त्व आहे. सप्टेबर 2018लोकराज्य अंकावर ज्युबिली हायस्कूलमध्ये सामान्य ज्ञान स्पर्धा घेण्यात आली. हल्ली मुलांचे वाचन कमी झाले आहे. अशी ओरड होत असताना 200 विद्यार्थ्यांना लोकराज्यचे वाचन करण्याचे सांगण्यात आले. दोन दिवसानंतर नववी ते बारावी या वयोगटातील विद्यार्थ्यांचा सामान्य ज्ञान तपासणारी परीक्षा घेण्यात आली. या परीक्षेमध्ये ब्रह्मपरी येथील वैष्णवी सोनटक्के तिसऱ्या क्रमांकाची मानकरी ठरली. नागभीड येथील अंजली खोबरागडे दुसऱ्या क्रमांकावर राहिली आणि केळझर येथील देवानंद भेंडारे हा पहिल्या क्रमांकावर आला. विशेष म्हणजे ही सर्व मुले आपल्या नातेवाईकांकडे राहून ज्युबिली हायस्कूल मध्ये शिकत आहेत. गेल्या अनेक वर्षापासून विद्यार्थी घडवणाऱ्या हायस्कूलने  विद्यादानाचे काम मात्र तन्मयतेने सुरू आहे. या सर्व मुलांना 90 टक्यांपेक्षा अधिक गुण मिळाले आहेत. तर त्यांच्या खालोखाल तेजस्विनी दुपारे, अखिलेश पडवेकर, प्रज्येती रामटेके, कादंबरी काळेरोशनी सोनावणेकरण पोले यांनीही स्पर्धत मुसंडी मारली आहे.
         
शाळेचे प्राचार्य रवींद काळबांडे यांच्या मार्गदर्शनात मंजुषा मोरेपुष्पा कोटेवार, टि.के. खान, हेमावती धनेवार, व्ही.एम. तोडासे संगीता घोडेस्वार, कोमल वालदे, वैशाली परसोडकर यांनी जिल्हा माहिती अधिकारी कार्यालयासोबत लोकराज्य प्रश्न मंजुषा कार्यक्रमाला संपन्न केले.
                                                00000

No comments:

Post a Comment