Search This Blog

Friday 30 March 2018

येत्या १० महिन्यात पायाभूत सुविधांनी जिवती -कोरपना तालुका परिपूर्ण होईल - ना.सुधीर मुनगंटीवार




कोरपना पंचायत समितीच्या नव्या इमारतीचे लोकार्पण, 
फर्निचर व अन्य सुधारणांसाठी पालकमंत्र्यांकडून अतिरिक्त 
१.४० कोटी 

चंद्रपूर दि. 30मार्च :
  जिवती -कोरपना या मागास भागातील शिक्षण आरोग्य पिण्याचे पाणी या पायाभूत सुविधा वेगाने पूर्ण होत आहे . पुढच्या १० महिन्यात या क्षेत्रातील सर्व प्रलंबित कामे पूर्ण केली जातील . यासाठी मुख्य कार्यकारी अधिकारी यांच्या नेतृत्वात कृती आराखडा तयार करा असे आवाहन राज्याचे वित्तनियोजन व वने मंत्री तथा चंद्रपूर जिल्हयाचे  पालकमंत्री सुधीर मुनगंटीवार यांनी केले. त्यांच्याहस्ते आज 30 मार्चला कोरपना पंचायत समितीच्या नव्या इमारतीचे सायंकाळी ६ वाजता लोकार्पण झाले. यावेळी फर्निचर व अन्य बाबींसाठी १.४० कोटीचा अतिरिक्त निधी उपलब्ध करण्याची घोषणा त्यांनी केली. या उद्घाटन सोहळ्याला पालकमंत्री सुधीर मुनगंटीवार यांच्यासह राजुरा मतदार संघाचे आमदार ॲङ संजय धोटे वनविकास महामंडळाचे अध्यक्ष चंदनसिंग चंदेलबल्लारपूरचे नगराध्यक्ष हरीष शर्मा,जि.प.चे,मुख्यकार्यकारी अधिकारी जितेंद्र पापळकरबांधकाम सभापती संतोष तंगडपल्लीवारसमाजकल्याण सभापती ब्रिजभूषण पाझारेमहिला व  बालकल्याण सभापती गोंदावरी केंद्रेकारेपना पं.सं.सभापती  शाम रणदिवे आदि उपस्थित होते.
हेक्टर क्षेत्रामाध्ये जुन्या पंचायत समिती आवारात हे नवीन पंचायत समिती संकुल उभारण्यात आले.  2 कोटी  41 लक्ष रूपयाच्या या इमारतीमध्ये अद्यावत कार्यालय उभे झाले आहे. यापूर्वी या ठिकाणी पंचायत समितीचे कामकाज प्रशिक्षण भवनात चालत होते. पालकमंत्री सुधीर मुनगंटीवार यांनी वित्तमंत्री झाल्यानंतर या इमारतीचा निधी मंजूर केला. २ बर्षात ही इमारत तयार झाली .यावेळी बोलताना त्यांनी आमदार अॅड.संजय धोटे यांच्या नेतृत्वात या मतदार संघात सुरु असलेल्या विकास कामा बद्दल समाधान व्यक्त केले. जिल्हयात जिवती असो वा कोरपना पोभुर्णा असो वा नागभीड जिल्हयाचा पालकमंत्री म्हणून समतोल विकासाचा आपला संकल्प असल्याचे त्यांनी सांगितले . जिवती कोरपना भागातील प्राथमिक आरोग्य केंद्र शाळा आणि कोरपना गडचांदूर  येथील बसस्टँड व अन्य प्रगतीपथावरील कामे पुढच्या १० महिन्यात पूर्ण झाली असेल असे स्पष्ट केले .पंचायत समितीच्या नव्या इमारतीतून जनसेवेचे कार्य पूर्णत्वास जावे अशा शुभेच्छा त्यांनी दिल्या . या मतदार संघाचे आमदार धोटे यांनी पालकमंत्र्यांनी राजुरा विमानतळ जिवतीतील १०० खाटांचे रुग्णालय पकडी गुड्डम पर्यटन स्थळासाठी निधी कोरपनागड चांदूर बसस्टँडला मान्यता दिल्याबद्दल आभार मानले . हा भाग विकासाच्या बाबतीत आघाडीवर राहील ही पालकमंत्र्यांची भूमिका काम करायला बळ देते असे सांगितले.
या इमारतीच्या लोकार्पण सोहळया सोबतच सरपंच मेळाव्याचे ही आयोजन करण्यात आले होते. यावेळी तालुका स्मार्ट ग्राम म्हणून 2016-17 चा प्रथम पुरस्कार ग्रामपंचायत कुकडसाथला देण्यात आला. सरपंच वंदना चवलेग्रामसेवक भुजंगराव सुर्यवंशी यांनी पुरस्कार स्वीकारला. 2017-18 चा सरपंच पुरस्कार मंगलदास गेडामग्रामविकास अधिकारी अरूण वाकुळकर यांना देण्यात आला . आदर्श ग्रामसेवक पुरस्कार नितीन नरड यांना देण्यात आला तर वडगावचे सरपंच मोहपत मडावी यांचाही सत्कार करण्यात आला. या सरपंच मेळाव्याला सभापती शामजी रणदिवेउपसभापती संभाशिवजी कोवेगटविकास अधिकारी डॉ. संदिप धोन्सीकर,धनंजय साळवे यांनी मार्गदर्शन केले. या कार्यक्रमाचे प्रास्ताविक कार्यकारी अभियंता नरेंद्र बुरांडे यांनी केला. मनोगत सभापती शामजी रणदिवेउपसभापती संभाशिवजी कोवे यांनी केले .कोरपना तालुक्याला विविध योजनेतून अधिक प्रतिनिधीत्व देण्याची मागणी केली . कार्यक्रमाचे संचालन धनंजय साळवे यांनी केले .
000000

Tuesday 27 March 2018

रोजगार हमी योजनेच्या प्रचार रथाला चंद्रपूर जिल्हयात प्रारंभ महसूल विभागाच्या अनेक योजनांचा करणार प्रचार


चंद्रपूर, दि.26 मार्च- केंद्र व राज्य शासनाच्या गावपातळीवरील विविध सार्वजनिक स्वरुपाच्या योजना सामान्य जनतेपर्यंत पोहचाव्यात, या योजनांची माहिती मिळावी आणि योजनेबद्दल जनतेमध्ये चर्चा व्हावी, यासाठी रोजगार हमी योजनेचे दायित्व असणा-या महाराष्ट्र शासनाच्या नियोजन विभागामार्फत प्रत्येक जिल्हयात प्रसिध्दी रथाची सुरुवात करण्यात आली आहे. चंद्रपूर जिल्हा प्रशासनाने देखील या योजनेला सुरुवात केली आहे. या चित्ररथाव्दारे जनतेला माहिती होणा-या योजनांचा लाभ घेण्याचे आवाहन करण्यात आले आहे.
            निवासी उपजिल्हाधिकारी वैभव नावडकर, उपजिल्हाधिकारी (रोहयोकल्पना निळ यांनी या संदर्भात तयार करण्यात आलेल्या चित्ररथाला नुकतीच हिरवी झेंडी दाखवून प्रारंभ केला आहे. समृध्द महाराष्ट्र जनकल्याण योजनेअंतर्गत येणारे गावअंतर्गत रस्ते, गाय, म्हैस यांच्याकरीता गोठयात पक्के तळे, अमृत कुंठ शेततळे, अहिल्यादेवी सिंचन विहीरी, कल्पवृक्ष फळबाग लागवड, ग्राम सबलीकरणाची समृध्द ग्राम योजना, स्मशान भूमी बांधकाम, क्रिडागंण, अंगणवाडी, निर्मल शौचालय, निर्मल शोच खड्डे, समृध्द गाव तलाव, अंकुर रोपवाटीका, भूसंजीवनी कंपोष्ट, भूसंजीवनी गांडूळ खत निर्मिती, अशा कितीतरी योजनांची माहिती या चित्ररथावर करण्यात आली आहे. महात्मा गांधी ग्रामीण रोजगार हमी योजनेअंतर्गत सामान्य जनतेला मिळालेल्या 10 अधिकाराची माहिती देखील या चित्ररथावर करण्यात आली आहे. जिल्हाभरातील जनतेने या योजनेची माहिती घेऊन प्रत्यक्षात उपयोगात येणा-या लाभाच्या योजनेबद्दल, ग्राम सेवक, तलाठी, कृषी सहाय्यक यांच्याकडून माहिती घ्यावी. तहसिल कार्यालयातून माहिती घ्यावी व शासनाच्या विविध योजनांचा लाभ घ्यावा. तसेच गावागावातील सरपंचानी या चित्ररथाचे स्वागत करुन गावक-यांना माहिती उपलब्ध करुन देण्यासाठी मदत करावी, असे आवाहन उपविभागीय अधिकारी मनोहर गव्हाळ व उपजिल्हाधिकारी रोहयो कल्पना निळ यांनी केले आहे.
            हा चित्ररथ पुढील 15 दिवस चंद्रपूर जिल्हयातील विविध गावांमध्ये प्रचारासाठी जाणार असून नागरिकांनी योजनांची माहिती घेऊन त्याचा लाभ घ्यावा, असे आवाहन जिल्हा प्रशासनाने केले आहे.
                                                                        000

अन्न सुरक्षा आर्मीचा पथदर्शी प्रकल्प चंद्रपूर व सिंधूदुर्ग जिल्हयात राबविणार


ना.सुधीर मुनगंटीवार व ना.दिपक केसरकर यांच्या उपस्थितीत शास्त्रज्ञांची चर्चा
     
          चंद्रपूर, दि.26 मार्च- सीमेवर लढणारे सैनिक तांत्रिक, यांत्रिक आणि कल्पक दृष्टीने कायम सज्ज असतात. शेतीच्या संदर्भातील आवाहने देखील अनेक प्रकारची असतात. त्यामुळे सीमेवरील सैन्याप्रमाणेच सर्व आव्हानांना पेलणारी प्रशिक्षित अन्न सुरक्षा आर्मी तयार करुन त्यांच्यामार्फत नफ्यात चालणारी शेती करण्याचा पहिला पथदर्शी प्रकल्प चंद्रपूर व सिंधूदुर्ग जिल्हयात राबविण्याची शासन तयारी करीत आहे. राज्याचे वित्त, नियोजन व वनमंत्री तथा पालकमंत्री ना.सुधीर मुनगंटीवार व वित्त राज्यमंत्री दिपक केसरकर यांनी शास्त्रज्ञानांच्या या नव्या प्रयोगाची रविवारी चंद्रपूर येथे माहिती जाणून घेतली.
चंद्रपूर येथील नियोजन भवन येथे पालकमंत्री सुधीर मुनगंटीवार यांचे अध्यक्षतेखाली व वित्त व नियोजन राज्यमंत्री दिपक केसकर यांचे प्रमुख उपस्थितीत केरळ कृषी विद्यापीठाचे त्रिसुर संशोधन केंद्रातील सेवानिवृत्त कृषिविद्या विभागाचे प्रमुख डॉ.जयकुमारन यांनी शेतीमध्ये यांत्रिकीकरणाचा वापर करुन उत्पादन वाढविण्यासाठी अन्न सुरक्षा सैन्यदलाची संकल्पना समजाऊन सांगितली. केरळमध्ये या पध्दतीचा प्रयोग करण्यात आला आहे. या संकल्पनेनुसार धानाची किंवा अन्य शेती करतांना कमी वेळ, कमी खर्च आणि मोठया क्षेत्रावरील मशागतीला गती देता येते. या संकल्पनेनुसार धानाच्या प्रत्येक 400  हेक्टर क्षेत्रामध्ये रोवणी यंत्रापासून कापणीयंत्रापर्यंत विविध यंत्रांचा वापर करण्यासाठी 50उत्साही तरुणांना निवडून त्यांना सैन्यदलामध्ये देण्यात येणा-या कडक व प्रगत प्रशिक्षणाप्रमाणे प्रशिक्षण देऊन त्यांची एक सुसज्ज तुकडी तयार करण्यात यावी, असे प्रस्तावित आहे.  ही अन्न सुरक्षा आर्मी तयार  झाल्यावर प्रत्यक्ष किमान400 हेक्टर शेतांवर जाऊन रोवणीपासून कापणी व तणीस व्यवस्थापनापर्यंत संबंधित शेतक-यांना मदत करेल. हा एक प्रशिक्षीत व्यवसाय असून या प्रशिक्षणाचा वापर ही आर्मी स्वत:च्या अर्थार्जनासोबतच अन्य शेतक-यांच्या आर्थिक परिस्थितीत सुधारणा करण्यासाठी वापरतील. यावेळी केरळमध्ये महिला सुध्दा अनेक यंत्रांचा वापर करुन शेती करीत असल्याचे प्रात्यक्षिक सादर करण्यात आले. जय जवान जय किसान या घोषणेप्रमाणे प्रशिक्षित शेतकरी जवान व प्रत्यक्ष मेहनत करणारा शेतावरील शेतकरी  या  दोघांची परस्पर पुरकता वाढवून  अन्नधान्य उत्पादन वाढीसाठी  संकल्प करण्याचा हा प्रयत्न आहे.
            सदर संकल्पना केरळ व अन्य काही ठिकाणी राबविण्यात आली आहे. या मागील अर्थकारण, व्यावसायिकता व उपयोगीता लक्षात घेऊन प्रथम काही भागात हा प्रयोग करण्याचा शास्त्राज्ञांचा सल्ला आहे. याबाबत चंद्रपूर व सिंधुदूर्ग या दोन जिल्हयामध्ये अशा पध्दतीच्या यांत्रिकीकरणाच्या शेतीला पुढाकार देता येऊ शकते काय, याबाबतची ही चाचपणी आहे. शेतीमध्ये प्रचंड मेहनतीसोबत आता कल्पकता सुध्दा महत्वाची आहे. याशिवाय श्रमाला प्रतिष्ठा आणि नफ्यातील शेती हे समीकरण प्रभावीपणे मांडणे आवश्यक आहे. त्यामुळे हा प्रकल्प आपल्या जिल्ह्यात राबविता येईल का याबाबत सदर कृषि विद्यापीठासोबत सामंजस्य करार करुन नियोजन करणेबाबतची सूचना पालकमंत्री यांनी जिल्हधिकारी यांना केली आहे. त्याचप्रमाणे चांदा ते बांदा या योजनेंतर्गत ही संकल्पना चंद्रपूर व सिंधूदुर्ग या दोन जिल्ह्यांमध्ये प्रायोगिक तत्वावर राबवून ती यशस्वी ठरल्यास पूर्ण राज्यात राबविण्यात येईल, असे राज्यमंत्री  दिपक केसरकर यांनी सूचित केले. या कार्यशाळेत जिल्हा परिषदेचे अध्यक्ष देवराव भोंगळे, जिल्हधिकारी आशुतोष सलिलमुख्य कार्यकारी अधिकारी जितेंद्र पापळकरविशेष कार्य अधिकारी श्री गावतुरेकृषि विभागआत्माचेजिल्हा ग्रामिण विकास यंत्रणावन विभाग व इतर विभागाचे वरिष्ठ अधिकारी, निवडक कृषि सखी व शेतकरी मित्र  उपस्थित होते.

                                                             0000

2515 योजनेअंतर्गत जिल्हयातील सर्व गावातील अंतर्गत रस्त्याचे काम पूर्ण करण्यात येईल - पालकमंत्री सुधीर मुनगंटीवार




पायली येथील सामाजिक सभागृहाचे लोकापर्ण व क्रांकीट रस्त्याचे भूमीपूजन

       चंद्रपूर, दि.25 मार्च- ग्राम विकास निधीमधील 2515 योजनेअंतर्गत जिल्हयात प्रत्येक गावातील अंतर्गत रस्त्यांची पूर्ण कामे करण्यात येणार असून एकाही गावातील रस्त्याचे काम अपूर्ण राहणार नाहीत, असे प्रतिपादन राज्याचे वित्त, नियोजन व वनमंत्री तथा पालकमंत्री सुधीर मुनगंटीवार यांनी पायली-भटाळी येथील सामाजिक सभागृहाचे लोकार्पण, क्रांकीट रस्त्याचे व पिण्याच्या शुध्द पाणी आरो मशीनच्या भूमीपूजन कार्यक्रमात बोलतांना व्यक्त केले.
            या कार्यक्रमास जिल्हा परिषदेचे अध्यक्ष देवराव भोंगळे, जिल्हा परिषद सदस्य वनिता आसुटकर, रोशनी अनवर खान, गौतम निमडे, सरपंच मनिषा थेरे, उपसंरपच राजकुमार रायपूरे, पंचायत समिती सभापती वंदना पिंपळशेंडे, उपसभापती चंद्रकांत धोडरे, नगरसेवक रामपाल सिंग आदी पदाधिकारी उपस्थित होते.
            वित्त, नियोजन व वनमंत्री ना.सुधीर मुनगंटीवार म्हणाले, गावांचा विकास करतांना सर्व नागरिकांना समान पायाभूत सुविधा निर्माण करुन देण्याचा आमचा माणस आहे. त्यामध्ये कसलाही भेदभाव केला जाणार नाही, अशी मी ग्वाही देतो. या सामाजिक सभागृहाचा उपयोग गावातील सर्व समाजाच्या नागरिकांनी करावा. तसेच या सभागृहाचा वापर व्यायाम शाळेसाठी करण्यात यावा, असेही ते म्हणाले. सदर भूमीपूजन करण्यात आलेली आरो मशीन येत्या तीन महिन्यात सुरु करण्यात येणार असून पिण्याचे शुध्द पाणी या आरो मशीनव्दारे सर्व नागरिकांना मिळणार आहे. जिल्हयातील नागरिकांचे आरोग्य चांगले राहावे या दृष्टीने जिल्हयातील  100 गावांना आरो मशीन उपलब्ध करुन देण्यात येणार असल्याचे त्यांनी सांगितले. 
            जिल्हयात मोठया प्रमाणात रोजगार निर्मितीचे काम सुरु असून यामध्ये चिंचपल्ली बांबू प्रशिक्षण केंद्राव्दारे महिला बचत गटांना रोजगार देण्यात आला असून पोंभूर्णा येथील कुक्कुटपालन  केंद्रातर्फे 1 हजार महिलांना काम देण्यात आले आहे. तसेच 1 हजार महिलांना शिलाई मशीनचे वाटप करण्यात येत असून या महिलांनी तयार केलेल्या कपडयांची विक्री करण्यासाठी मोठी बाजार पेठ उपलब्ध करुन देण्याकरीता आम्ही प्रयत्न करणार आहे. तसेच बल्लारपूर येथे 3 हजार युवकांना डायमंड कटिंगचे प्रशिक्षण देण्यात येत आहे. अशा प्रकारचे विविध रोजगार युक्त कामे जिल्हयात सुरु असून यामधून नागरिकांना रोजगार निर्माण करुन देण्याचे आमचे अनेक प्रयत्न सुरु आहेत.  पायली व भटाळी या गावाला डब्ल्युसिएलपासून होणा-या समस्याचे निराकरण करण्यासाठी लवकरच डब्ल्युसिएलची बैठक घेऊन त्यावर चर्चा करण्यात येईल आणि त्यामध्ये सर्व समस्यांचे निराकरण करण्यात येईल, असे  त्यांनी यावेळी स्पष्ट केले.
            या लोकार्पण कार्यक्रमाच्या अनुषंगाने रक्तदान शिबीर, संकल्प आयपीएस बहुउद्देशीय संस्थेने जनप्रबोधन कार्यक्रम आयोजित केला होता. तसेच टाटा ट्रस्टचे जिल्हा समन्वयक संदीप सुखदेवे यांनी युवकांची जबाबदारी व गाव विकासाच्या विविध योजना यावर मार्गदर्शन केले. या कार्यक्रमात केंद्र व राज्य शासनाच्या विविध लोककल्याणकारी योजनाच्या माहिती पुस्तिकेचे प्रकाशनही मान्यवरांच्या हस्ते करण्यात आले.  या कार्यक्रमाचे संचालन शुध्दोधन मेश्राम यांनी तर आभार प्रदर्शन संदेश गणवीर यांनी मानले. यावेळी मोठया संख्येने नागरिक उपस्थित होते.
                                                            0000

पिसीपिएनडीटी कायद्याची काटेकोरपणे अंमलबजावणी करा - जिल्हाधिकारी


चंद्रपूर, दि.23 मार्च- चंद्रपूर शहर महानगरपालिका व जिल्हा सामान्य रुग्णालय यांच्या संयुक्त विद्यमाने पी.सी.पी.एन.डी.टी कायद्याअंतर्गत जिल्हयातील सर्व समुचीत प्राधिकारी, सर्व सोनोग्राफी केंद्र धारक, सल्लागार समिती सदस्य व वैद्यकीय अधिकारी यांच्याकरीता 22 मार्च 2018 रोजी महानगरपालिकेच्या सभागृहात एक दिवसीय कार्यशाळेचे आयोजन करण्यात आले होते.
या कार्यशाळेचे उदघाटक म्हणून जिल्हाधिकारी आशुतोष सलिल तर अध्यक्षस्थानी मनपाच्या महापौर अंजलीताई घोटेकर होत्या. यावेळी उपमहापौर अनिल फुलझेले, मनपा आयुक्त संजय काकडे, अतिरीक्त आयुक्त भालचंद्र बेहेरे, जिल्हा शल्य चिकित्सक डॉ.उमेश नावाडे, मनपा वैद्यकीय अधिकारी अंजली आंबटकर उपस्थित होत्या. सदर कार्यशाळेस चंद्रपूर महानगरपालिका व जिल्हा सामान्य रुग्णालय चंद्रपूर यांच्या कार्यक्षेत्रातील दोनशे सभासदांनी भाग घेतला होता. त्यामध्ये पदाधिकारी, अधिकारी, सोनोग्राफी केंद्र धारक, वैद्यकीय अधिकारी, सल्लागार समिती सदस्य व इतर कर्मचारी उपस्थित होते.
यावेळी जिल्हाधिकारी तथा जिल्हा समुचीत प्राधिकारी यांनी मुलींच्या जन्माच्या बाबतीत समाजाच्या उदासीनतेवर खेद व्यक्त करुन सदर कायद्याची अंमलबजावणी करणे आपले सर्वांचे कर्तव्य असल्याचे त्यांनी सांगितले.  तसेच या कायद्यातील तरतूदीचे आपण योग्य पालन केल्यास गर्भलिंग निदान व स्त्रिभृण हत्येला आळा घालता येईल अशीही आशा त्यांनी व्यक्त करुन मुळात स्त्रीभृण हत्या विरोधात आपल्या देशात हा कायदा करण्याची गरज पडली ही दुर्देवी बाब असल्याचे त्यांनी स्पष्ट केले. पाश्चात देशात असा कुठलाही कायदा नाही कारण तेथे स्त्री व पुरुष यांच्यात भेदभाव नाही. आपल्या देशातील समाजामध्ये स्त्री-पुरुष समानतेची भावना जागृत होणे आवश्यक आहे. यामध्ये हळु हळु हा बदल निश्चित होईल, अशी आशा त्यांनी व्यक्त केली. परंतु तोवर या कायद्याची काटेकोरपणे अंमलबजावणी होणे अत्यंत आवश्यक असून या कायद्याचे उल्लंघन करणा-या कोणासही संरक्षण दिल्या जावू नये, हा अक्षम्य गुन्हा आहे. तेव्हा सर्वांनी जबाबदारीने या कायद्याची अंमलबजावणी करण्याचे आवाहन त्यांनी यावेळी सर्वांना केले.
आपल्या अध्यक्षीय भाषणात महापौर अंजली घोटेकर यांनी आज स्त्री ही प्रत्येक क्षेत्रात अग्रसेर असून देशाचे पंतप्रधान यांनी सुध्दा मुली विषयी बेटी बजाव बेटी पढाओ याची घोषणा केली असून स्त्रीला कमी लेखण्यात येऊ नये. असे त्यांनी सांगितले. या कार्यशाळेस उपस्थित असलेल्या अनेक डॉक्टर महिला आहेत. तेव्हा आपल्या लक्षात येते की, आज महिला किती पुढे गेलया आहेत. जर स्त्रीभृण हत्या टाळली तर अजून स्त्री प्रगती करेल असे त्यानी आपल्या मनोगत सांगितले.
मनपा आयुक्त तथा समुचीत प्राधिकारी संजय काकडे यांनी गर्भलिंग निदान व स्त्रीभृण हत्या हा घृणास्पद कृत्य करणा-या डॉक्टर्सनी विचार करणे आवश्यक असल्याचे ते म्हणाले. तेव्हा डॉक्टर्सनी असे कृत्य करु नये, त्यांनी मनात आणले तर हे कृत्य शत प्रतिशत थांबू शकते. तेव्हा समुचित प्राधिकारी आणि सोनोग्राफी केंद्र धारक यांनी आपआपली जबाबदारी व्यवस्तित पारपाडली तर या कायद्याची प्रभावी अंमलबजावणी होऊ शकेल असे त्यांनी सांगितले. अतिरीक्त आयुक्त भालचंद्र बेहेरे यांनीही आपले मनोगत व्यक्त केले.
या कार्यक्रमाचे संचालन वैद्यकिय अधिकारी डॉ.नयना उत्तरवार यांनी तर आभार प्रदर्शन डॉ.अंजली आंबटकर यांनी केले. या कायद्याबद्दलची माहिती मनपा विधी अधिकारी ॲड.अनिल घुले व जिल्हा विधी समुपदेशक ॲड.मंगला बोरीकर यांनी पावर पॉईट प्रसेंटेशनव्दारे सादर केली. चंद्रपूर येथील सर्वसाधारण सभागृह येथे झालेल्या पिसीपिएनडीटी कार्यशाळेस मनपा आरोग्य विभाग व जिल्हा सामान्य रुग्णालय चंद्रपूर यांच्या कार्यक्षेत्रातील पदाधिकारी, अधिकारी, डॉक्टर्स, वैद्यकीय अधिकारी व इतर कर्मचारी मोठया संख्येने उपस्तित होते.

000

आयटीसीच्या सहकार्याने पोंभूर्णा येथे अगरबत्ती क्लस्टर - सुधीर मुनगंटीवार

मुंबई दि. २३ : आयटीसीच्या सहकार्याने चंद्रपूर जिल्ह्यातील पोंभुर्णा येथे अगरबत्ती क्लस्टर विकसित करण्यात येत असल्याचे वनमंत्री सुधीर मुनगंटीवार यांनी सांगितले. मंत्रालयात नुकत्याच झालेल्या बैठकीदरम्यान त्यांनी ही माहिती दिली.गरीब आणि परित्यक्त्या तसेच विधवा महिलांना याचा लाभ होणार असून यासाठी एक क्युआर कोड विकसित करण्यात येणार आहे. या कोडच्या माध्यमातून अगरबत्ती विकत घेणाऱ्या व्यक्तींना या महिलांचा धन्यवाद संदेश ऐकायला मिळेल अशी व्यवस्था यामध्ये करण्यात आली आहे. आयटीसीच्या “मंगलदीप” या ब्रॅण्डव्यतिरिक्त हा नवीन ब्रॅण्ड विकसित करण्यात येत आहे. ही अगरबत्ती खरेदी करून समाजाप्रती आपले ऋण व्यक्त करण्याची ही एक उत्तम संधी उपलब्ध होणार आहे. या उत्पादनाच्या माध्यमातून १ हजार महिलांना रोजगार मिळणार आहे. एक किलो बांबूमधून १०० ग्रॅम अगरबत्ती काड्या तयार करण्यात  येत असून उर्वरित ९० टक्के बांबू मधून इतर उत्पादने तयार केली जाणार आहेत.  प्रकल्प उभारणी ते अगरबत्ती विक्रीपर्यंतचे संपूर्ण काम सहा महिन्यात करण्याचे निश्चित करण्यात आले असून आयटीसी त्यांच्या तांत्रिक आणि आर्थिक मानांकनासह प्रस्ताव सादर करणार  असल्याची माहिती ही वनमंत्र्यांनी यावेळी दिली.

Tuesday 20 March 2018

खोज स्पर्धेत ग्रामीण भागातून भन्नाट आयडीयांचा पाऊस जिल्हा प्रशासनाकडून जनतेच्या प्रतिसादाचे स्वागत


चंद्रपूर, दि.20 मार्च- राज्याचे वित्त, नियोजन व वनमंत्री तथा पालकमंत्री सुधीर मुनगंटीवार यांच्या मार्गदर्शनात चंद्रपूर जिल्हा प्रशासनाने सुरु केलेल्या खोज या स्पर्धेला ग्रामीण व शहरी भागातून मोठया प्रमाणात प्रतिसाद मिळत आहे. 31 मार्च पर्यंत या स्पर्धेची अंतीम तारीख असून समाजातील सर्वस्तरातील नागरिकांनी यामध्ये सहभागी होऊन प्रशासनामध्ये नवा पायंडा निर्माण करावा, असे आवाहन जिल्हाधिकारी आशुतोष सलिल यांनी केले आहे.
            जिल्हा प्रशासनाने शेती, उपजिवीका विकास, पर्यटन व प्रशासन प्रक्रीयेतील सुधारणा संदर्भात नागरिकांनी आपल्या संकल्पना देण्याचे आवाहन केले आहे. जिल्हयाच्या सर्वांगीण विकासासाठी प्रत्येक नागरिकांचा सहभाग असल्याशिवाय सामुहिक विकास साधल्या जाणार नाही. प्रशासन काम करीत नसेल तर त्याची गती वाढविण्यासाठी जनतेने समोर यावे, असे आवाहन या उपक्रमातून करण्यात आले आहे. पत्रकार, वकील, प्राध्यापक, विद्यार्थी, संशोधक, साहित्यीक, विचारवंत, सर्वांसाठीच ही स्पर्धा खुली असून शेतीमध्ये, उद्योग धंदयामध्ये, पर्यटनामध्ये आणि प्रशासकीय सुधारणामध्ये नवीन प्रयोग केलेल्यांनी या स्पर्धेच्या माध्यमातून आपल्या सूचना कळवाव्यात, असे आवाहन करण्यात आले आहे. काही यशस्वी प्रयोग पुन्हा प्रशासनात मोठया संख्येने प्रभावी करण्याची ही संधी असून यासाठी नागरिकांनी पुढे येण्याचे आवाहन करण्यात आले आहे.
            या स्पर्धेसाठी ऑनलाईन, ऑफलाईन सर्व मार्गाने अर्ज करता येत आहेत. सेतू केंद्रामार्फत अर्ज वाटप करण्यात येत असून जिल्हाधिकारी कार्यालयातील सीएमफेलो कक्षामध्ये पोष्टाने देखील अर्ज पाठवता येणार आहे. सर्वात सुलभ माध्यम म्हणजे www.maharashtra.mygov.in या वेबसाईडवर ऑनलाईन अर्ज करण्याची सुविधा निर्माण करण्यात आली आहे. तसेच प्रत्येक सरकारी कार्यालयात किंवा सेतू केंद्रामध्ये याबाबत अर्ज ठेवण्यात आले असून ऑफलाईन सुध्दा अर्ज भरले जात आहे. हॅलो चांदावर या संदर्भातील टोल फ्री क्रमांक 1800-266-4401 वर अधिक माहिती उपलब्ध आहे. तथापि www.maharashtra.mygov.in या वेबसाईडवरच ऑनलाईन अर्ज करण्याकडे तरुणांचा कल असून शेती, पशुपालन, मत्स्यपालन, कुक्कुट पालन आदी क्षेत्रातील मोठया प्रमाणात आयडीया जनता देत आहे. या सर्व आयडीयामधील भन्नाट कल्पनांना 1 लाख 2 हजार रुपयांचे रोख पुरस्कार देण्यात येणार आहे. एका विशेष कार्यक्रमात या पुरस्काराची घोषणा केली जाणार आहे.
शासनाने असे करायला हवे, तसे करायला हवे, याबाबीला प्राधान्य दयावयाला हवे, इकडे लक्ष वेधायला हवे अशा अनेक कितीतरी सूचना अनेकांच्या मनात असतात. अशा कल्पक लोकांनी आपल्या प्रत्येक्ष आयडीया शासनापर्यंत पोहचवाव्या, अशी या मागील भूमिका आहे. या स्पर्धेत विद्यार्थी, शिक्षक, प्राध्यापक, संशोधक, वकील, सरकारी कर्मचारी, शेतकरी, कामगार, महिला सर्वांनी सहभागी होण्याचे आवाहन जिल्हाधिकारी आशुतोष सलिल यांनी केले आहे.
 00

Monday 19 March 2018

शेतमाल निर्यातीतून मिळवा समृद्धी, निर्यात प्रक्रिया झाली सोपी : निर्यातवृद्धीसाठी अनेक योजना


चंद्रपूरदि.17 मार्च-  शेतमाल निर्यातीबाबतच्या कायद्यातील किचकटपणा दूर होवून नियम सोपे झाले आहेत. निर्यात प्रक्रियेत सुसत्रता आली आहे. सर्वसामान्य शेतकरीही आता अतिशय सोपेपणाने आपला शेतमाल निर्यात करु शकतो. निर्यातीविषयक गैरसमज दूर सारुन शेतकऱ्यांनी निर्यातदार व्हावे आणि शेतमालाला चांगली बाजारपेठ व दर मिळवावेतअसे आवाहन विदेश व्यापार महासंचलनालयाचे (डीजीएफटी) उपमहासंचालक संभाजी चव्हाण यांनी केले.
ग्रोव्हिजन फाउंडेशन (नागपूर)प्रकल्प संचालक, कृषी तंत्रज्ञान व्यवस्थापन यंत्रणा (आत्मा) चंद्रपूर   संयुक्त महासंचालक विदेश व्यापार (नागपूर) यांच्या संयुक्त विद्यमाने आयोजित शेतमाल निर्यात संधी कार्यशाळा व महाराष्ट्र कृषि विकास प्रकल्पांतर्गत खरेदीदार-विक्रेते संमेलनाचे उद्घाटन श्री. चव्हाण यांच्या हस्ते झाले. यावेळी ते बोलत होते. डीजीएफटीचे सहाय्यक उपमहासंचालक अनुपम कुमार, आत्माच्या प्रकल्प संचालक डॉ. विद्या मानकरजिल्हा अधिक्षक कृषी अधिकारी डॉ. ए. आर. हसनबादेकृषी उपसंचालक श्री. तपासकर, ग्रोव्हिजन फाउंडेशनचे संतोष डुकरेस्नेहा आईल मिलचे कावडकर, मालु दाल मिलचे अधिकारी व पतजंली कंपनीचे विपणन अधिकारी अश्विन मुसळे हेäþ व्यासपिठावर उपस्थित होते.
श्री. चव्हाण म्हणालेशेती फक्त हिरवी असून उपयोग नाही. उत्कृष्ट दर्जाचे उत्पादन करणेत्या उत्पादनाला चांगली बाजारपेठ व योग्य मल्य मिळवणे महत्वाचे आहे. यासाठी निर्यात हे महत्वाचे साधन आहे. मात्र निर्यात म्हणजे खुप किचकट गोष्टत्यासाठी खुप परवाने लागतातविदेशातले खरेदीदार पैसे बुडवतात अशा गैरसमजांमुळे सर्वसामान्य शेतकरी त्यापासून दूर राहतात. प्रत्यक्षात निर्यातीची प्रक्रिया खुप सोपी असून त्यासाठी परवाने लागत नाहीतआर्थिक संरक्षणापासून शासकीय योजनांपर्यंत अनेक प्रकारचे लाभही उपलब्ध आहेत. शेतकरी गटशेतकरी उत्पादक कंपन्यांनी याचा लाभ घेणे गरजेचे आहे.
निर्यातक्षम उत्पादन व निर्यातीसाठी केंद्र व राज्य शासनामार्फत अनेक प्रकारे सहाय्य करण्यात येत आहे. महाराष्ट्राचे स्वतंत्र निर्यात धोरणही लवकरच येणार आहे. यासाठी केंद्रामार्फत सहकार्य करण्यात येत आहे. येत्या दोन वर्षात निर्यात 60 लाख कोटींपर्यंत वाढविण्याचे उद्दीष्ट आहे. पर्वी अर्थव्यवस्था कृषीप्रदान होतीआता अर्थव्यवस्था कृषीप्रधान न राहता लोकसंख्या कृषीप्रधान झाली आहे. त्यामुळे शेतकऱ्यांनी उत्पन्नवाढीसाठी निर्यातीतील संधींचा अधिकाधिक लाभ घेण्याची गरज आहेअसे मत श्री. चव्हाण यांनी व्यक्त केले. देशाचे  शेतमाल निर्यात धोरणनिर्यात प्रक्रियाशेतकऱ्यांनी निर्यातदार, कसे व्हावे आदी बाबींविषयी त्यांनी सविस्तर माहिती दिली.
अनुपम कुमार यांनी शेतमालाची वैशिष्ट्येब्रॅन्डिंगपरकीय ग्राहक कसे शोधावेतदर निश्चितीनिर्यातीचे टप्पेत्यासाठी उपलब्ध असलेली संकेतस्थळे यांची प्रात्यक्षिकांसह माहिती दिली. आपला शेतमाल किंवा उत्पादने विक्रीसाठी कधी उपलब्ध असतातत्या वेळी कोणत्या देशातील खरेदीदारांची मागणी असते व त्यांना कोणत्या गुणवत्तेची उत्पादने आवश्यक असतात हे लक्षात घेवून निर्यातीचे नियोजन करावे,चंद्रपूरमधील सेंद्रीय शेतमाल उत्पादकतांदूळडाळी उत्पादकउद्योजक यांना सहजपणे विदेशातील बाजारपेठ उपलब्ध होऊ शकते. शेतकरी उत्पादक कंपन्या व व्यवसायिकांनी पुढाकार घेतल्यास यासाठी शासनामार्फत सर्वतोपरी सहकार्य करण्यात येईलअशी ग्वाही त्यांनी दिली.
डॉ. विद्या मानकर यांनी चंद्रपूर जिल्ह्यातील शेतमाल उत्पादनाचा आढावा घेतला. जिल्ह्यातील तांदुळकडधान्ये उत्पादनाला चांगली बाजारपेठ मिळण्याची गरज आहे. जिल्ह्यात 48 शेतकरी गट व 15 शेतकरी उत्पादक कंपन्या स्थापन झाल्या आहेतमात्र अद्याप त्या बाल्यावस्थेत आहेत. ही बाल्यावस्था लवकरात लवकर संपविण्याची गरज आहे. काही गटांनी शेतमालाची जिल्ह्याबाहेर विक्री करण्यास सुरवात केली आहे. या सर्वांसाठी निर्यात हा उत्पन्नवाढीसाठी महत्वाचा उपाय ठरु शकतो. आत्मा मार्फत शेतकऱ्यांना निर्यातक्षम उत्पादनासाठी व विक्री व्यवस्था बळकट कऱण्यासाठी शेतकऱ्यांना पाठबळ देण्यात येत आहे. जिल्ह्यातील दोन हजार शेतकरी सेंद्रीय शेतमाल उत्पादन करत आहेत. त्यांच्या उत्पादनांच्या विक्रीसाठी पतंजली समुहाशी जोडणी करण्याचा प्रयत्न आहे. सेंद्रीय तांदुळडाळी ही आपली कस्तुरी आहेहे ओळखून शेतकऱ्यांनी निर्यातीसाठी पुढाकार घेण्याची गरज आहे.
चंद्रपूर जिल्ह्यातील शेतकऱ्यांना इतर जिल्ह्यांच्या तुलनेत पाणी व इतर साधन सुविधा मुबलक प्रमाणात उपलब्ध आहेत. बाजारपेठाही उपलब्ध आहेत. कृषी विभागामार्फत यंदा 60 कोटी रुपयांची अवजारे उपलब्ध करण्यात आली आहेत. ठिबक व तुषार सिंचनासाठी दोन कोटी रुपये वितरीत करण्यात आले आहेत. योजनानिधी मोठ्या प्रमाणात उपलब्ध आहेत मात्र त्यासाठी शेतकरी पुढे येत नसल्याची स्थिती आहे. भाजीपाला उत्पादनसंरक्षित शेतीफळबागा या सर्वात जिल्ह्यातील शेतकऱ्यांना मोठ्या संधी आहेतबाजारपेठही उपलब्ध आहे. अधिकाधिक शेतकऱ्यांनी त्याचा लाभ घ्यावाअसे आवाहन डॉ. ए. आर. हसनाबादे यांनी केले. स्नेहा आईल मिलचे कावडकर, मालु दाल मिलचे अधिकारी व पतंजली कंपनीचे विपणन अधिकारी अश्विन मुसळे यांनी आपल्या कंपनीचे खरेदीविषयक धोरण सादर केले. या कार्यक्रमाचे प्रास्ताविक संतोष डुकरे यांनी केले तर विशाल घागी यांनी सत्रसंचालन व आभार मानले.
                                                          0000

Saturday 17 March 2018

ग्रामगीता चंद्रपूरच्या प्रत्येक गावाची मार्गदर्शक व्हावी : मुनगंटीवार



आदर्श ग्राम सेवकांचा पालकमंत्र्यांच्या हस्ते सत्कार

       चंद्रपूर, दि.17 मार्च- ज्या मातीमध्ये आदर्श  गावगाडा कसा असावा, याचा ग्रंथ लिहीला गेला. ज्या ठिकाणी ग्रामोन्नतीचा पाया राष्ट्रसंत तुकडोजी महाराजांनी स्वत: रचला, ज्या ठिकाणी त्यांनी सक्षक्त गाव व देशभक्तीचा नारा बुलंद केला. त्या चंद्रपूर जिल्हयातील प्रत्येक गावाचा आदर्श ग्रामगिता असली पाहिजे. त्या वाटेवर वाटचाल करणा-या ग्रामसेवकांचा सत्कार आज करता आला, याचा आनंद असल्‍याचे प्रतिपादन राज्याचे वित्त, नियोजन व वनमंत्री तथा पालकमंत्री सुधीर मुनगंटीवार यांनी केले.
            जिल्हा परिषद चंद्रपूरच्या पंचायत विभागाच्या वतीने आदर्श ग्राम पुरस्कार वितरण सोहळा, आदर्श ग्रामसेवक पुरस्कार सोहळा व जिल्हा परिषद पंचायत समिती सदस्य, सरपंच, ग्राम सेवक यांची कार्यशाळा प्रियदर्शिनी इंदीरा गांधी सांस्कृतिक सभागृहात आयोजित करण्यात आली होती. या कार्यशाळेला उदघाटक म्हणून पालकमंत्री सुधीर मुनगंटीवार तर अध्यक्ष म्हणून केंद्रीय गृहराज्यमंत्री हंसराज अहीर उपस्थित होते. व्यासपिठावर जिल्हा परिषदेचे अध्यक्ष देवराव भोंगळे, मुख्य कार्यकारी अधिकारी जितेंद्र पापळकर, गुरुदेव सेवाश्रम पाठसूळ अकोला येथील राष्ट्रीय प्रबोधनकार डॉ.उध्दव गाडेकर महाराज, औरगांबाद जिल्हयातील पाटोदा ग्राम पंचायतचे सरपंच भास्कर थेरे पाटील, उपाध्यक्ष क्रिष्णा सहारे, सभापती संतोष तंगडपल्लीवार, ब्रिजभूषण पाझारे, अर्जना जिवतोडे, गोदावरी केंद्रे, उपमुख्य कार्यकारी अधिकारी प्रभु जाधव, रविंद्र मोहिते, ओमप्रकाश यादव आदींची उपस्थिती होती.
            सकाळी 10 वाजता पासून सुरु झालेल्या या कार्यक्रमामध्ये सकाळच्या सत्रात मा.हंसराज अहीर यांनी संबोधित केले. यावेळी त्यांनी केंद्र व राज्य शासनाच्या शेकडो योजना ग्राम विकासासाठी तयार करण्यात आलेल्या आहेत. या योजनांची प्रभावी अंमलबजावणी करुन ग्राम विकास साध्य करणे शक्य असल्याचे स्पष्ट केले. त्यामुळे ग्रामीण भागात काम करणा-या कर्मचा-यांनी ग्राम विकासाच्या प्रयोगाची अंमलबजावणी करावी, असे आवाहन त्यांनी केले.
            दुस-या सत्रामध्ये बोलतांना पालकमंत्री सुधीर मुनगंटीवार यांनी राष्ट्रसंताच्या ग्रामगीतेचा आदर्श ठेवत काम करण्याचे त्यांनी सांगितले. गावामध्ये सुखसुविधा आणि जिवनावश्यक मुलभूत सुविधा असणे म्हणजे गाव जिवंत असणे होय. आता गावे वाचविण्याची वेळ आली आहे. त्यामुळे गावासंदर्भात निर्णय घेतांना गतीशिलपणे योजनांची अंमलबजावणी आवश्यक आहे. केवळ ग्रामसेवक नव्हे तर सरपंच, सदस्य व नागरिकांचा सहभाग ग्रामविकासात आवश्यक आहे. सर्वांची साथ मिळते तेव्हा आदर्श गाव घडते. महिला आरक्षणामुळे 50 टक्के महिला सद्या कार्यरत आहेत. त्या उत्तम प्रकारे काम करीत आहेत. यावेळी त्यांनी आदर्श ग्राम पुरस्कार देऊन मुल तालुक्यातील बाबराळा (5 लक्ष रुपयाचा अध्यक्ष आदर्श ग्राम पुरस्कार बहाल केलाया गावाला प्रथम तर ब्रम्हपूरी तालुक्यातील मेंडकी गावाला व्दितीय तर वरोरा तालुक्यातील वंधली या गावाला 2 लक्ष रुपयाचा तृतीय पुरस्कार दिला.
            आदर्श ग्राम सेवक पुरस्कार चंद्रपूर पंचायत समितीमधील ग्राम सेवक निलेश डवरे, चिमूर येथील किशोर ढपकस, बल्लारपूर मधील प्रताप ढुमणे, मुल येथील किशोर ठेंगणे, सावलीमधील संदिप सबबनवार, नागभिडमधील अजय राऊत, ब्रम्हपूरी येथील प्रविण तावेडे, भद्रावतीमधील रजनी खामनकर, वरोरा येथील सुशिल शिंदे, सिंदेवाही येथील  दिवाकर येरमलवार, राजूरा मधील वर्षा भोयर, गोंडपिपरी येथील आशिष आकनुरवार, कोरपनामधील नितीन नरड, पोंभूर्णा मधील प्रकाश रामटेके व जिवती येथील पुंडलिक ठावरे या ग्राम सेवकांचा आदर्श ग्राम सेवक पुरस्कार देवून सत्कार करण्यात आला.
            तसेच यावेळी स्वच्छ संकल्पसे स्वच्छ सिध्दी निबंध स्पर्धेचाही पुरस्कार वितरण सोहळा पार पडला. यामध्ये चंद्रपूर येथील दादाजी रामचंद्र मोरे, कोरपना तालुक्यातील भूवी गुडा गावाचे विशाल नारायण बोथाडे व्दितीय तर प्रविण पंढरीनाथ पिसे यांना तृतीय पुरस्कार देण्यात आला. 18 वर्षा खालील स्पर्धेसाठी इशीता प्रदिप धकाते प्रथम, आशिष राहूल नागदेवते व्दितीय, समिक्षा शंकर बावणे तृतीय यांनाही पुरस्कार देण्यात आले. जिल्हास्तरीय लघुपट स्पर्धा बक्षिस वितरण सोहळाही पालकमंत्र्यांच्या हस्ते पार पडला. यामध्ये प्रथम पुरस्कार उत्कर्ष देवानंद देव, व्दितीय अभिजीत वेंकटेश नरखेळकर, तृतीय पुरस्कार राकेश रेकचंद फुलझेले यांना देण्यात आला.
            कार्यक्रमाचे प्रास्ताविक उपमुख्य कार्यकारी अधिकारी ओमप्रकाश यादव यांनी केले तर सुत्रसंचालन जिल्हा परिषदेच्या शिक्षीका काशीकर यांनी केले. यावेळी ओमप्रकाश यादव यांच्या संताचे समाज प्रबोधन या पुस्तिकेचे विमोचनही करण्यात आले.
                                                            0000

केवळ नौकरी नाहीतर उत्तम व्यवसायासाठी स्वत:ला तयार करा -- धर्मराम पेंदाम


आदिवासी प्रशिक्षण केंद्रातील विद्यार्थ्यांचा निरोप समारंभ संपन्न

      चंद्रपूर, दि.16 मार्च- नौकरीबद्दलच्या अपेक्षा करतांना ती किती लोकांना मिळेल, त्यामध्ये तुमचे व्यक्तिमत्व निट बसते काय, याचा विचार होणे गरजेचे आहे. नौकरीमध्ये पहिल्या महिन्यापासून नियमित पगार मिळत असला तरी त्याची वाढही नियंत्रीत असते. त्यामुळे तुमचे आयुष्य कसे घडवायचे याचा विचार करुन नौकरी किंवा उत्तम व्यवसाय या दोन पर्यायाचा विचारपूर्वक निर्णय घ्यावा, असे आवाहन जिल्हा कोषागार अधिकारी धर्मराव पेंदाम यांनी केले.
          जिल्हयातील अनुसूचित जमातीच्या युवक, युवतींना स्पर्धात्मक परिक्षेची तयारी करुन देण्याच्या दृष्टीने जिल्हा कौशल्य विकास रोजगार व उद्योजकता माहिती व मार्गदर्शन केंद्रातर्फे साडेतीन महिण्याचे प्रशिक्षण देण्यात येत असते. अशा प्रकारचे वर्षामध्ये तीनवेळा प्रशिक्षणाचे आयोजन करण्यात येत असून या वर्षाच्या शेवटच्या तिस-या सत्राचा समारोप 15 मार्च 2018 रोजी पूर्ण झाल्यामुळे या सत्रात प्रशिक्षण घेतलेल्या विद्यार्थ्यांना 15 मार्च रोजी प्रशिक्षण केंद्रामध्ये निरोप समारंभाच्या कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते.
          या कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी जिल्हा कोषागार अधिकारी धर्मराव पेंदाम तर प्रमुख पाहुणे म्हणून जिल्हा माहिती अधिकारी प्रवीण टाके, जिल्हा कौशल्य विकास रोजगार व उद्योजकता मार्गदर्शन केंद्राच्या भाग्यश्री वाघमारे, विजय गराटे, प्रशिक्षण केंद्राचे शिक्षक प्रा.परीहार, शांताराम मडावी व श्रीमती डोंगरे उपस्थित होते.
          यावेळी जिल्हा माहिती अधिकारी प्रवीण टाके यांनी प्रशिक्षणार्थ्यांना मार्गदर्शन करतांना सतत नवीन नवीन पुस्तकांचे वाचन करावे. तसेच भविष्यात निघणा-या स्पर्धात्मक परीक्षेला बसून यश संपादन करावे आणि जीवन सुखकर करावे असे अनमोल मार्गदर्शन त्यांनी  विद्यार्थ्यांना केले. यावेळी भाग्यश्री वाघमारे, विजय गराटे, प्रा.परीहार, शांताराम मडावी, श्रीमती डोंगरे यांनी सुध्दा विद्यार्थ्याना मार्गदर्शन केले.
          या कार्यक्रमाचे संचालन अनिता जांभुळे यांनी तर आभार प्रदर्शन श्रृती मडावी यांनी केले. यावेळी प्रशिक्षणार्थी विद्यार्थी व कार्यालयातील कर्मचारी नितीन खडसे, दासरवार, गुल्हाने, बुर्रेवार, चहारे व पंकज कचरे उपसिथत होते. तसेच 1 एप्रिल 2018 पासून सुरु होणा-या पुढील सत्रासाठी विद्यार्थ्यांनी अर्ज करण्याचे आवाहन विभागातर्फै विद्यार्थ्यांना  यावेळी करण्यात आले.
                                                                000

Wednesday 14 March 2018

जिल्हाधिकारी कार्यालयात गाजली सोशल मिडीया महामित्र गट चर्चा


चंद्रपूर, दि.13 मार्च- देशातील बहूतांश तरुण फेसबुक, व्हाटसॲप, व्टिटर, इन्स्टाग्राम आदी सोशल मिडीयाचा मोठया प्रमाणात वापर करतात. अशांसाठी आयोजित करण्यात आलेली सोशल मिडीया महामित्र स्पर्धेच्या गट चर्चेचा अंतिम पाडाव जिल्हाधिकारी कार्यालयाच्या बचत साफल्य भवन येथे सोमवारी पार पडला.
          राज्य शासनाने सोशल मिडीया घटकांतील सकारात्मक दृष्टीकोन तयार करणा-या युवकांसाठी माहिती व जनसंपर्क महासंचालनालयामार्फत  ही स्पर्धा आयोजित केली होती. चंद्रपूरमधील सहा गटांमध्ये ही स्पर्धा घेण्यात आली. यामध्ये राजूरा, बल्लारपूर, चिमूर, ब्रम्हपूरी, वरोरा व चंद्रपूर या गटांचा समावेश होता. प्रत्येक गटामध्ये हजारो स्पर्धकांमधून 10 लोकांची एका गटासाठी निवड करण्यात आली होती.  त्यांची गट चर्चा अर्थात संवाद सत्र घेण्यात आले. या संवाद सत्रासाठी निरीक्षक म्हणून जिल्हा कोषागार अधिकारी श्री.पेंदाम, जिल्हा उपनिबंधक ज्ञानेश्वर खाडे, जिल्हा कौशल्य विभागाचे सहाय्यक आयुक्त भैय्याजी येरमे, आकाशवाणीचे केंद्र निरीक्षक मनोहर पवनीकर आदी होते. तर परिक्षक म्हणून ग्राहक जागृती संघाचे सेवानिवृत्त अधिकारी  प्रभाकर धोपटे, प्रा.आरती दाचेवार, प्रा.अनिल काटकर, आकाशवाणी निवेदीका संगीता लोखंडे, वर्षा कोल्हे, कवयित्री गीता रायपूरे, कवी प्रदीप देशमुख, किशोर मुगल, नरेशकुमार बोरीकर, जिल्हा परिषदेचे कृष्णकांत खानझोडे, कौशल्य विकास मार्गदर्शक अधिकारी बी.पी.वाघमारे यांनी कार्य बघीतले. जिल्हाभरातील युवा नेटीजन्सचा या कार्यक्रमाला उत्स्फूर्त प्रतिसाद मिळाला. कार्यक्रमाचे आयोजन जिल्हा माहिती कार्यालयाने केले होते.  
                                                          000