कोरपना पंचायत समितीच्या नव्या इमारतीचे लोकार्पण,
फर्निचर व अन्य सुधारणांसाठी पालकमंत्र्यांकडून अतिरिक्त १.४० कोटी
फर्निचर व अन्य सुधारणांसाठी पालकमंत्र्यांकडून अतिरिक्त १.४० कोटी
चंद्रपूर दि. 30मार्च : जिवती -कोरपना या मागास भागातील शिक्षण , आरोग्य , पिण्याचे पाणी या पायाभूत सुविधा वेगाने पूर्ण होत आहे . पुढच्या १० महिन्यात या क्षेत्रातील सर्व प्रलंबित कामे पूर्ण केली जातील . यासाठी मुख्य कार्यकारी अधिकारी यांच्या नेतृत्वात कृती आराखडा तयार करा , असे आवाहन राज्याचे वित्त, नियोजन व वने मंत्री तथा चंद्रपूर जिल्हयाचे पालकमंत्री सुधीर मुनगंटीवार यांनी केले. त्यांच्याहस्ते आज 30 मार्चला कोरपना पंचायत समितीच्या नव्या इमारतीचे सायंकाळी ६ वाजता लोकार्पण झाले. यावेळी फर्निचर व अन्य बाबींसाठी १.४० कोटीचा अतिरिक्त निधी उपलब्ध करण्याची घोषणा त्यांनी केली. या उद्घाटन सोहळ्याला पालकमंत्री सुधीर मुनगंटीवार यांच्यासह राजुरा मतदार संघाचे आमदार ॲङ संजय धोटे , वनविकास महामंडळाचे अध्यक्ष चंदनसिंग चंदेल, बल्लारपूरचे नगराध्यक्ष हरीष शर्मा,जि.प.चे,मुख्यकार्यकारी अधिकारी जितेंद्र पापळकर, बांधकाम सभापती संतोष तंगडपल्लीवार, समाजकल्याण सभापती ब्रिजभूषण पाझारे, महिला व बालकल्याण सभापती गोंदावरी केंद्रे, कारेपना पं.सं.सभापती शाम रणदिवे आदि उपस्थित होते.
3 हेक्टर क्षेत्रामाध्ये जुन्या पंचायत समिती आवारात हे नवीन पंचायत समिती संकुल उभारण्यात आले. 2 कोटी 41 लक्ष रूपयाच्या या इमारतीमध्ये अद्यावत कार्यालय उभे झाले आहे. यापूर्वी या ठिकाणी पंचायत समितीचे कामकाज प्रशिक्षण भवनात चालत होते. पालकमंत्री सुधीर मुनगंटीवार यांनी वित्तमंत्री झाल्यानंतर या इमारतीचा निधी मंजूर केला. २ बर्षात ही इमारत तयार झाली .यावेळी बोलताना त्यांनी आमदार अॅड.संजय धोटे यांच्या नेतृत्वात या मतदार संघात सुरु असलेल्या विकास कामा बद्दल समाधान व्यक्त केले. जिल्हयात जिवती असो वा कोरपना , पोभुर्णा असो वा नागभीड जिल्हयाचा पालकमंत्री म्हणून समतोल विकासाचा आपला संकल्प असल्याचे त्यांनी सांगितले . जिवती , कोरपना भागातील प्राथमिक आरोग्य केंद्र , शाळा आणि कोरपना , गडचांदूर येथील बसस्टँड व अन्य प्रगतीपथावरील कामे पुढच्या १० महिन्यात पूर्ण झाली असेल असे स्पष्ट केले .पंचायत समितीच्या नव्या इमारतीतून जनसेवेचे कार्य पूर्णत्वास जावे अशा शुभेच्छा त्यांनी दिल्या . या मतदार संघाचे आमदार धोटे यांनी पालकमंत्र्यांनी राजुरा विमानतळ , जिवतीतील १०० खाटांचे रुग्णालय , पकडी गुड्डम पर्यटन स्थळासाठी निधी , कोरपना, गड चांदूर बसस्टँडला मान्यता दिल्याबद्दल आभार मानले . हा भाग विकासाच्या बाबतीत आघाडीवर राहील ही पालकमंत्र्यांची भूमिका काम करायला बळ देते असे सांगितले.
या इमारतीच्या लोकार्पण सोहळया सोबतच सरपंच मेळाव्याचे ही आयोजन करण्यात आले होते. यावेळी तालुका स्मार्ट ग्राम म्हणून 2016-17 चा प्रथम पुरस्कार ग्रामपंचायत कुकडसाथला देण्यात आला. सरपंच वंदना चवले, ग्रामसेवक भुजंगराव सुर्यवंशी यांनी पुरस्कार स्वीकारला. 2017-18 चा सरपंच पुरस्कार मंगलदास गेडाम, ग्रामविकास अधिकारी अरूण वाकुळकर यांना देण्यात आला . आदर्श ग्रामसेवक पुरस्कार नितीन नरड यांना देण्यात आला तर वडगावचे सरपंच मोहपत मडावी यांचाही सत्कार करण्यात आला. या सरपंच मेळाव्याला सभापती शामजी रणदिवे, उपसभापती संभाशिवजी कोवे, गटविकास अधिकारी डॉ. संदिप धोन्सीकर,धनंजय साळवे यांनी मार्गदर्शन केले. या कार्यक्रमाचे प्रास्ताविक कार्यकारी अभियंता नरेंद्र बुरांडे यांनी केला. मनोगत सभापती शामजी रणदिवे, उपसभापती संभाशिवजी कोवे यांनी केले .कोरपना तालुक्याला विविध योजनेतून अधिक प्रतिनिधीत्व देण्याची मागणी केली . कार्यक्रमाचे संचालन धनंजय साळवे यांनी केले .
000000
No comments:
Post a Comment