Search This Blog

Tuesday 27 March 2018

रोजगार हमी योजनेच्या प्रचार रथाला चंद्रपूर जिल्हयात प्रारंभ महसूल विभागाच्या अनेक योजनांचा करणार प्रचार


चंद्रपूर, दि.26 मार्च- केंद्र व राज्य शासनाच्या गावपातळीवरील विविध सार्वजनिक स्वरुपाच्या योजना सामान्य जनतेपर्यंत पोहचाव्यात, या योजनांची माहिती मिळावी आणि योजनेबद्दल जनतेमध्ये चर्चा व्हावी, यासाठी रोजगार हमी योजनेचे दायित्व असणा-या महाराष्ट्र शासनाच्या नियोजन विभागामार्फत प्रत्येक जिल्हयात प्रसिध्दी रथाची सुरुवात करण्यात आली आहे. चंद्रपूर जिल्हा प्रशासनाने देखील या योजनेला सुरुवात केली आहे. या चित्ररथाव्दारे जनतेला माहिती होणा-या योजनांचा लाभ घेण्याचे आवाहन करण्यात आले आहे.
            निवासी उपजिल्हाधिकारी वैभव नावडकर, उपजिल्हाधिकारी (रोहयोकल्पना निळ यांनी या संदर्भात तयार करण्यात आलेल्या चित्ररथाला नुकतीच हिरवी झेंडी दाखवून प्रारंभ केला आहे. समृध्द महाराष्ट्र जनकल्याण योजनेअंतर्गत येणारे गावअंतर्गत रस्ते, गाय, म्हैस यांच्याकरीता गोठयात पक्के तळे, अमृत कुंठ शेततळे, अहिल्यादेवी सिंचन विहीरी, कल्पवृक्ष फळबाग लागवड, ग्राम सबलीकरणाची समृध्द ग्राम योजना, स्मशान भूमी बांधकाम, क्रिडागंण, अंगणवाडी, निर्मल शौचालय, निर्मल शोच खड्डे, समृध्द गाव तलाव, अंकुर रोपवाटीका, भूसंजीवनी कंपोष्ट, भूसंजीवनी गांडूळ खत निर्मिती, अशा कितीतरी योजनांची माहिती या चित्ररथावर करण्यात आली आहे. महात्मा गांधी ग्रामीण रोजगार हमी योजनेअंतर्गत सामान्य जनतेला मिळालेल्या 10 अधिकाराची माहिती देखील या चित्ररथावर करण्यात आली आहे. जिल्हाभरातील जनतेने या योजनेची माहिती घेऊन प्रत्यक्षात उपयोगात येणा-या लाभाच्या योजनेबद्दल, ग्राम सेवक, तलाठी, कृषी सहाय्यक यांच्याकडून माहिती घ्यावी. तहसिल कार्यालयातून माहिती घ्यावी व शासनाच्या विविध योजनांचा लाभ घ्यावा. तसेच गावागावातील सरपंचानी या चित्ररथाचे स्वागत करुन गावक-यांना माहिती उपलब्ध करुन देण्यासाठी मदत करावी, असे आवाहन उपविभागीय अधिकारी मनोहर गव्हाळ व उपजिल्हाधिकारी रोहयो कल्पना निळ यांनी केले आहे.
            हा चित्ररथ पुढील 15 दिवस चंद्रपूर जिल्हयातील विविध गावांमध्ये प्रचारासाठी जाणार असून नागरिकांनी योजनांची माहिती घेऊन त्याचा लाभ घ्यावा, असे आवाहन जिल्हा प्रशासनाने केले आहे.
                                                                        000

No comments:

Post a Comment