चंद्रपूर, दि.13 मार्च- देशातील बहूतांश तरुण फेसबुक, व्हाटसॲप, व्टिटर, इन्स्टाग्राम आदी सोशल मिडीयाचा मोठया प्रमाणात वापर करतात. अशांसाठी आयोजित करण्यात आलेली सोशल मिडीया महामित्र स्पर्धेच्या गट चर्चेचा अंतिम पाडाव जिल्हाधिकारी कार्यालयाच्या बचत साफल्य भवन येथे सोमवारी पार पडला.
राज्य शासनाने सोशल मिडीया घटकांतील सकारात्मक दृष्टीकोन तयार करणा-या युवकांसाठी माहिती व जनसंपर्क महासंचालनालयामार्फत ही स्पर्धा आयोजित केली होती. चंद्रपूरमधील सहा गटांमध्ये ही स्पर्धा घेण्यात आली. यामध्ये राजूरा, बल्लारपूर, चिमूर, ब्रम्हपूरी, वरोरा व चंद्रपूर या गटांचा समावेश होता. प्रत्येक गटामध्ये हजारो स्पर्धकांमधून 10 लोकांची एका गटासाठी निवड करण्यात आली होती. त्यांची गट चर्चा अर्थात संवाद सत्र घेण्यात आले. या संवाद सत्रासाठी निरीक्षक म्हणून जिल्हा कोषागार अधिकारी श्री.पेंदाम, जिल्हा उपनिबंधक ज्ञानेश्वर खाडे, जिल्हा कौशल्य विभागाचे सहाय्यक आयुक्त भैय्याजी येरमे, आकाशवाणीचे केंद्र निरीक्षक मनोहर पवनीकर आदी होते. तर परिक्षक म्हणून ग्राहक जागृती संघाचे सेवानिवृत्त अधिकारी प्रभाकर धोपटे, प्रा.आरती दाचेवार, प्रा.अनिल काटकर, आकाशवाणी निवेदीका संगीता लोखंडे, वर्षा कोल्हे, कवयित्री गीता रायपूरे, कवी प्रदीप देशमुख, किशोर मुगल, नरेशकुमार बोरीकर, जिल्हा परिषदेचे कृष्णकांत खानझोडे, कौशल्य विकास मार्गदर्शक अधिकारी बी.पी.वाघमारे यांनी कार्य बघीतले. जिल्हाभरातील युवा नेटीजन्सचा या कार्यक्रमाला उत्स्फूर्त प्रतिसाद मिळाला. कार्यक्रमाचे आयोजन जिल्हा माहिती कार्यालयाने केले होते.
No comments:
Post a Comment