Search This Blog

Tuesday, 13 March 2018

पल्स पोलिओ अभियानाचा दुसरा टप्पा यशस्वी

चंद्रपूर, दि.13 मार्च- राष्ट्रीय पल्स पोलिओ लसीकरण मोहिमे अंतर्गत भारत देश संपूर्ण पोलिओ मुक्त करण्याचे केंद्र शासनाचे धोरण असून भारत देश लवकरात लवकर पोलिओ मुक्त व्हावा, भारतात पुढील काही वर्षात एकही पोलिओग्रस्त रुग्ण आढळणार नाही, असा उद्देश समोर ठेवून दरवर्षी पल्स पोलिओ लसीकरण मोहिम राबविण्यात येत आहे. त्यानुसार पल्स पोलिओ लसीकरण मोहिमेचा दुसरा टप्पा 11 मार्च रोजी जिल्हयात यशस्वीपणे राबविण्यात आला.
          पल्स पोलिओ मोहिमेच्या दुस-या टप्प्यात ग्रामीण भागातील प्राथमिक आरोग्य केंद्र चौगान येथील लसीकरण केंद्रावर बालकास पोलीओ डोज पाजूण जिल्हा परिषदेचे उपाध्यक्ष तथा आरोग्य सभापती कृष्णा सहारे यांनी शुभारंभ केला. यावेळी ब्रम्हपूरी पंचायत समितीच्या सभापती प्रणाली मैद, जिल्हा माता व बाल संगोपण अधिकारी डॉ.संदीप गेडाम, तालुका आरोग्य अधिकारी डॉ.विलास दुधपचारे, डॉ.भाग्यश्री सोनपिंपळे, वैद्यकीय अधिकारी डॉ.बांगळे उपस्थित होते.
          यावेळी पल्स पोलिओ लसीकरण मोहिमेच्या दुस-या टप्प्यात ग्रामीण भागात 112576 बालकाला तर शहरी भागात 24431 व महानगरपालिका क्षेत्रात 34929 असे एकूण 1 लाख 71 हजार 936 बालकांना पोलिओ डोज पाजण्यात आली.
          सदर मोहिमेचे आयोजन जिल्हाधिकारी आशुतोष सलिल यांचे अध्यक्षतेखाली स्थापित जिल्हा समन्वय समितीचे मार्फतीने व मुख्य कार्यकारी अधिकारी जितेंद्र पापळकर यांचे विशेष मार्गदर्शनाखाली संपन्न झाले. या पल्स पोलिओ लसीकरण मोहिमेत जिल्हयातील सर्व सेवाभावी संस्था, लोकप्रतिनिधी, रोटरी क्लब, लायन्स क्लब, आय.एम.ए, एम.एस.ई.बी., औद्योगिक प्रतिष्ठाने व कर्मचारी यांनी महत्वपूर्ण योगदान दिले. जिल्हयातील 0 ते 5 वर्षाखालील बालकांच्या पालकांनी आपल्या बालकांना लस पाजून घेतली. त्याबद्दल जिल्हा परिषदेचे अध्यक्ष देवराव भोंगळे, मुख्य कार्यकारी अधिकारी जितेंद्र पापळकर, आरोग्य सभापती कृष्णा सहारे, उपमुख्य कार्यकारी अधिकारी संजय जोल्हे, जिल्हा आरोग्य अधिकारी डॉ.श्रीराम गोगुलवार, जिल्हा शल्य चिकित्सक डॉ.उमेश नावाडे, महानगरपालिकेच्या वैद्यकीय अधिकारी डॉ.अंजली आंबटकर, जिल्हा माता व बाल संगोपन अधिकारी डॉ.संदीप गेडाम यांनी जिल्हा प्रशासनातर्फे सर्वांचे आभार व्यक्त केले.
                                                          000

No comments:

Post a Comment