आदिवासी प्रशिक्षण केंद्रातील विद्यार्थ्यांचा निरोप समारंभ संपन्न
चंद्रपूर, दि.16 मार्च- नौकरीबद्दलच्या अपेक्षा करतांना ती किती लोकांना मिळेल, त्यामध्ये तुमचे व्यक्तिमत्व निट बसते काय, याचा विचार होणे गरजेचे आहे. नौकरीमध्ये पहिल्या महिन्यापासून नियमित पगार मिळत असला तरी त्याची वाढही नियंत्रीत असते. त्यामुळे तुमचे आयुष्य कसे घडवायचे याचा विचार करुन नौकरी किंवा उत्तम व्यवसाय या दोन पर्यायाचा विचारपूर्वक निर्णय घ्यावा, असे आवाहन जिल्हा कोषागार अधिकारी धर्मराव पेंदाम यांनी केले.
जिल्हयातील अनुसूचित जमातीच्या युवक, युवतींना स्पर्धात्मक परिक्षेची तयारी करुन देण्याच्या दृष्टीने जिल्हा कौशल्य विकास रोजगार व उद्योजकता माहिती व मार्गदर्शन केंद्रातर्फे साडेतीन महिण्याचे प्रशिक्षण देण्यात येत असते. अशा प्रकारचे वर्षामध्ये तीनवेळा प्रशिक्षणाचे आयोजन करण्यात येत असून या वर्षाच्या शेवटच्या तिस-या सत्राचा समारोप 15 मार्च 2018 रोजी पूर्ण झाल्यामुळे या सत्रात प्रशिक्षण घेतलेल्या विद्यार्थ्यांना 15 मार्च रोजी प्रशिक्षण केंद्रामध्ये निरोप समारंभाच्या कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते.
या कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी जिल्हा कोषागार अधिकारी धर्मराव पेंदाम तर प्रमुख पाहुणे म्हणून जिल्हा माहिती अधिकारी प्रवीण टाके, जिल्हा कौशल्य विकास रोजगार व उद्योजकता मार्गदर्शन केंद्राच्या भाग्यश्री वाघमारे, विजय गराटे, प्रशिक्षण केंद्राचे शिक्षक प्रा.परीहार, शांताराम मडावी व श्रीमती डोंगरे उपस्थित होते.
यावेळी जिल्हा माहिती अधिकारी प्रवीण टाके यांनी प्रशिक्षणार्थ्यांना मार्गदर्शन करतांना सतत नवीन नवीन पुस्तकांचे वाचन करावे. तसेच भविष्यात निघणा-या स्पर्धात्मक परीक्षेला बसून यश संपादन करावे आणि जीवन सुखकर करावे असे अनमोल मार्गदर्शन त्यांनी विद्यार्थ्यांना केले. यावेळी भाग्यश्री वाघमारे, विजय गराटे, प्रा.परीहार, शांताराम मडावी, श्रीमती डोंगरे यांनी सुध्दा विद्यार्थ्याना मार्गदर्शन केले.
या कार्यक्रमाचे संचालन अनिता जांभुळे यांनी तर आभार प्रदर्शन श्रृती मडावी यांनी केले. यावेळी प्रशिक्षणार्थी विद्यार्थी व कार्यालयातील कर्मचारी नितीन खडसे, दासरवार, गुल्हाने, बुर्रेवार, चहारे व पंकज कचरे उपसिथत होते. तसेच 1 एप्रिल 2018 पासून सुरु होणा-या पुढील सत्रासाठी विद्यार्थ्यांनी अर्ज करण्याचे आवाहन विभागातर्फै विद्यार्थ्यांना यावेळी करण्यात आले.
No comments:
Post a Comment