Search This Blog

Tuesday 20 March 2018

खोज स्पर्धेत ग्रामीण भागातून भन्नाट आयडीयांचा पाऊस जिल्हा प्रशासनाकडून जनतेच्या प्रतिसादाचे स्वागत


चंद्रपूर, दि.20 मार्च- राज्याचे वित्त, नियोजन व वनमंत्री तथा पालकमंत्री सुधीर मुनगंटीवार यांच्या मार्गदर्शनात चंद्रपूर जिल्हा प्रशासनाने सुरु केलेल्या खोज या स्पर्धेला ग्रामीण व शहरी भागातून मोठया प्रमाणात प्रतिसाद मिळत आहे. 31 मार्च पर्यंत या स्पर्धेची अंतीम तारीख असून समाजातील सर्वस्तरातील नागरिकांनी यामध्ये सहभागी होऊन प्रशासनामध्ये नवा पायंडा निर्माण करावा, असे आवाहन जिल्हाधिकारी आशुतोष सलिल यांनी केले आहे.
            जिल्हा प्रशासनाने शेती, उपजिवीका विकास, पर्यटन व प्रशासन प्रक्रीयेतील सुधारणा संदर्भात नागरिकांनी आपल्या संकल्पना देण्याचे आवाहन केले आहे. जिल्हयाच्या सर्वांगीण विकासासाठी प्रत्येक नागरिकांचा सहभाग असल्याशिवाय सामुहिक विकास साधल्या जाणार नाही. प्रशासन काम करीत नसेल तर त्याची गती वाढविण्यासाठी जनतेने समोर यावे, असे आवाहन या उपक्रमातून करण्यात आले आहे. पत्रकार, वकील, प्राध्यापक, विद्यार्थी, संशोधक, साहित्यीक, विचारवंत, सर्वांसाठीच ही स्पर्धा खुली असून शेतीमध्ये, उद्योग धंदयामध्ये, पर्यटनामध्ये आणि प्रशासकीय सुधारणामध्ये नवीन प्रयोग केलेल्यांनी या स्पर्धेच्या माध्यमातून आपल्या सूचना कळवाव्यात, असे आवाहन करण्यात आले आहे. काही यशस्वी प्रयोग पुन्हा प्रशासनात मोठया संख्येने प्रभावी करण्याची ही संधी असून यासाठी नागरिकांनी पुढे येण्याचे आवाहन करण्यात आले आहे.
            या स्पर्धेसाठी ऑनलाईन, ऑफलाईन सर्व मार्गाने अर्ज करता येत आहेत. सेतू केंद्रामार्फत अर्ज वाटप करण्यात येत असून जिल्हाधिकारी कार्यालयातील सीएमफेलो कक्षामध्ये पोष्टाने देखील अर्ज पाठवता येणार आहे. सर्वात सुलभ माध्यम म्हणजे www.maharashtra.mygov.in या वेबसाईडवर ऑनलाईन अर्ज करण्याची सुविधा निर्माण करण्यात आली आहे. तसेच प्रत्येक सरकारी कार्यालयात किंवा सेतू केंद्रामध्ये याबाबत अर्ज ठेवण्यात आले असून ऑफलाईन सुध्दा अर्ज भरले जात आहे. हॅलो चांदावर या संदर्भातील टोल फ्री क्रमांक 1800-266-4401 वर अधिक माहिती उपलब्ध आहे. तथापि www.maharashtra.mygov.in या वेबसाईडवरच ऑनलाईन अर्ज करण्याकडे तरुणांचा कल असून शेती, पशुपालन, मत्स्यपालन, कुक्कुट पालन आदी क्षेत्रातील मोठया प्रमाणात आयडीया जनता देत आहे. या सर्व आयडीयामधील भन्नाट कल्पनांना 1 लाख 2 हजार रुपयांचे रोख पुरस्कार देण्यात येणार आहे. एका विशेष कार्यक्रमात या पुरस्काराची घोषणा केली जाणार आहे.
शासनाने असे करायला हवे, तसे करायला हवे, याबाबीला प्राधान्य दयावयाला हवे, इकडे लक्ष वेधायला हवे अशा अनेक कितीतरी सूचना अनेकांच्या मनात असतात. अशा कल्पक लोकांनी आपल्या प्रत्येक्ष आयडीया शासनापर्यंत पोहचवाव्या, अशी या मागील भूमिका आहे. या स्पर्धेत विद्यार्थी, शिक्षक, प्राध्यापक, संशोधक, वकील, सरकारी कर्मचारी, शेतकरी, कामगार, महिला सर्वांनी सहभागी होण्याचे आवाहन जिल्हाधिकारी आशुतोष सलिल यांनी केले आहे.
 00

No comments:

Post a Comment