Search This Blog

Monday 12 March 2018

मोक्याच्या ठिकाणच्या मालमत्तेवर आकारण्यात आलेल्या कराच्या आदेशाला पालकमंत्र्यांकडून स्थगिती



व्यापारी शिष्टमंडळ व वरिष्ठ अधिका-यांच्या बैठकीत घेतला निर्णय

      चंद्रपूर, दि.12 मार्च- चंद्रपूर शहरातील मोक्याच्या ठिकाणी असणा-या जुन्या मालमत्तांना वाणिज्य वापरासाठी वापरल्याच्या कारणावरुन अधिक्षक भूमी अभिलेख कार्यालयाने काढलेल्या 40 पट कर आकारणीच्या आदेशाला राज्याचे वित्त, नियोजन व वनमंत्री तथा पालकमंत्री सुधीर मुनगंटीवार यांनी स्थगिती दिली.
            जिल्हाधिकारी कार्यालयात आज झालेल्या या बैठकीत शहरातील व्यापारी शिष्टमंडळ सहभागी झाले होते. गेल्या अनेक वर्षापासून वापरात असणा-या जुन्या मालमत्तांना अचानक मोठया प्रमाणात कर आकारणी करण्यात आली आहे. या संदर्भात शहरातील नागरिकांमध्ये मोठया प्रमाणात नाराजी होती. आज शिष्टमंडळाने भेट घेऊन पालकमंत्री सुधीर मुनगंटीवार यांनी यामध्ये तोडगा काढावा, अशी मागणी केली. या बैठकीला जिल्हा परिषद अध्यक्ष देवराव भोंगळे, महपौर अंजली घोटेकर, अप्पर जिल्हाधिकारी सचिन कलंत्रे, निवासी उपजिल्हाधिकारी वैभव नावडकर, जिल्हा अधिक्षक भूमी अभिलेख अधिकारी अभय जोशी, जिल्हा खनिकर्म अधिकारी श्री.कामडे व अन्य अधिकारी उपस्थित होते.
            यावेळी व्यापारी व अधिकारी या दोघांशी चर्चा केल्यानंतर या संदर्भात राज्याचे महसूल मंत्री चंद्रकांतदादा पाटील यांच्याशी आपण चर्चा करणार असल्याचे त्यांनी सांगितले. व्यापा-यांना आपल्या नियमित वापराच्या मालमत्तेसाठी इतक्यामोठया प्रमाणात कर आकारणे योग्य नसून तूर्तास हा सदर वसुलीस स्थगिती देण्याचे निर्देश त्यांनी दिले. या निर्णयाबद्दल व्यापा-यांनी समाधान व्यक्त केले असून शासनाने योग्य पध्दतीने कर आकारणी करावी, अशी अपेक्षा त्यांनी व्यक्त केली.
                                                                                0000

No comments:

Post a Comment