चंद्रपूर,दि. 7 एप्रिल -चंद्रपूर जिल्हयातील ग्रामीण भागात निर्माण होणाऱ्या पाणी टंचाईवर बाबतच्या समस्या त्वरीत निकाली काढून ग्रामीण भागातील जनतेला सुरळीत पिण्याचे पाणी उपलब्ध व्हावे.याकरिता तसेच आवश्यक उपाययोजना त्वरीत अंमलात आणता याव्यात यासाठी चंद्रपूर जिल्हा परिषदेच्या स्तरावर ग्रामीण पाणी पुरवठा विभाग जिल्हा परिषद चंद्रपूर येथे पाणी टंचाई कक्ष निर्माण करण्यात आला असून या कक्षाचा दूरध्वनी क्रमांक 07172-273978 हा आहे.त्यामुळे ग्रामीण भागात निर्माण होणाऱ्या आपल्या पाणी टंचाईच्या काही समस्या असल्यास वरील क्रमांकावर संपर्क साधण्याचे आवाहन ग्रामीण पाणी पुरवठा विभागाचे कार्यकारी अभियंता यांनी केले आहे.
तसेच जिल्हयातील प्रत्येक पंचायत समिती स्तरावर सुध्दा तालुका स्तरीय पाणी टंचाई कक्ष उघडण्यात आलेला आहे.त्यामुळे पाणी टंचाई संबंधाने काही तक्रारी असल्यास नागरीकांनी जिल्हा स्तरावरील किंवा पंचायत समिती स्तरावरील पाणी टंचाई कक्षाकडे सकाळी 8.00 ते रात्री 8.00 वाजेपावेतोच्या दरम्याण तक्रारी नोदवाव्यात असे जिल्हा परिषदेच्या ग्रामीण पाणी पुरवठा विभागाने कळविले आहे.
0000000
No comments:
Post a Comment