बांधकाम कामगारांना सुरक्षासंच वाटप
सहाय्यक कामगार आयुक्तांतर्फे लाभ घेण्याचे आवाहन
चंद्रपूर, दि. 2 फेब्रुवारी : महाराष्ट्र इमारत व इतर बांधकाम कामगार कल्याणकारी मंडळ, मुबंई यांच्या मार्फत जिवित व नोंदणीकृत बांधकाम कामगार यांना देण्यात येणाऱ्या सुरक्षा संच व अत्यावश्यक संच वाटपाचे नियोजन चंद्रपूर जिल्ह्यामध्ये करण्यात आले असुन, नोंदणीकृत बांधकाम कामगारांनी या योजनेचा लाभ घ्यावा असे आवाहन सहाय्यक कामगार आयुक्त नितीन पाटणकर यांनी केले आहे.
संचवाटपाचा कार्यक्रम सोमवार ते शनिवार (सणाचे दिवस सोडुन) शनि मंदिर समोर, मोरवा, चंद्रपूर येथे सकाळी 09 ते संध्या 06 वाजे पर्यंत सुरू आहे. लाभार्थ्यांनी किवा संघटनेच्या प्रतिनिधी यांना संच घेणे करीता टोकन नंबर घेणे बंधनकारक आहे. सदर संच घेणे पुर्वी 09307059020 या क्रमाकावर संपर्क साधुन आपला दिवस व वेळ निश्चित करुन संच वाटप ठिकाणी हजर राहावे, अन्यथा टोकन नसलेल्या लाभार्थ्यांना सदर योजनेचा लाभ मिळणार नाही. तसेच कोविड -19 चा प्रादुर्भाव लक्षात घेता संच वाटप ठिकाणी लाभार्थ्यांनी मास्क, सानिटायजर व सुरक्षित अंतर राखणे बंधनकारक असेल.
सदर सुरक्षा संच व अत्यावश्यक वाटप हे नि:शुल्क असून कामगारांनी कोणत्याही एजंट /दलाल/ मध्यस्थी यांच्या प्रलोभनाला बळी पडु नये तसेच सुरक्षा संच व अत्यावश्यक संचाकरीता कोणासही रक्कम देण्यात येऊ नये. बोगस कामगार निदर्शनास आल्यास योग्य ती कारवाही केली जाईल, असे सहाय्यक कामगार आयुक्त नितीन पाटणकर यांनी कळविले आहे.
0000
No comments:
Post a Comment