Search This Blog

Friday, 30 November 2018

शिक्षणातून नवनवीन समाजोपयोगी शोध पुढे आले पाहिजे : ना.मुनगंटीवार




पालकमंत्र्यांच्या उपस्थितीत विज्ञान प्रदर्शनीचा शुभारंभ

 चंद्रपूर दि.30 नोव्हेंबर : शिक्षण घेणे म्हणजे पुस्तकी ज्ञान लादने नव्हे. शिक्षण म्हणजे अंतरात्म्याच्या विकासाला चालना मिळणे होय. शिक्षणातून समाजाला काहीतरी देता आले पाहिजे. शिक्षणातून नवनवीन समाज उपयोगी शोध पुढे आले पाहिजे. त्यासाठी नव्या पिढीला तयार करा, असे आवाहन राज्याचे वित्त,नियोजन व वने मंत्री तथा चंद्रपूर जिल्ह्याचे पालकमंत्री ना.सुधीर मुनगंटीवार यांनी केले. 
          बल्लारपूर येथे साईबाबा न्याज्ञपीठ कॉन्व्हेंट येथे तालुकास्तरीय विज्ञान प्रदर्शनीचे उद्घाटन कार्यक्रमाला प्रमुख पाहुणे म्हणून ते उपस्थित होते. यावेळी व्यासपीठावर वनविकास महामंडळाचे अध्यक्ष चंदनसिंग चंदेलजिल्हा परिषदेचे अध्यक्ष देवराव भोंगळेबल्लारपूर नगरपालिकेचे नगराध्यक्ष हरिष शर्मासभापती गोविंद पोडे, मुख्य कार्यकारी अधिकारी जितेंद्र पापळकरपोंभूर्णा सभापती अलका आत्रामजिल्हा परिषद सदस्य राहुल संतोषवारमुख्याधिकारी बिपिन मुग्धागटविकास अधिकारी श्वेता यादवप्राचार्य किरण सिंग चंदेल यांच्यासह अन्य मान्यवर उपस्थित होते.
          तालुक्यातील सर्व शाळांचे शिक्षक व विद्यार्थी यांच्याशी संवाद साधतांना पालकमंत्री सुधीर मुनगंटीवार यांनी जापान मधील शिक्षण पद्धतीचा दाखला दिला. जापानमध्ये शिक्षणात प्रयोगशिलतेवर अधिक भर दिला जातो. ते म्हणालेशिक्षण म्हणजे केवळ पुस्तक वाचणे नव्हे. शिक्षण हे जबरदस्तीने ज्ञान वाटणे किंवा घेणे नव्हे. शिक्षण म्हणजे अंतरात्म्या सोबतचा संवाद हवाय. अंतरात्मा विकसित करणे शिक्षणाचे प्रथम ध्येय असले पाहिजे. विद्यार्थ्यांना न्यूटनएडीसन यांचा जन्म कधी झालान्यूटन कसा दिसत होतायांचा मृत्यू कधी झालाहे एकदाचे नाही शिकवले तरी चालेल. मात्र न्यूटन तुमच्या शाळेमध्ये कसा तयार होईल तुमच्या शाळेमध्ये विधार्थी कसा प्रयोग करायला शिकेल याबाबतच्या उपाययोजना करणे गरजेचे असल्याचे त्यांनी स्पष्ट केले.
           बल्लारपूर सारख्या तालुक्याच्या ठिकाणी विद्यार्थ्यांनी केलेले नवनवीन प्रयोग लक्ष वेधणारे असल्याचे सांगून त्यांनी मुलांच्या वैज्ञानिक व सांस्कृतिक कलागुणांचे कौतुक केले. विज्ञान प्रदर्शनी ही दरवर्षीची खानापूर्ती होऊ नये. विद्यार्थ्यांच्या शैक्षणिक सत्रामध्ये त्याच्यामध्ये शोधक वृत्ती वाढेल यासाठी प्रयत्न करण्याचे आवाहनन त्यांनी यावेळी उपस्थित शिक्षकांना केले.
         केंद्रीय मंत्री ना. नितीन गडकरी यांनी बांबूपासून इंधन बनविण्याचे आवाहन केलेले आहे. उद्या विमाने बांबूपासून तयार होणाऱ्या इंधनावर उडायला लागली तर मोठा बदल घडून येईल. प्रयोगामध्ये अशी ताकद असली पाहिजे. एखाद्या प्रयोगातून समाजाच्या सार्वजनिक उन्नतीला हातभार लागला पाहिजे. अशा प्रयोगांमध्ये विद्यार्थ्यांची अभिरूची वाढवाअसे आवाहनही त्यांनी यावेळी केले.
         या कार्यक्रमाला पोंभुर्णा तालुक्यातील नागरिकही मोठ्या संख्येने होते. पोंभुर्णा येथील एमआयडीसीला ना.सुधीर मुनगंटीवार यांनी नुकतीच मंजूरी दिल्याबद्दल त्यांचे पोंभुर्णा तालुक्यातर्फे नागरिकांनी स्वागत केले. यावेळी साईबाबा ज्ञानपीठ कॉन्हेंटच्या मुलांनी सांस्कृतिक कार्यक्रमाची देखील सादरीकरण केले. या कार्यक्रमाचे प्रास्ताविक शोभा मडावी यांनी केले. तर संचालन शिक्षिका श्रीमती मुक्ता खुरानाविद्यार्थिनी साक्षी बनकरखुशबू घोडमोरे यांनी केले.
                                                                                0000

No comments:

Post a Comment