Search This Blog

Thursday, 1 November 2018

पीडित युगच्या वडिलांना ना.आठवले यांच्या हस्ते धनादेशाचे वाटप


चंद्रपूर, दि.1 नोव्हेंबर  ब्रम्हपूरी तालुक्यातील खंडाळा येथील रहिवासी अशोक केवळराम मेश्राम यांचा 2 वर्षाचा मुलगा युग यांची 22 ऑगस्ट 2018 रोजी जादूटोणा व गुप्तधन मिळवण्याच्या अंधश्रेध्देतून निर्दयी व अमानुषपणे गळा दाबून हत्या करण्यात आली होती. त्या खंडाळा गावाला केंद्रीय सामाजिक न्याय व सशक्तीकरण राज्यमंत्री ना.रामदास आठवले यांनी दिनांक 1 नोव्हेंबर रोजी सकाळी 10.45 वाजता मुलाचे वडिल अशोक मेश्राम  व त्यांचे कुटुंबीयांची घरी जाऊन भेट घेतली. यावेळी ना.आठवले यांनी अनुसूचित जाती, जमाती (अत्याचार प्रतिबंध) कायदा 1989 अंतर्गत नुकसानभरपाई म्हणून मंजूर करण्यात आलेले 4 लक्ष 12 हजार 500 रुपयाचा अर्थसहाय्याचा धनादेश युगचे वडील अशोक मेश्राम यांना सुपूर्द करुन त्यांचे व कुटुंबीयांचे सांत्वन केले.  ही घटना माणुसकीला काळीमा फासणा-या व अत्यंत निंदणीय असलेल्या या हत्या प्रकरणाचा ना.आठवले यांनी अत्यंत कठोर शध्दात निषेध केला. यावेळी माजी आमदार अतुल देशकर, समाज कल्याण सहायक आयुक्त प्रसाद कुळकर्णी व इतर कार्यकर्ते उपस्थित होते.
                                                                                00000

No comments:

Post a Comment