Search This Blog

Monday, 26 November 2018

आजपासून जिल्हयामध्ये गोवर रुबेला लसीकरण मोहिमेला सुरुवात


100 टक्के लसीकरण करण्याचे
जिल्हाधिकारी डॉ.कुणाल खेमनार यांचे आवाहन
  
चंद्रपूरदि.26 नोव्हेंबर- चंद्रपूर जिल्हयामध्ये उदया दिनांक 27 नोव्हेंबर मंगळवारपासून गोवर रुबेला लसीकरण मोहिमेला सुरुवात होत आहे. उद्या दुर्गापूर येथे दुपारी 12 वाजता जिल्हा परिषद अध्यक्ष देवराव भोंगळे, जिल्हाधिकारी डॉ.कुणाल खेमनार, मुख्य कार्यकारी अधिकारी जितेंद्र पापळकर यांच्या हस्ते तर महानगरपालिका हद्दीमध्ये नेताजी चौकातील सावित्रीबाई फुले शाळेमध्ये महापौर अंजलीताई घोटेकर व मनपा आयुक्त संजय काकडे यांच्या हस्ते लसीकरणाचा शुभारंभ होणार आहे. 
चंद्रपूर जिल्हयातील गोवर रुबेला लसीकरणाच्या 100 टक्के अमंलबजावनीसाठी संपूर्ण यंत्रणा सज्ज झाली आहे.  यामध्ये 100 टक्के शाळापालक व वैदयकिय व्यवसायिकांनी सहभागी होणार असून जिल्हयातील  9 महिने ते 15 वर्ष वयोगटातील मुले-मुंली गोवर, रुबेला लसीकरणापासून वंचित राहणार नाही, याची काळजी घेण्याचे आवाहन प्रशासनाने केले आहे.
भारत सरकारने सन 2020 सालापर्यंत गोवर या आजाराचे निर्मूलन व रुबेला या आजाराचे नियंत्रण  करण्याचे उद्दिष्ट ठेवले आहे.  त्यानुसार 27 नोव्हेंबर  2018 पासून महाराष्ट्रात गोवर रुबेला लसीकरण मोहिम आयोजित करण्यात आली आहे. या मोहिमे अंतर्गत 9 महिने ते 15 वर्ष वयोगटातील सर्व मुलां-मुलींना लसीकरण करण्याचे लक्ष निर्धारीत केले आहे. सदर मोहिम 5 आठवडयाच्या कालावधीमध्ये राबविण्यात येणार आहे. यात जिल्हातील सर्व शाळा,सरकारी, निमसरकारीखाजगीअनुदानित, विनाअनुदानित, आश्रम शाळामदरसेसिबीएससीआयसीएससी, केंद्रीय विदयालय इत्यादी शाळामध्ये पहिल्या दोन ते तिन आठवडयात व त्यानंतर अंगणवाडी केंद्र व सर्व सरकारी आरोग्य संस्थेत मोफत लसीकरण करण्यात येणार आहे. अशा प्रकारे 5 आठवडे सदर मोहिम जिल्हयात राबविण्यात येणार आहे. सदर मोहिम आरोग्य विभागासोबतच, शिक्षण विभाग, एकात्मिक बालविकास विभाग यांचे समन्वयाने राबविण्यात येत आहे. याकरीता लायन्स क्लब, रोटरी क्लबआयएएम, आयएपी,  निमा, युनानी या संस्थांचे सहकार्य लाभत आहे.
चंद्रपूर जिल्हयाची शहरी व ग्रामिण क्षेत्र मिळुण एकूण लोकसंख्या  22,31,090 आहे. सदर लसीकरण मोहिमेअंतर्गत 9 महिने ते 15 वर्ष वयोगटातील ग्रामीण/अर्बन भागातील 4,43582 व कार्पोरेशन भागातील 83,870 असे एकूण 5,27,452 मुलां-मुलींना  3244 शाळेच्या माध्यमातून तर 2306 अंगणवाडी/बाहयसत्रअंतर्गत मिळून असे एकूण 5550 सत्राचे नियोजित करुन लसीकरण करण्याचे उद्दिष्ट ठेवण्यात आले असून या मोहिमेत 100 टक्के लसीकरणाचे करण्याचे  निर्धारीत केले आहे.
                                                            000  

No comments:

Post a Comment