पालकमंत्री विजय वडेट्टीवार यांचा चंद्रपूर जिल्हा दौरा
चंद्रपूर, दि. 28 एप्रिल : राज्याचे आपत्ती व्यवस्थापन, मदत व पुनर्वसन, इतर मागास बहुजन कल्याणमंत्री तथा चंद्रपूर जिल्ह्याचे पालकमंत्री विजय वडेट्टीवार जिल्ह्याच्या दौऱ्यावर असून त्यांचा दौरा कार्यक्रम पुढीलप्रमाणे आहे.
शुक्रवार दि. 29 एप्रिल रोजी चंद्रपूर येथील विविध विषयांबाबत नागपूर येथे बैठक, शनिवार, दि. 30 एप्रिल 2022 रोजी सकाळी 11 वाजता ग्रामीण रुग्णालय, सावली येथे आगमन व आरोग्य शिबिराचे उद्घाटन कार्यक्रमास उपस्थिती, दिव्यांग प्रमाणपत्र कार्यक्रमास उपस्थिती, तसेच जिल्हा समाज कल्याण विभाग चंद्रपूरच्या वतीने दिव्यांगांना तीन चाकी सायकल वितरण कार्यक्रमास उपस्थित. दुपारी 12 वाजता सावली शहरातील रस्त्यांचे भूमिपूजन व अग्निशमन वाहनाचे लोकार्पण सोहळ्यास उपस्थित. दुपारी 1 ते 2 वाजेपर्यंतचा वेळ राखीव. दुपारी 2:15 वाजता व्याहाड बुज, ता. सावली येथे आगमन व सांत्वनपर भेट. दुपारी 2.30 वाजता कापसी ता. सावली येथे आगमन, सदिच्छा व सांत्वनपर भेट. दुपारी 4.30 वाजता शासकीय विश्रामगृह, ब्रह्मपुरी येथे आगमन. सायंकाळी 5 वाजता विठ्ठल रखुमाई सभागृह, ब्रह्मपुरी येथे समाज कल्याण विभाग, चंद्रपूरच्या वतीने दिव्यांगांना तीन चाकी सायकल वितरण कार्यक्रमास उपस्थिती. रात्री 9:30 वाजता हिराई विश्रामगृहृ, ऊर्जानगर, चंद्रपूर येथे आगमन व मुक्काम.
रविवार दि. 1 मे 2022 रोजी, सकाळी 8 वाजता पोलीस मैदान, चंद्रपूर येथे महाराष्ट्र दिनानिमित्त शासकीय ध्वजारोहण कार्यक्रमास उपस्थिती. सकाळी 9:30 वाजता चंद्रपूर येथून चातगाव ता. धानोरा जि. गडचिरोलीकडे प्रयाण. सायंकाळी 4:30 वाजता शासकीय विश्रामगृह, सिंदेवाही येथे आगमन. सायंकाळी 5 वाजता सिंदेवाही शहरातील विविध विकास कामाचे भूमिपूजन व कार्यक्रमास उपस्थिती. (सिंदेवाही शहरातील मुख्य रस्त्याचे चौपदरीकरण, सिमेंट काँक्रीट रस्त्याचे भूमिपूजन, विश्रामगृहाच्या संरक्षण भिंतीचे बांधकाम भुमिपुजन, क्रीडा संकुलाचे भूमिपूजन , समाज कल्याण विभाग, चंद्रपूरच्या वतीने दिव्यांगांना तीन चाकी सायकल वितरण कार्यक्रम, स्मशानभूमी परिसरातील विकासकामाचे लोकार्पण तसेच आठवडी बाजार विविध विकास कामांचे लोकार्पण कार्यक्रमास उपस्थिती). रात्री 8 वाजता सिंदेवाही येथून नागपूरकडे प्रयाण.
०००००००
No comments:
Post a Comment