पालकमंत्री विजय वडेट्टीवार यांचा चंद्रपूर जिल्हा दौरा
चंद्रपूर, दि. 1 एप्रिल : राज्याचे आपत्ती व्यवस्थापन, मदत व पुनर्वसन, इतर मागास बहुजन कल्याणमंत्री तथा चंद्रपूर जिल्ह्याचे पालकमंत्री विजय वडेट्टीवार जिल्ह्याच्या दौऱ्यावर असून त्यांचा दौरा कार्यक्रम पुढीलप्रमाणे आहे.
शनिवार, दि. 2 एप्रिल 2022 रोजी दुपारी 12.45 वाजता शासकीय विश्रामगृह, ब्रह्मपुरी येथे आगमन व राखीव. दुपारी 1 वाजता विठ्ठल रुक्मिणी सभागृह, ब्रह्मपुरी येथे सरपंच, पंचायत समिती, जिल्हा परिषदेचे माजी सदस्य व पदाधिकारी यांच्या बैठकीस उपस्थिती. दुपारी 3.30 वाजता मौजा अड्याळ तुकुम ता. ब्रह्मपुरी येथे विपश्यना केंद्रास भेट. सायंकाळी 4.15 वाजता शासकीय विश्रामगृह, ब्रह्मपुरी येथे आगमन व तालुक्यातील विकास कामांच्या आढावा बैठकीस उपस्थिती. सायंकाळी 5 वाजता शासकीय विश्रामगृह, ब्रह्मपुरी येथे अभ्यांगतांना भेटीसाठी राखीव. सायंकाळी 6 वाजता ब्रह्मपुरी येथून नागपूरकडे प्रयाण.
रविवार, दि. 3 एप्रिल 2022 रोजी दुपारी 12 वाजता यवतमाळ येथून चंद्रपूर कडे प्रयाण. दुपारी 2.30 वाजता शासकीय विश्रामगृह, चंद्रपूर येथे आगमन व राखीव. दुपारी 3 वाजता विश्वकर्मा भवन, मुल रोड, चंद्रपूर येथे लोहार समाज पोटजाती विकास संस्था, चंद्रपूर तर्फे विदर्भस्तरीय वधू-वर परिचय मेळावा व विश्वकर्मा जयंती महोत्सवास उपस्थिती. सायंकाळी 6 वाजता शासकीय विश्रामगृहात चंद्रपूर येथे अभ्यांगतांना भेटीसाठी राखीव. रात्री 8 वाजता हिराई विश्रामगृह, ऊर्जानगर, चंद्रपूर येथे आगमन व मुक्काम.
सोमवार, दि. 4 एप्रिल 2022 रोजी सकाळी 10 वाजता इरई नदीच्या खोलीकरण व सौंदर्यीकरण कामाचे भूमिपूजन कार्यक्रमास उपस्थिती. सकाळी 11:30 वाजता जिल्हा परिषद, चंद्रपूर येथे जिल्हा परिषदेच्या विकास कामासंदर्भात सर्व विभाग प्रमुखांसोबत आढावा बैठक. दुपारी 1 ते 1.30 वाजेपर्यंतचा वेळ राखीव. दुपारी 1:30 वाजता जिल्हाधिकारी कार्यालयातील वीस कलमी सभागृहात ताडोबा सफारी गेट सुशोभीकरणाचे सादरीकरण. दुपारी 2.30 वाजता जिल्हाधिकारी कार्यालयातील वीस कलमी सभागृहात कामगारांच्या विविध समस्या संदर्भात सर्व सीमेंट प्लांट प्रमुख व कामगार प्रतिनिधींची बैठक. सायंकाळी 5 वाजता चंद्रपूर येथील बोटॅनिकल गार्डनला भेट व पाहणी. सायंकाळी 6.30 वाजता चंद्रपूर येथून नागपूरकडे प्रयाण.
00000
No comments:
Post a Comment