एकलव्य मॉडेल रेसिडेंशियल पब्लिक स्कूलमध्ये प्रवेश घेण्याचे आवाहन
Ø आवेदन पत्र सादर करण्याची अंतिम मुदत 30 एप्रिलपर्यंत
चंद्रपूर दि. 20 एप्रिल : आदिवासी विकास विभागांतर्गत चंद्रपूर प्रकल्पात कार्यान्वित असलेल्या एकलव्य मॉडेल रेसिडेंशियल स्कूल, देवाडा येथे इयत्ता 6 वीत प्रवेश घेऊ इच्छिणाऱ्या व इयत्ता 7 वी व 8 वी वर्गातील अनुशेष भरून काढण्यात येत आहे.
त्यासोबतच सन 2021-22 या शैक्षणिक वर्षात इयत्ता 5 वी तसेच 6 वी व 7 वीच्या वर्गातील शासकीय व अनुदानित आश्रमशाळा, जिल्हा परिषद, नगरपालिका, महानगरपालिका व इतर शासन मान्यताप्राप्त प्राथमिक व माध्यमिक शाळेत शिक्षण घेत असलेल्या परंतु ज्या अनुसूचित जमातीच्या पालकांचे वार्षिक उत्पन्न सरासरीपेक्षा कमी आहे, अशाच अनुसूचित जमातीच्या विद्यार्थ्यांना स्पर्धा परीक्षेस प्रविष्ठ होण्याकरिता आवेदन पत्र मागविण्यात येत आहे.
सदर आवेदन पत्र शासकीय अनुदानित आश्रमशाळा, शासकीय वसतिगृह व प्रकल्प कार्यालय, चंद्रपूर येथे उपलब्ध आहेत. सदर स्पर्धा परीक्षेचे आयोजन रविवार, दि. 5 जून 2022 रोजी सकाळी 11 ते 1 या वेळेत करण्यात आले आहे. आवेदन पत्र सादर करावयाचा अंतिम दि. 30 एप्रिल 2022 पर्यंत असून आवेदन पत्र आपल्या जवळच्या नमूद ठिकाणी सादर करावे. अनुसूचित जमातीतील अपंग विद्यार्थ्यांसाठी 3 टक्के जागा तर आदिम जमातीच्या विद्यार्थ्यांसाठी 5 जागा आरक्षित राहतील.
याकरिता शासकीय, अनुदानित आश्रमशाळा, जिल्हा परिषद, नगरपालिका व इतर व शासनमान्य प्राथमिक, माध्यमिक शाळांचे मुख्याध्यापकांनी जास्तीत जास्त विद्यार्थी प्रविष्ठ करावे, असे आवाहन सहाय्यक जिल्हाधिकारी तथा एकात्मिक आदिवासी विकास प्रकल्प कार्यालयाचे प्रकल्प अधिकारी रोहन घुगे यांनी केले आहे.
०००००००
No comments:
Post a Comment