Search This Blog

Tuesday 22 December 2020

नैसर्गिक आपत्तीमुळे बाधीत क्षेत्राची पाहणीसाठी केंद्रीय पथक 25 डिसेंबरला जिल्ह्याच्या दौऱ्यावर

 नैसर्गिक आपत्तीमुळे बाधीत क्षेत्राची पाहणीसाठी

केंद्रीय पथक 25 डिसेंबरला जिल्ह्याच्या दौऱ्यावर

चंद्रपूर, दि. 22 डिसेंबर : नैसर्गिक आपत्तीमुळे बाधित झालेल्या क्षेत्राची पाहणी करण्याकरिता दिनांक 25 डिसेंबर 2020 रोजी केंद्रीय पथक जिल्ह्यात भेट देवून पाहणी करणार आहे.

केंद्रीय पथक महाराष्ट्राच्या विविध जिल्ह्यात 20 ते 26 डिसेंबर 2020 या कालावधीत पाहणी करणार आहे. या केंद्रीय पथकाचे प्रमुख राष्ट्रीय आपत्ती व्यवस्थापन प्राधिकरण, नवी दिल्ली चे सह सचिव रमेश कुमार घंटा हे आहेत. पथकात नवी दिल्ली येथील केंद्र शासनाच्या ग्राम विकास विभागाचे उप सचिव यश पाल, केंद्रीय वित्त मंत्रालयाचे आर.बी.कौल, कृषी विभाग नागपूरचे संचालक आर.पी. सिंग, नवी दिल्ली येथील रस्ते वाहतूक व महामार्ग मंत्रालयाचे मुख्य अभियंता तुषार व्यास, जलशक्ती नागपूरचे अधीक्षक अभियंता महेंद्र सहारे यांचा समावेश आहे.

            केंद्रीय पथकाचे दिनांक 25 डिसेंबर 2020 रोजी सकाळी 11 वा. ब्रम्हपुरी तालुक्यातील लाडज येथे गडचिरोलीहून आगमन होईल व तेथील पाहणी करून दुपारी 12.30 वा. पिंपळगाव, दु. 13.30 वा. बेटाडा व सायंकाळी 4 वा. बेलगाव येथील बाधित क्षेत्राची पाहणी करतील. सायंकाळी 4.45 वाजता नागपूरकडे प्रयाण करतील.

0000

No comments:

Post a Comment