Search This Blog

Wednesday, 23 December 2020

26 डिसेंबरला जिल्हास्तरीय युवा महोत्सवाचे गुगलमिटवर आयोजन

 26 डिसेंबरला जिल्हास्तरीय युवा महोत्सवाचे गुगलमिटवर आयोजन

 

चंद्रपूर, दि.23 डिसेंबर : जिल्ह्यातील 15 ते 29 वर्ष वयोगटतील युवक व युवतींसाठी जिल्हास्तरीय युवा महोत्सवाचे आयोजन दि. 26 डिसेंबर 2020 रोजी ऑनलाइन पद्धतीने करण्यात येणार असून यासाठी स्पर्धकांना 24 डिसेंबर पर्यंत प्रवेशीका सादर करायच्या आहेत..

युवा मोहत्सवात लोकनृत्य, लोकगीत, एकांकिका (इंग्रजी / हिंदी), शास्त्रीय गायन (हिंदुस्थानी किंवा कर्नाटकी ), सितार वादन, बासरी वादन, तबला वादन, विणा वादन, मृदूंग, हार्मोनियम (लाईट),  गिटार, मनिपुरी नृत्य, ओडिसी नृत्य, भरतनाट्यम, कथ्थक, कुचिपुडी नृत्य या बाबींचा समावेश राहणार आहे.

 इच्छुक स्पर्धकांनी आपल्या प्रवेशिका जिल्हा क्रिडा कार्यालयात 24 डिसेंबर रोजी सायं. 5 वाजेपर्यंत प्रत्यक्ष जमा कराव्यातअधिक माहिती करिता भ्रमणध्वणी क्रमांक 9975591175, 9545858975 यावर संपर्क साधावा, असे जिल्हा क्रिडा अधिकारी अब्दुल मुश्ताक यांनी कळविले आहे.

0 0 0 0

No comments:

Post a Comment