Search This Blog

Saturday 12 December 2020

गत 24 तासात 248 कोरोनामुक्त

 


गत 24 तासात 248 कोरोनामुक्त

86 नव्याने पॉझिटिव्ह ; दोन मृत्यू

 

Ø आतापर्यंत 20,091 बाधित झाले बरे

Ø उपचार घेत असलेले बाधित 841

 

चंद्रपूर, दि. 12 डिसेंबर : जिल्ह्यात कोरोनावर मात करणाऱ्या नागरिकांच्या संख्येने 20 हजाराचा टप्पा ओलंडला आहे. तसेच ॲक्टीव पॉ‍झिटीव्ह रुग्णांच्या संख्येत देखील झपाट्याने घट होत असून महिण्याभरापुर्वी 2500 वर असलेली ॲक्टीव पॉ‍झिटीव्ह रुग्णांची संख्या आता 841 वर आल्याने नागरिकांना काहीसा दिलासा मिळाला आहे. 

गत 24 तासात 248 जणांनी कोरोनावर मात केल्याने त्यांना रुग्णालयातून सुटी देण्यात आली आहे. तर 86 कोरोनाबाधीत रुग्णांची नव्याने भर पडली असून दोन कोरोनाबाधीतांचा मृत्यू झाला आहे.

जिल्ह्यात आतापर्यंत एकूण बाधितांची संख्या 21 हजार 266 वर पोहोचली आहे. तसेच सुरवातीपासून आतापर्यंत बरे झालेल्यांची संख्या 20 हजार 91 झाली आहे. सध्या 841 बाधितांवर उपचार सुरू आहे. जिल्ह्यात आतापर्यंत एक लाख 59 हजार 784 नमुन्यांची तपासणी करण्यात आली असून त्यापैकी एक लाख 36 हजार 398 नमुने निगेटीव्ह आले आहेत.

आज मृत झालेल्यांमध्ये नगीनाबाग, चंद्रपूर येथील 83 वर्षीय पुरूष व गडचिरोली जिल्ह्यातील 65 वर्षीय महिलेचा समावेश आहे. जिल्ह्यात आतापर्यंत 334 बाधितांचे मृत्यू झाले असून यापैकी चंद्रपूर जिल्ह्यातील 307, तेलंगणा एक, बुलडाणा एक, गडचिरोली 16, यवतमाळ सात, भंडारा एक आणि वर्धा येथील एका बाधिताचा समावेश आहे.

आज बाधीत आलेल्या 86 रुग्णांमध्ये चंद्रपूर महानगर पालीका क्षेत्रातील 27, चंद्रपूर तालुक्यातील नऊ, बल्लारपुर तीन, भद्रावती सहा, ब्रम्हपुरी सात, नागभीड पाच, सिंदेवाही दोन, मुल पाच, सावली एक, राजुरा सात, चिमुर तीन, वरोरा सहा, कोरपना तीन तसेच इतर ठीकाणच्या दोन रुग्णांचा समावेश आहे.

नागरिकांनी स्वत:च्या आरोग्याबाबत जागरूक राहावे, बाहेर निघतांना नियमितपणे मास्कचा वापर करावा, वेळोवेळी हात स्वच्छ करावे तसेच प्रशासनाने घालून दिलेल्या नियमांचे पालन करावे, असे आवाहन जिल्हाधिकारी अजय गुल्हाने यांनी केले आहे.

0000 

No comments:

Post a Comment