Search This Blog

Wednesday 16 December 2020

ग्रामपंचायत निवडणूक : उमेदवारांना जात वैधता पडताळणीबाबत सूचना

 ग्रामपंचायत निवडणूक : उमेदवारांना जात वैधता पडताळणीबाबत सूचना

चंद्रपूर,दि. 16 डिसेबर: ग्रामपंचातीमधील मागास प्रवर्गासाठी राखीव जागांवर निवडणूक लढविण्यास इच्छुक असलेल्या व ज्यांच्याकडे जात वैधता प्रमाणपत्र नाही अशा सर्व मागासवर्गीय उमेदवारास आवाहन करण्यात येते की, दि. 1 ऑगस्ट 2020 पासून जात वैधता प्रमाणपत्रासाठी अर्ज सादर करावयाच्या प्रक्रियेत बदल करण्यात आलेला आहे. जात वैद्यता प्रमाणपत्रासाठी आपले अर्ज www.bartievalidity.maharashtra.gov.in या संकेतस्थळावरुन आवश्यक दस्ताऐवजसह अपलोड केल्यानंतर ऑनलाईन सबमीट करावेत.

राज्य निवडणूक आयोगाने राज्यातील 14 हजार 234 ग्रामपंचायतीच्या सार्वत्रिक निवडणुकांचा कार्यक्रम घोषित केलेला असून त्यामध्ये चंद्रपूर जिल्ह्यातील 629 ग्रामपंचायतीचा समावेश आहे.

ऑनलाईन अर्ज सबमीट केल्यानंतर त्यांची छापील प्रत, सर्व दस्ताऐवज व पुरावे, मुळ प्रतिज्ञापत्र व फार्म 15-ए संबंधीत निवडणूक प्राधिकारी यांचे सही व शिक्क्यानीशी जिल्हा जात प्रमाणपत्र पडताळणी समिती, चंद्रपूर येथे सादर करावेत. तसेच जुन्या पध्दतीने हस्तलिखित अर्ज स्वीकारले जाणार नाही, असे जिल्हा जात प्रमाणपत्र पडताळणी समितीचे उपायुक्त विजय वाकुलकर यांनी केले आहे.

000000

No comments:

Post a Comment