Search This Blog

Friday 18 February 2022

चाईल्ड लाईन व जिल्हा बाल संरक्षण कक्षाच्या सतर्कतेने बालविवाह रोखण्यात यश

चाईल्ड लाईन व जिल्हा बाल संरक्षण कक्षाच्या सतर्कतेने बालविवाह रोखण्यात यश

चंद्रपूर दि. 17 फेब्रुवारी : जिवती तालुक्यातील एका गावात अल्पवयीन मुलीचे लग्न होणार असल्याची माहिती चाईल्ड लाईनच्या 1098 या हेल्पलाईन क्रमांकावर मिळाली. त्याअनुषंगाने जिल्हा बाल संरक्षण कक्ष व चाईल्ड लाईन, चंद्रपूर यांच्या सतर्कतेने सदर बालविवाह थांबविण्यात आला.

चाईल्ड लाईन चंद्रपूरच्या संचालिका नंदाताई अल्लूरवार, सरचिटणीस प्रभावती मुठाळ यांच्या मार्गदर्शनात सदर कार्यवाही करण्यात आली. गावातील पोलीस पाटील यांच्या सहकार्याने सदर बालिकेच्या घरी जाऊन बालविवाह होऊ न देणे याकरिता समज देत पालकांचे समुपदेशन केले व बालविवाह करण्यापासून रोखले. तसेच मुलीला व मुलीच्या पालकांना बालकल्याण समिती, चंद्रपूर समोर उपस्थित करण्यात आले.

घटनास्थळी चाईल्ड लाईन,चंद्रपुर टीमच्या सदस्या चित्रा चौबे, कल्पना फुलझेले, प्रदीप वैरागडे, समूपदेशिका दिपाली मसराम, जिल्हा बाल संरक्षण कक्षाच्या सामाजिक कार्यकर्ता प्रतिभा मडावी, प्रीती उंदीरवाडे तसेच सदर गावातील पोलीस पाटील, अंगणवाडी कार्यकर्त्या प्रामुख्याने उपस्थित होते. या केसमध्ये चाईल्ड लाईन चंद्रपूरचे समन्वयक अभिषेक मोहुर्ले, जिल्हा बाल संरक्षण अधिकारी अजय साखरकर, रेखा घोगरे, प्रणाली इंदुरकर, नक्षत्रा मुठाळ आदींचे सहकार्य लाभले.

जिल्ह्यात होत असलेले बालविवाह संदर्भात माहिती देणाऱ्या व्यक्तीचे नाव पूर्णतः गुपित ठेवण्यात येते. बालविवाह संदर्भात माहिती तसेच काळजी व संरक्षणाची गरज असणारे 0 ते 18 वर्षे वयोगटातील बालकांना मदत करण्याकरिता चाईल्ड लाईनच्या 1098 या हेल्पलाईन क्रमांकावर संपर्क साधण्याचे आवाहन चाईल्ड लाईन, चंद्रपूर मार्फत करण्यात आले आहे.

00000 

No comments:

Post a Comment