जिल्हयातील तलाठी व मंडळ अधिकारी संवर्गातील कर्मचाऱ्यांचे प्रशिक्षण
चंद्रपूर, दि. 28 फेब्रुवारी : शासनसेवेत सर्व स्तरावर कार्यक्षमता वाढवून गतिमान प्रशासन होण्याकरिता सर्व शासकीय अधिकारी व कर्मचारी यांना प्रशिक्षण देण्याकरिता दि. 23 सप्टेंबर 2011 च्या शासन निर्णयान्वये महाराष्ट्र राज्याचे प्रशिक्षण धोरण निश्चित करण्यात आले आहे. तसेच सेवेतील विविध टप्प्यावर प्रशासनिक व सेवाअंतर्गत प्रशिक्षण सक्तीचे करण्यात आले आहे. त्यास अनुसरून दि. 18 व 19 फेब्रुवारी 2022 रोजी जिल्ह्यातील एकूण 273 तलाठी, 51 मंडळ अधिकारी संवर्गातील कर्मचाऱ्यांची प्रियदर्शनी इंदिरा गांधी सांस्कृतिक सभागृह,चंद्रपूर येथे कार्यालयीन कामकाजाच्या अनुषंगाने प्रशिक्षण सत्र आयोजित करण्यात आले होते.
दि. 18 फेब्रुवारी रोजी, जिल्हाधिकारी अजय गुल्हाने यांच्या अध्यक्षतेखाली प्रशिक्षणाची सुरुवात करण्यात आली. प्रशिक्षण देण्याकरिता जिल्ह्यातील कार्यरत उपजिल्हाधिकारी यांची व्याख्याता म्हणून निवड करण्यात आली. दि. 18 व 19 फेब्रुवारी रोजी, मंडळ अधिकारी व तलाठी संवर्गातील नियमित कामकाजाच्या अनुषंगाने 7/12 चे संगणकीकरण व त्याचे महत्त्व, गाव नमुना 1 ते 21 अद्यावत करून त्यासंबंधीची कार्यपद्धती, शर्तभंग प्रकरणे, भोगवटदार वर्ग 2 मधून 1 करणे, एनएपी-34/36 ची कार्यपद्धती व तलाठी यांची भूमिका, पांदण रस्ते मोकळे करणे व विहीर नोंदीबाबत माहिती, ई- फेरफार, ई- चावडी, ई-हक्क प्रणाली , शासकीय जमीन सार्वजनिक प्रयोजनार्थ वाटप कार्यपद्धती, शासकीय जमीन विल्हेवाट, कलम 42 अ,ब,क,ड बाबत माहिती व तलाठयांची भूमिका या विषयावर प्रशिक्षण देण्यात आले.
00000
No comments:
Post a Comment