ऑनलाईन शिष्यवृत्ती अर्जास 28 फेब्रुवारीपर्यंत मुदतवाढ
चंद्रपूर, दि. 17 फेब्रुवारी : आदिवासी विकास विभागामार्फत सन 2021-22 या शैक्षणिक वर्षातील भारत सरकार पोस्ट मॅट्रीक शिष्यवृत्ती, शिक्षण फी, परीक्षा फीचे ऑनलाईन अर्ज भरण्यासाठी mahadbtmahait.gov.in हे संकेतस्थळ दि. 15 डिसेंबर 2021 पासून सुरू करण्यात आले असून दि. 28 फेब्रुवारी 2022 पर्यंत मुदतवाढ देण्यात आली आहे.
सन 2021-22 या वर्षाकरिता अनुसूचित जमातीच्या जास्तीत जास्त विद्यार्थ्यांना भारत सरकार पोस्ट मॅट्रिक शिष्यवृत्ती, शिक्षण फी, परीक्षा फी तसेच व्यावसायिक अभ्यासक्रम प्रतिपूर्ती योजनांचा लाभ घेता यावा, याकरिता पात्र विद्यार्थ्यांकडून संकेतस्थळावर ऑनलाईन अर्ज मागविण्यात येत आहे. तसेच सर्व महाविद्यालयांनी त्यांच्या महाविद्यालयात प्रवेशित अनुसूचित जमातीच्या विद्यार्थ्यांचे महाडीबीटी या संकेतस्थळावर परिपूर्ण ऑनलाईन अर्ज भरून कार्यालयात सादर करण्यात यावे. असे एकात्मिक आदिवासी विकास प्रकल्प कार्यालयाचे, प्रकल्प अधिकारी रोहन घुगे यांनी कळविले आहे.
00000
No comments:
Post a Comment