Search This Blog

Friday, 4 February 2022

एकात्मिक फलोत्पादन विकास अभियान व राष्ट्रीय कृषि विकास योजनेंतर्गत महा-डीबीटी या संगणकीय प्रणालीवर अर्ज भरण्यास मुदतवाढ

 

एकात्मिक फलोत्पादन विकास अभियान व राष्ट्रीय कृषि विकास योजनेंतर्गत महा-डीबीटी या संगणकीय प्रणालीवर अर्ज भरण्यास मुदतवाढ

चंद्रपूर, दि. 4 फेब्रुवारी : महाडीबोटी पोर्टलवर "शेतकरी योजना"या सदराखाली शेतकऱ्यांच्या सोयीकरिता सर्व योजनांचा लाभ "एकाच अर्जाद्वारे" देण्याच्या दृष्टिने अर्ज करण्यापासून ते प्रत्यक्ष लाभ मिळेपर्यंत एकात्मिक संगणकीय प्रणाली विकसित केली आहे. या प्रणालीद्वारे शेतकऱ्यांना त्यांच्या पसंतीच्या बाबींच्या निवडीचे स्वातंत्र्य देण्यात आले असून शेतकऱ्यांनी शेती निगडीत विविध बाबींकरिता अर्ज करावयाचा आहे.

महाडीबीटी पोर्टलचे https://mahadbtmahait.gov.in हे संकेतस्थळ असून शेतकऱ्यांनी या संकेतस्थळावरील "शेतकरी योजना" हा पर्याय निवडावा. शेतकरी स्वतःच्या मोबाईल, संगणक,लॅपटॉप, टॅबलेट, सामुदायिक सेवा केंद्र (सिएससी), ग्रामपंचायतीतील संग्राम केंद्र इ. माध्यमातून उक्त संकेतस्थळावर जाऊन अर्ज करू शकतील.

वैयक्तिक लाभार्थी म्हणून नोंदणी करू इच्छिणाऱ्या सर्व शेतकऱ्यांना त्यांचा आधार क्रमांक सदर संकेतस्थळावर प्रमाणित करून घ्यावा लागेल. ज्या वापरकर्त्याकडे आधार क्रमांक नसेल त्यांनी प्रथम आधार नोंदणी केंद्राकडे जाऊन त्यांची नोंदणी करावी व सदर नोंदणी क्रमांक महाडीबीटी पोर्टलमध्ये नमूद करून त्यांना योजनांसाठी अर्ज करता येईल. अशा अर्जदारांना अनुदान वितरीत करण्यापूर्वी महाडीबीटी पोर्टलमध्ये त्यांना देण्यात येणारा आधार क्रमांक नोंदणीकृत करून प्रमाणित करून घ्यावा लागेल. त्याशिवाय त्यांना अनुदानाचे वितरण करण्यात येणार नाही.

ड्रगन फूट, तेंदू फळ, सुटी फुले, हळद, आले, मिरची, सामुहिक शेततळे, शेततळे अस्तरीकरण, हरितगृह,

शेडनेट हाऊस, प्लास्टिक मल्चिंग, मधुमक्षिका वसाहत, मधुमक्षिका संच वाटप, ट्रॅक्टर, पावर टिलर 8 एचपी पेक्षा कमी व पावर टिलर 8 एचपी पेक्षा जास्त, जमिन सुधारणा,मशागत उपकरणे, पिक संरक्षण उपकरणे, पॅक हाऊस, प्राथमिक प्रक्रिया केंद्र, कांदाचाळ, फिरते विक्री केंद्र इत्यादी बाबींकरीता पोर्टलवरील प्राप्त अर्जाची ऑनलाईन लॉटरी, पूर्व संमती देणे, मोका तपासणी तसेच निवड झालेल्या लाभार्थ्यांच्या खात्यावर थेट अनुदान वितरण करणे इ. सर्व प्रक्रिया ऑनलाईन होणार आहे.

महाडीबीटी पोर्टलवर माहिती भरण्याची कार्यवाही सुरु आहे. यापूर्वीच अर्जदारांनी माहिती भरली असल्यास पुन्हा भरण्याची आवश्यकता नाही. मात्र, लाभाच्या घटकांमध्ये शेतकरी बदल करू शकतात. ज्या शेतकरी बांधवांनी महाडीबीटी पोर्टलवर कृषीविषयक योजनांचा लाभ मिळविण्यासाठी अद्याप अर्ज केला नसेल, त्यांनी आपले अर्ज महाडीबीटी पोर्टलवर भरावेत. प्राप्त सर्व अर्ज लॉटरीसाठी ग्राह्य धरले जातील.

तरी, सर्व इच्छुक शेतकऱ्यांनी महाडीबीटी पोर्टलवर नाव नोंदणी करावी व अधिक माहितीसाठी संबंधित नजीकच्या तालुका कृषी अधिकारी कार्यालयाशी संपर्क साधावा. असे जिल्हा अधिक्षक कृषी अधिकारी भाऊसाहेब बऱ्हाटे यांनी केले आहे.

00000

No comments:

Post a Comment