Search This Blog

Friday 26 January 2018

चंद्रपूरातील अत्‍याधुनिक बसस्‍थानक 18 महिन्‍यात जनतेच्‍या सेवेत रूजु होणार – ना. सुधीर मुनगंटीवार






16 कोटी रू. किंमतीचे बसस्‍थानकाच्‍या कामाचा भुमीपूजन सोहळा संपन्‍न

चंद्रपूर, दि.26 जानेवारी- सन 2015 चा अर्थसंकल्‍प सादर करताना एसटी बसस्‍थानकांचा चेहरामोहरा बदलण्‍याची घोषणा अर्थमंत्री म्‍हणून मी केली होती. या घोषणेला अनुसरून चंद्रपूरातील मुख्‍य बसस्‍थानकाचे आधुनिकीकरण व नुतनीकरणासाठी 16 कोटी रू. निधी मंजूर केला. आज या कामाचे भूमीपूजन पाच सेवानिवृत्‍त कर्मचा-यांच्‍या शुभहस्‍ते करताना मला मनापासुन आनंद होत आहे. बल्‍लारपूर आणि मुल या ठिकाणच्‍या बसस्‍थानकांचे आधुनिकीकरण व नुतनीकरणाचे काम सुध्‍दा सुरू करण्‍यात आले आहे. यापुढील काळात पोंभुर्णानागभीडचिमूरगोंडपिपरीकोरपनाघुग्‍गुस सर्वच ठिकाणची बसस्‍थानके देखणी होतील. बसेसच्‍या खरेदीसाठी विशेष निधी आपण उपलब्‍ध केला आहे. नव्‍या बसेस मधील 10 टक्‍के नव्‍या बसेस चंद्रपूर आणि गडचिरोली या जिल्‍हयांमध्‍ये देण्‍याबाबत आपण परिवहन मंत्री दिवाकर रावते यांना सांगीतले आहे. चंद्रपूरातील बसस्‍थानक आधुनिक स्‍वरूपात 18 महिन्‍यांच्‍या कालावधीत नागरिकांच्‍या सेवेत रूजु होईलअसे प्रतिपादन राज्‍याचे वित्‍तनियोजन आणि वनमंत्री तथा चंद्रपूर जिल्‍हयाचे पालकमंत्री सुधीर मुनगंटीवार यांनी केले.
दिनांक 26 जानेवारी रोजी चंद्रपूर येथील मुख्‍य बस स्‍थानकाच्‍या आधुनिकीकरण व नुतनीकरणाच्‍या कामाचे भुमीपूजन पाच सेवानिव़त्‍त एसटी कर्मचा-यांच्‍या शुभहस्‍ते करण्‍यात आले. यावेळी ना. सुधीर मुनगंटीवार बोलत होते. यावेळी केंद्रीय गृहराज्‍यमंत्री ना. हंसराज अहीरआमदार नानाजी शामकुळेवनविकास महामंडळाचे अध्‍यक्ष चंदनसिंह चंदेलजिल्‍हा परिषदेचे अध्‍यक्ष देवराव भोंगळेमहापौर सौ. अंजली घोटेकरबल्‍लारपूरचे नगराध्‍यक्ष हरीश शर्मामनपाचे स्‍थायी समितीचे सभापती राहूल पावडेएसटीचे विभाग नियंत्रक कार्तीक सहारेविभागीय अभियंता राहूल मोडकवार आदींची प्रामुख्‍याने उपस्थिती होती.
यावेळी बोलताना ना.सुधीर मुनगंटीवार पुढे म्‍हणालेहजारों, लाखो शहीदांच्‍या बलिदानानंतर स्‍वातंत्र्याचा मंगलकलश आपल्‍या हाती आला. हा मंगलकलश चिरंतन काळ अबाधित ठेवण्‍याची जबाबदारी भारतीय नागरीक म्‍हणून आपली आहे. नुकत्‍याच झालेल्‍या कृषी महोत्‍सवात आपण वनावर आधारित कौशल्‍य विकास केंद्र जिल्‍हयात आणण्‍याची घोषणा मी केली होती. यासंदर्भात मी नुकतीच केंद्रीय कौशल्‍य विकास मंत्री धर्मेंद्र प्रधान यांची भेट घेतली. आपले सादरीकरण पाहुन त्‍यांनी कौशल्‍य विकास केंद्रासाठी 70 कोटी रूपयांचा निधी मंजूर केला. टाटा ट्रस्‍ट सोबत झालेल्‍या करारानुसार 90 कोटी रू. किंमतीचे कॅन्‍सर हॉस्‍पीटल जिल्‍हयात आपण उभारत आहोत. शासकीय वैद्यकिय महाविद्यालयबॉटनिकल गार्डनसैनिकी शाळापोलिस प्रशिक्षण केंद्र अशी विकासकामांची मोठी मालिका आपण तयार केली आहे. 200 एकर जागेत गोंडवाना विद्यापीठाचे उपकेंद्र उभे राहत आहे. बल्‍लारपूरमुल येथे स्‍टेडियमची बांधकामे सुरू होत आहेत. चंद्रपूरात पाच मोकळया जागांचा विकास करून त्‍यासाठी उद्याने निर्माण करण्‍यात आली आहे. पोंभुर्णा येथे भारतरत्‍न अटलबिहारी वाजपेयी यांच्‍या नावाने इको पार्क निर्माण करण्‍यात आले आहे. विकास प्रक्रिया सर्वसमावेशक असावी यावर आपला नेहमीच भर राहिला आहेअसेही ना. सुधीर मुनगंटीवार यावेळी बोलताना म्‍हणाले.

सबका साथ सबका विकास या ब्रीदानुसार पालकमंत्र्यांचे कार्य
– ना. हंसराज अहीर
उत्‍तम रस्‍तेस्‍टेडियमपिण्‍याचे पाणीबसस्‍थानकेपुलइमारती अशा विविध पायाभूत सुविधांना अग्रक्रम देत पालकमंत्री सुधीर मुनगंटीवार जिल्‍हयाच्‍या विकासाला गती देत आहेत. मा. पंतप्रधानांच्‍या सबका साथ सबका विकास या ब्रीदानुसार पालकमंत्री सुधीर मुनगंटीवार या जिल्‍हयाला विकासाच्‍या मार्गावर अग्रेसर करीत आहे. गेल्‍या तीन दिवसांपासुन विकासकामांचे भूमीपूजन व लोकार्पणाचा धडाका त्‍यांनी सुरू केला आहे. येत्‍या काळात या जिल्‍हयाचा चेहरामोहरा बदलेल व हा जिल्‍हा राज्‍यातला प्रमुख विकसित जिल्‍हा म्‍हणून नावारूपास येईलअसे प्रतिपादन केंद्रीय गृहराज्‍यमंत्री हंसराज अहीर यांनी केले.

ना.  सुधीर मुनगंटीवार हे खरे विकासपुरूष – आमदार नानाजी शामकुळे

चांदा ते बांदा ही संकल्‍पना ना. सुधीर मुनगंटीवार यांनी मांडली व त्‍याला अनुसरून चंद्रपूर जिल्‍हयाच्‍या विकासाला वेग दिला. वनविभागाला नवी ओळख त्‍यांनी मिळवून दिली. कधीकाळी 25 कोटी रूपये या जिल्‍हयाच्‍या विकासासाठी मिळणे कठीण जात होते. त्‍या जिल्‍हयात आज 600 कोटी रू. किंमतीचे मेडीकल कॉलेज उभे राहते65 कोटी रू. किंमतीचा दाताळा येथील पुलाचे बांधकाम मंजूर होते16 कोटी रू. किंमतीचे बसस्‍थानकाचे बांधकाम मंजूर होते. ना. सुधीर मुनगंटीवार हे ख-या अर्थाने विकासपुरूष असल्‍याचे प्रतिपादन आ. शामकुळे यांनी यावेळी बोलताना केले.

जिल्‍हा विकासाच्‍या वाटेवर अग्रेसर – देवराव भोंगळे

गेल्‍या तीन दिवसांपासुन कोटयावधींच्‍या विकासकामांची भुमीपूजने व शुभारंभाचे कार्यक्रम सुरू आहेत. महाराष्‍ट्रामध्‍ये चंद्रपूर हा जिल्‍हा विकासाचे आदर्श उदाहरण म्‍हणून पुढे येत आहे. आरोग्‍यशिक्षणपर्यावरणपिण्‍याचे शुध्‍द पाणीरोजगार या सर्व बाबींना प्राधान्‍य देत पुढील 50 वर्षांचा दृष्‍टीकोन ना.  सुधीर मुनगंटीवार यांनी पुढे ठेवून या जिल्‍हयाला विकासाच्‍या वाटेवर पुढे आणले आहेअसे प्रतिपादन जिल्‍हा परिषदेचे अध्‍यक्ष देवराव भोंगळे यांनी केले.
यावेळी स्‍वातंत्र्य संग्राम सैनिक शंकरलाल लांजेवार यांचा सत्‍कार करण्‍यात आला. ज्‍यांनी या बसस्‍थानकाचे संकल्‍पचित्र तयार केले आहे ते आर्कीटेक्‍ट  किशोर चिददरवार यांचेही स्‍वागत करण्‍यात आले. कार्यक्रमाचे प्रास्‍ताविक विभाग नियंत्रक कार्तीक सहारे यांनी केले. आभार प्रदर्शन विभागीय अभियंता राहूल मोडकवार यांनी तर संचालन शीतल गौड यांनी केले. निवृत्‍त एसटी कर्मचा-यांचे स्‍वागत या कार्यक्रमादरम्‍यान करण्‍यात आले. एसटी कर्मचारी संघटनाबसस्‍टॅन्‍ड कर्मचारी संघटनाऑटोरिक्षा संघटनाग्रामीण पत्रकार संघ आदी संघटनांनी ना. सुधीर मुनगंटीवार यांचा सत्‍कार केला. कार्यक्रमाला शहरातील नागरिकांची मोठया संख्‍येने उपस्थिती होती.
                                                            000

No comments:

Post a Comment