चंद्रपूर,
दि.8 फेब्रुवारी- राज्याचे वित्त, नियोजन व वनमंत्री तथा चंद्रपूर जिल्हयाचे
पालकमंत्री ना.सुधीर मुनगंटीवार हे 10 व 11 फेब्रुवारी 2018 रोजी चंद्रपूर जिल्हयाच्या दौ-यावर येत
असून त्यांचा दौरा कार्यक्रम पुढील प्रमाणे आहे.
10 फेब्रुवारी रोजी सकाळी 9.45 वाजता
नागपूर येथून चंद्रपूरकडे प्रयाण करुन चंद्रपूर येथे दुपारी 12.15 वाजता आगमन व
राखीव. दुपारी 3 वाजता आगरझरी येथील बटरफ्लाय उद्यान उदघाटन समारंभास उपस्थिती.
त्यानंतर सायं.5.30 वाजता भारतरत्न डॉ.एपीचे अब्दुल कलाम उद्यान चंद्रपूर येथे
चंद्रपूर शहर अंतर्गत रस्त्यांवरील स्ट्रीट लाईटचे लोकार्पण. सायं.7.30 वाजता घुग्गुस येथे पालकमंत्री चषक
कार्यक्रमास उपस्थित राहून चंद्रपूर येथे मुक्काम राहणार आहे.
तर 11 फेब्रुवारी रोजी सकाळी 10 वाजता
इंदिरा नगर येथे संकल्प संस्थेने आयोजित केलेल्या कार्यक्रमास उपस्थिती. सकाळी 11
ते 2 वाजेपर्यंत श्यामाप्रसाद मुखर्जी वाचनाल चंद्रपूर येथे रामदेव बाबा यांच्या
कार्यक्रमाबाबत कोअर टिमच्या बैठकीस उपस्थित. त्यानंतर दुपारी 3 ते 5 या वेळात
श्यामाप्रसाद मुखर्जी वाचनाल चंद्रपूर येथे रामदेव बाबा यांच्या कार्यक्रमाच्या
व्यवस्थेबाबत बैठकीस उपस्थित राहून सायं.5.30 वाजता नागपूरकडे प्रयाण करतील.
000
No comments:
Post a Comment