Search This Blog

Tuesday, 20 February 2018

जे विकते ते पिकवायला शिका... योगगुरू रामदेव महाराज यांची शेतकऱ्यांना सूचना




रामदेव महाराज यांनी द्रोणाचार्याच्या भूमिकेतून
शेतक-यांना मार्गदर्शन करावे : मुनगंटीवार

चंद्रपूर दि. 20 फेब्रुवारी -  चंद्रपूर व विदर्भ परिसरातील शेतकऱ्यांनी एका पिकावर न राहता आता वनौषधी आणि दुग्ध उत्पादनाकडे वळावे. मला वनौषधींची गरज आहे. मी खरेदी करायला तयार आहे. त्यामुळे जे विकल्या जाते ते पिकवायला सुरूवात करून स्वत:ला व देशाला बळकट करण्याचे आवाहन योगगुरू बाबा रामदेव महाराज यांनी आज येथे केले.
          चंद्रपूर तालुक्यातील मुल येथे 2021 व 22 असे तीन दिवस बाबा रामदेव महाराज यांचे योगाभ्यास शिबीराचे आयोजन राज्याचे वित्तनियोजन व वने मंत्री सुधीर मुनगंटीवार यांच्या पुढाकाराने करण्यात आले आहे. 20 फेब्रुवारीला दुपारच्या सत्रात आयोजीत शेतकरी मेळाव्याला ते संबोधीत करीत होते. या मेळाव्याला चंद्रपूर-गडचिरोली जिल्हातील हजारो शेतकऱ्यांची उपस्थिती होती. मेळाव्याच्या व्यासपीठावर पालकमंत्री सुधीर मुनगंटीवार यांच्यासह केंद्रीय गृहराज्यमंत्री हंसराज अहीर,वनविकास महामंडळाचे अध्यक्ष चंदनसिंह चंदेलखासदार अशोक नेतेजिल्हा परिषद अध्यक्ष देवराव भोंगळेमहापौर अंजली घोटेकरबल्लारपूरचे नगराध्यक्ष हरीष शर्मामाजी आमदार अतुल देशकर यांची उपस्थिती होती.
          यावेळी रामदेव महाराज यांनी शेतक-यांशी संवाद साधला. हा देश ऋषी आणि कृषीचा आहे. त्यामुळे आज बदलत्या काळात देशाचा सन्मान आणि महत्व टिकवून ठेवायचे असेल तर काही बदल शेतीतही करणे गरजेचे आहे. मला माझे पुढचे आयुष्य शेतक-यांच्या उत्थानासाठी खर्च करायचे आहे. त्यामुळे आता जे काही मला विकायचे आहे. त्यासाठी लागणारा कच्चा माल आपल्या शेतात घ्यायला सुरुवात करा. एका पिकावर आता शेतक-यांचे भले होणार नाही. त्यामुळे जे विकायचे आहेजे विकले जाणार आहे तेच पिकवायला शिकाअसे आग्रही आवाहन त्यांनी केले.
          आपल्या विविध उत्पादनासाठी कोरफोड(अलवेरा)मधगुडवेलअशा कितीतरी उत्पादनाची आवश्यकता आहे. ज्या चंद्रपूर व परिसरात सहज पिकवणे शक्य आहे. पतंजली सध्या 1 कोटी शेतक-यांशी विविध वनौषधी उत्पादनातून जुळले गेले आहे. 2025 पर्यंत 5 कोटी शेतक-यांशी जुळण्याची आमची रणनिती असून वरील उत्पादन तुम्ही शेतीत घ्या. मी सर्व उत्पादन योग्य बाजार भावात थेट शेतातून खरेदी करायला तयार असल्याचे त्यांनी सांगितले.

          नागपूरमधील मिहानमध्ये मोठया क्षमतेचे संत्रा प्रक्रीया उद्योग उभा केला आहे. विदर्भातील एकही  संत्र यामुळे वाया जाणार नाही. मात्र मी त्या ठिकाणी तयार केलेल्या प्रक्रिया उद्योगाला मोठया प्रमाणात संत्र्याशिवाय अलवेराआवळा आदींची गरज आहे. शेतक-यांच्या भरीव व आवश्यक  उत्पादनाच्या माध्यमातून भारताला महासत्ता बनविण्याचा पतंजलीचा मानस असून पुढील काळात दुग्ध उत्पादनातही आमची कंपनी आपला वाटा वाढवणार आहे. त्यामुळे दुध मोठया संख्येने लागणार आहे. शेतक-यांनी दुग्ध व्यवसायाच्या जोड धंदयाला आपलेसे करावेअसेही आवाहन त्यांनी यावेळी केले.
          आगामी काळात सर्व विदेशी कंपन्यांना परत फिरावे लागेले. पतंजलीच्या दर्जा व सामाजिक भानामुळे ही बाब शक्य आहे. त्यामुळे आपला पैसा आपल्याच भल्यासाठी वापरायचा आहे. शेतक-यांनी या बदलाचे पाईक व्हावेअसेही त्यांनी शेवटी सांगितले. आपल्या भाषणाच्या उत्तरार्धात त्यांनी उपस्थित शेतकरी जनसमुदायाला योग शिक्षणही दिले.
          तत्पूर्वी शेतक-यांच्या मेळाव्याला संबोधित करतांना पालकमंत्री सुधीर मुनगंटीवारी यांनी चंद्रपूर जिल्हयाची विविध क्षेत्रातील वेगळेपण रामदेव महाराज यांच्या पुढे मांडले. गेल्या काही वर्षात चंद्रपूरमध्ये पायाभूत सुविधामध्ये बदल झाले असून कृषीरोजगार सिंचन याकडे विविध प्रकल्पातून लक्ष वेधल्याची त्यांनी सांगितले. विसापूर जवळ तयार करण्यात येत असलेल्या बॉटनिकल गार्डनमध्ये विविध वनोषधीवनस्पती यांचा अभ्यास होणार आहे. पतंजलीच्या माध्यमातून या ठिकाणी रामदेव महाराज यांनी एखादे संशोधन केंद्र उभारावेअसे आवाहन त्यांनी केले. या परिसरातील शेतकरी एकलव्यांसारखा मेहनती असून या शेतक-यांना द्रोणाचार्य बनून मार्गदर्शन करावेअसे आवाहनही त्यांनी केले.
          यावेळी केंद्रीय गृहराज्यमंत्री हंसराज अहीर यांनी उपस्थितांना संबोधीत करतांना स्वत:च्या कर्तृत्वावर कोटयावधीचा व्यवसाय करुन दाखवणा-या रामदेव महाराज यांनी त्यांच्या या कौशल्‍याचे ज्ञान गरीब शेतक-यांना दयावेअसे आवाहन केले. जगात जे यशस्वी ठरले आहे . त्या योगगुरूच्या  मार्गदर्शनाचा निश्चितच येथील शेतक-यांना लाभ होईलअसे स्पष्ट केले.
          खासदार अशोक नेते यांनी चंद्रपूर प्रमाणेच मोठया प्रमाणात गडचिरोली जिल्हा वनाच्छादित असून येथील वनौषधीला देखील पतंजलीने न्याय दयावा. या भागात उद्योगव्यवसाय वाढावाअसे आवाहन केले.
जिल्हा परिषदेचे अध्यक्ष देवराव भोंगळे यांनी या कार्यक्रमाचे प्रस्ताविक व सुत्रसंचालन केले. यावेळी जिल्हयातील गुणवंत शेतक-यांचा सन्मानही करण्यात आला. या कार्यक्रमाला शेतकरी मोठया संख्येने उपस्थित होते .    
                                      0000

No comments:

Post a Comment