‘ मूल ’ मध्ये दुसऱ्या दिवशीही हजारोंच्या उपस्थितीत योगसाधना
चंद्रपूर, दि.21 फेब्रुवारी- मल्लखांब, सारखे मर्दानी खेळाचे आकार्षण, व्यायाम शाळाचे जाळे आणि बलाची उपासना करण्याची संताची शिकवण यामुळे महराष्ट्राच्या मातीतच व्यायामाची संस्कृती रुजती आहे, असे गौरवदृगार योगगुरु बाबा रामदेव महाराज यांनीआज काढले. मूल शहरात 20 फेब्रुवारीपासून सुरु झालेल्या योगाशिबीराला दुसऱ्या दिवशीही सर्व क्षेत्रातील मान्यवरासह हजारो नागरिकांनी उत्साहात गर्दी केली होती.
चंद्रपूर मूल संपूर्ण जिल्हयामध्ये सध्या योगसाधणेचे चैतन्य संचारले आहे. योग शिबीरासाठी देशभरातून अनेक नागरिक चंद्रपूर-मूल येथे आले असून आज पालकमंत्री सुधीर मुनगंटीवार यांच्यासह वर्धाचे खासदार रामदास तडस देखील योग साधनेमध्ये पूर्णवेळ सहभागी झाले होते.
योग शिक्षण देतानाच योगगुरु यांनी आयुर्वेद आणि व्यायामाच्या अनेक अंगावर प्रकाश टाकला व सतत दोन तास त्यांनी प्रात्यक्षिक करताना आपल्या प्राचीन योग कलेची महती आणि आरोग्य जपण्यासाठी पूर्वज करीत असलेल्या उपाययोजना याबद्दल प्रबोधन केले.
आजच्या योग साधनेच्या उत्तरार्धात चंद्रपूर येथील विठ्ठल मंदिर व्यायाम शाळेच्या विद्यार्थ्यांनी मल्लखांब विद्येचे चित्तथराक प्रदर्शन केले. या मल्लखांबपटूचा बाबा रामदेव महाराज यांनी सत्कार केला. यावेळी त्यांनी समर्थ रामदास स्वामी यांच्यासारख्या महाराष्ट्रातील अन्य अनेक थोर संतानीच राज्यामध्ये बलाची उपासणा करण्याचे मार्गदर्शन अनेक वर्षापासून केले आहे. महाराष्ट्र हा मर्दानी खेळाला आपल्या मातीत घेऊन वाढला आहे. त्यामुळे बलाची उपासना महाराष्ट्राच्या मातीची परंपरा आहे,असे प्रतिपादन केले.
महाराष्ट्रामध्ये खेळाला, व्यायामाला गावागावमध्ये प्राधान्य दिले जाते. त्यामुळे योग शिबीरांना या ठिकाणी उत्तम प्रतिसाद मिळतो. महाराष्ट्रातून योग प्रशिक्षणासाठी मोठया प्रमाणात प्रशिक्षक तयार झाले असल्याचे त्यांनी सांगीतले.
बाबा रामदेव यांच्यामुळे प्रकृती स्वास्थ : खासदार तडस
वर्धाचे खासदार आणि सुप्रसिध्द कुस्तीपट्टू खासदार रामदास तडस हे सुध्दा पालकमंत्री सुधीर मुनगंटीवार यांच्या समवेत पहाटे 5 पासून योग शिबारात शिबीरार्थी म्हणून उपस्थितीत होते. ते नियतिम योगाभ्यास करतात. बाबा रामदेव योग शिबीराच्या उत्तरार्धात शिबीरार्थीना व्यायामाचे झालेले फायदे याबाबत संवाद साधतात. यावेळी खासदार रामदास तडस यांनी सुध्दा काही वर्षापूर्वी त्यांना झालेल्या त्रासाबदल आणि बाबा रामदेव यांनी केलेल्या मार्गदर्शनाबद्दल आभार मानले. शरीर स्वास्थासाठी रामदास तडस यांनी हरिद्वार येथे जाऊन बाबा रामदेव यांच्याकडून योग-उपचार केले होते. बाबा रामदेव यांच्या योगसाधनेच्या माध्यमातून विविध आजारातून बाहेर पडलेल्या अनेक व्यक्तींनी त्यांना आलेल्या अनुभवाची माहिती दिली. यामध्ये देशभरातील शिबीरार्थीचे अनुभव ऐकता आले.
उदया वरोरातील
कृषी प्रदर्शनीला उपस्थिती
बाबा रामदेव महाराज यांच्या उपस्थितीत 20 फेब्रुवारीला शेतकरी मेळाळा, 21 फेब्रुवारीला महिला मेळावा तर 22 फेब्रुवारीला वरोरा येथील आनंदवन चौक परिसरात जिल्हा स्तरीय कृषी मेळावा आयोजित केला आहे. सकाळी 10 वाजता या कृषी मेळावा व प्रदर्शनीचे उदघाटन पालकमंत्री सुधीर मुनगंटीवार करणार असून या कार्यक्रमाचे अध्यक्ष केंद्रीय गृहराज्य मंत्री हंसराज अहीर असतील. जिल्हा परिषदेच्या कृषी सभापती अर्चना जीवतोडे या मेळाव्याच्या स्वागताध्यक्ष आहेत.
000
No comments:
Post a Comment