Search This Blog

Friday, 26 January 2018

विकास प्रक्रियेत माझाही महत्‍वपूर्ण सहभाग राहील हा संकल्‍प प्रत्‍येक नागरिकाने करावा – ना. सुधीर मुनगंटीवार यांचे आवाहन





 चंद्रपूरमध्ये प्रजासत्ताक दिनाला उल्लेखनीय कार्य करणा-यांचा सत्कार

चंद्रपूर, दि.26 जानेवारी- चंद्रपूर जिल्‍हा विकासाचे विविध टप्‍पे अनुभवत आहे. या जिल्‍हयाला विकासाच्‍या वाटेवर अग्रेसर करताना विकास प्रक्रियेत सर्वांनी सहभागी होण्‍याची आवश्‍यकता आहे. प्रजासत्‍ताक दिनी सिमेवर लढताना प्राणांची आहूती देणा-या वीरांचे स्‍मरण करताना आपण धर्मभेदजातीभेद न करता देशाप्रती आपले दायित्‍व पूर्ण करण्‍याची आवश्‍यकता आहे. प्रजासत्‍तादिनी जिल्‍हयाच्‍या विकासाला गती देण्‍याचा संकल्‍प करताना विकास प्रक्रियेत माझाही महत्‍वपूर्ण सहभाग राहील हा संकल्‍प प्रत्‍येक नागरिकाने करण्‍याचे आवाहन राज्‍याचे वित्‍तनियोजन व वनमंत्री तथा चंद्रपूर जिल्‍हयाचे पालकमंत्री सुधीर मुनगंटीवार यांनी केले.
दिनांक 26 जानेवारी प्रजासत्‍ताक दिनी चंद्रपूर येथे शासकीय ध्‍वजवंदन कार्यक्रमात ना.सुधीर मुनगंटीवार बोलत होते. यावेळी गृह, कृषी, क्रीडा, शिक्षण आदी विभागात उल्लेखनीय कार्य करणा-यांचा सत्कार करण्यात आला. यावेळी माजी केंद्रीय अर्थ राज्‍यमंत्री शांतारामजी पोटदुखेआ.नानाजी शामकुळे, जिल्‍हा परिषदेचे अध्‍यक्ष देवराव भोंगळेमहापौर सौ. अंजली घोटेकरमनपाचे स्‍थायी समिती सभापती राहूल पावडेउपमहापौर अनिल फुलझेलेजि.प. उपाध्‍यक्ष कृष्‍णा सहारेअतिरिक्‍त जिल्‍हाधिकारी सचिन कलंत्रेपोलिस अधिक्षक नियती ठाकरजिल्‍हा परिषदेचे मुख्‍य कार्यकारी अधिकार जितेंद्र पापळकर, माजी आमदार जैनुद्दीन जव्हेरी, स्वातंत्र्य सैनिक व विविध क्षेत्रातील मान्यवर उपस्थित होते.
यावेळी बोलताना ना.सुधीर मुनगंटीवार पुढे म्‍हणालेचंद्रपूर जिल्हा महाराष्‍ट्रात विकास प्रक्रियेत अग्रणी जिल्हा म्‍हणून लौकीक प्राप्‍त ठरण्‍याच्‍या दृष्‍टीने वाटचाल करीत आहे. मोठया प्रमाणावर विकासकामे जिल्‍हयात सुरू आहे. चंद्रपूर,बल्‍लारपूरमुल येथील बसस्‍थानकांचे आधुनिकीकरण व नुतनीकरणचंद्रपूर शहरात अमृत पाणीपुरवठा योजनाटाटा ट्रस्‍टच्‍या सहाय्याने कॅन्‍सर हॉस्‍पीटलजल साक्षरता केंद्रदुग्‍धव्‍यवसाय व कुक्‍कुट पालनाचे प्रकल्‍पचंद्रपूर आणि बल्‍लारपूर येथील हरीत रेल्‍वे स्‍थानके म्‍हणून विकसित करणेशासकीय वैद्यकिय महाविद्यालयसैनिकी शाळाबांबु संशोधन व प्रशिक्षण केंद्रबॉटनिकल गार्डनताडोबा अंधारी व्‍याघ्र प्रकल्‍पाला जागतिक दर्जाचे पर्यटन स्‍थळ  करणेचिचडोहचिचाळा,पळसगांव आमडी यासारखे सिंचन प्रकल्‍प असे अनेक विकासकामे व प्रकल्‍प मंजूर झाले असून काही प्रगतीपथावर आहेत. हॅलो चांदा सारखा पालकमंत्री तक्रार निवारण यंत्रणेचा अभिनव प्रयोग देशात चंद्रपूरमध्ये सुरु आहे. हा जिल्‍हा राज्‍यासाठी विकासाचे मॉडेल ठरेल याचा मला विश्‍वास आहेअसेही ते यावेळी बोलताना म्‍हणाले.
ध्‍वजवंदन कार्यक्रमानंतर विविध शाळांचे संचालनपथकदंगानियंत्रण पथकॲम्ब्युलन्ससीसीटिव्‍ही व्‍हॅन, मोबाईल फॉरेंसिक लॅब, जिल्‍हा विकास स्‍वच्‍छता मिशन आदीं‍ विषयीचे चित्ररथांना मानवंदना देण्यात आली. यामध्ये सर्वांचे पालकमंत्री सुधीर मुनगंटीवार यांनी कौतुक केले. यावेळी विविध शाळांच्‍या विद्यार्थ्‍यांनी कवायती व प्रात्‍याक्षिके सादर केली. कार्यक्रमाचे संचालन अशोक सिंह उपाख्य मोंटू सिंग यांनी केले. कार्यक्रमाला शहरातील गणमान्‍य नागरिकांची मोठया संख्‍येने उपस्थिती होती. 
          यावेळी  चंद्रपूर येथील न्यु.इंग्लिश हायस्कूल, सिटी हायस्कूल, जनता हायस्कूल, नेहरु विद्यालय, लोकमान्य टिळक कन्या विद्यालय, एफ.ई.एस.गर्ल्स हायस्कूल. छोटूभाई  पटेल हायस्कूल.रफी अहमद किदवाई हायस्कूल. स्व.बापुरावजी वानखेड विद्यालय, सिध्दार्थ विद्यालय,  हिंदी माध्यमिक विद्यालय, मातोश्री विद्यालय, भवानजीभाई चव्हाण हायस्कुल व नुतन माध्यमिक विद्यालय, हिंदी सिटी हायस्कुल, लोकमान्य टिळक विद्यालयाच्या मुला-मुलींनीच्या चमुनी सामुहिक कवायत, लेक्षीम प्रात्यक्षिके व सामूहिक बांबूड्रिल सादर केलीत. तर फेरिलॅड इंग्लिश स्कुल भद्रावतीच्या मुलांनी खडीमास पिटी बँड सादर केली.
          या कार्यक्रमामध्ये पोलिस उपनिरीक्षक विनोद तिवारी (राष्ट्रपती पदक प्राप्त), सतिश सोनेकर (विशेष सेवा पदक प्राप्त), विनित घागे (विशेष सेवा पदक प्राप्त), आणि सीटीएनएस कार्यप्रणातील उत्कृष्ट काम केल्याबद्दल चंद्रकांत लांबट, पोलीस शिपाई गोपाल पिंपळशेंडे, पोलीस क्रीडा स्पर्धेतील उल्लेखनीय कामासाठी चेतन जाधव, अमृता चक्रे, मिलींद आत्राम, वैशाली पाटील, लतिका मिसार, प्रिती महाजन, दिव्या कलीये यांना पोलीस दलामध्ये उत्कृष्ट कामगिरी केल्याबद्दल पालकमंत्र्यांनी गौरवान्वित केले. तर वसंतराव नाईक कृषीभूषण पुरस्कार दत्तात्रय गणपतराव गुंडावार मु.चिंचाळा, गुणवंत जिल्हा क्रीडा पुरस्कार चैताली कन्नाके, अनिल ददगाळ, सुरेश अडपेवार यांना पालकमंत्री याच्याहस्ते प्रमाणपत्र देवून सन्मान करण्यात आला. याशिवाय स्वच्छ भारत मिशन वक्तृत्व स्पर्धोसाठी पायल पिलारे, प्रशिक मानके यांना पुरस्कार देण्यात आला. तर माझी कन्या भाग्यश्री योजनेच्या विभागीय स्पर्धेतील निवडीसाठी पायल वाळके, पायल मेश्राम, ललिता शिंदे, सोनुताई जाधव, निखिता मेश्राम यांचा गौरव करण्यात आला.
                                                          000

No comments:

Post a Comment