Search This Blog

Sunday 4 July 2021

पालकमंत्री वडेट्टीवार यांच्या पुढाकाराने ब्रम्हपूरी क्षेत्रातील रस्त्यांच्या कामासाठी 11 कोटी रूपयांचा निधी मंजूर

 


पालकमंत्री वडेट्टीवार यांच्या पुढाकाराने ब्रम्हपूरी क्षेत्रातील रस्त्यांच्या कामासाठी 11 कोटी रूपयांचा निधी मंजूर

Ø पुरामुळे खराब झालेल्या रस्त्यांची आता तातडीने होणार दुरुस्ती

चंद्रपूरदि. 4 - ब्रह्मपुरी उपविभाग अंतर्गत ब्रम्हपूरीसावली आणि सिंदेवाही तालूक्यातील ग्रामीण भागातील काही रस्ते रहदारीस अयोग्य असल्यामुळे हे रस्ते तातडीने दुरुस्त करण्यासाठी आवश्यक असलेला 11 कोटी रूपयांचा निधी राज्याचे आपत्ती व्यवस्थापनमदत व पुनर्वसन मंत्री तथा जिल्ह्याचे पालकमंत्री विजय वड़ेट्टीवार यांनी प्रशासकीय मान्यतेसह उपलब्ध करून दिला आहे.

सदर रस्त्यांसाठी निधी उपलब्ध होण्यासाठी पालकमंत्री श्री. वडेट्टीवार यांनी कार्यकारी अभियंता सार्वजनिक बांधकाम विभागनागभीड यांना शासनाकडे सर्वे करुन प्रस्ताव सादर करण्यासाठी सुचना केल्या होत्या. शासनाकडे प्रस्ताव प्राप्त होताच पालकमंत्र्यांच्या पाठपुराव्यामुळे ब्रम्हपूरी क्षेत्रातील ब्रम्हपूरीसावली व सिंदेवाही तालुक्यातील विविध विकास कामासाठीरस्ते व पूल निरिक्षण व दुरुस्ती कार्यक्रम सन 2021-22 अंतर्गत 11 कोटी 2 लक्ष रुपयांच्या कामांना प्रशासकीय मान्यतेसह निधी उपलब्ध करुन देण्यात आला आहे. पालकमंत्र्यांच्या पाठपुराव्यामुळे नागरिकांना मोठा दिलासा मिळाला असून त्यांचे सर्वत्र अभिनंदन होत आहे.

पालकमंत्र्यांनी नुकताच ब्रम्हपूरीसावली व सिंदेवाही तालूक्यातील गावांचा दौरा करून गावातील अडीअडचणीबाबत नागरिकांसोबत चर्चा केली. या भागातील विविध विकासकामासंदर्भात व ग्रामीण भागातील रस्तेरहदारीस अयोग्य झाल्यामुळे हे रस्ते दुरुस्त करण्यासाठी संबधित यंञणेला सर्वे करुन प्रस्ताव सादर करण्यास सांगितले होते. सर्व प्रस्ताव शासनाकडे सादर होताच निधीसह प्रशासकीय मान्यता मिळण्यासाठी त्यांनी पुढाकार घेतला. सन 2021-22 अंतर्गत रस्ते दुरुस्ती कार्यक्रम या योजनेंतर्गत ब्रम्हपूरी तालुक्यातील मेंडकीटेकरीजावराबोडीजुगनाडाबेटाळासोनेगावसावलगावचिखलगावलाडज रस्ता सिडी वर्क व पोचमार्गासह पूरहाणीमुळे दुरस्ती करणे 1 कोटी रुपयेब्रम्हपूरी तालुक्यातील रामा ते मालडांगरीधामणगाववायगावगोवारपेठराजोली रस्ता दुरस्ती करणे 1 कोटी 50 लक्ष रुपयेसावली तालुक्यातील बुजसामदादेवटोक ते केरोडा व्याहाडबुजसामदा बुजसोनापूरपेटगावउपरी रस्ता दुरस्ती करणे 1 कोटी 10 लक्ष रुपयेसावली तालुक्यातील रामा ते उसरपार चकपालेबारसासायखेडागेवराबुजईजिमा ते बारसागडमेहाबुज ते रामाला जोडणारा रस्ता दुरुस्ती करणे 1 कोटी 50 लक्ष रुपयेसावली तालुक्यातील आकापूरकरोलीविहिरगावनिफंद्राला जोडणारा रस्ता दुरस्ती करणे 62 लक्ष रुपयेसावली तालुक्यातील बोथलीसावलीसिर्सी हरंबाउपरीकापसी व्याहाड रस्ता दुरस्ती करणे 90 लक्ष रुपयेसावली तालुक्यातील बोथलीसावलीसिर्सी हरंबाउपरीकापसी व्याहाड रस्ता दुरस्ती करणे 1 कोटी रुपयेसिंदेवाही तालुक्यातील पेटगावराजोलीतांबेगडीमेंढा रस्ता दुरस्ती करणे 1 कोटी 30 लक्ष रुपये व इतर विकास कामांकरीता अशा प्रकारे 11 कोटी 2 लक्ष रुपये निधी मंजूर करुन या कामास प्रशासकीय मान्यता देण्यात आलेली आहे.

पालकमंत्री वड़ेट्टीवार यांनी याबाबत सांगितले कीया क्षेत्रातील अविकास असलेल्या भागाचा विकास करणेहे या भागाचा आमदार म्हणून आपले प्रथम प्राधान्य आहे. विकासाचा उदेश समोर ठेवून काम सुरु केले त्यात मोठया प्रमाणात यश आले. गेल्या साडेसहा वर्षापासून या भागात करोडो रुपयांची विकासकामे मंजूर करुन चौफेर विकास करण्यात येत आहे. मात्र गेल्या वर्षीच्या मार्च महिन्यापासून कोरोनाच्या प्रादुभावामूळे विकासकामांना सुरुवात करता आली नाही. गेल्या वर्षीपासून तर आतापर्यत मंजूर करण्यात आलेले सर्व विकासकामे येत्या काही दिवसात सुरु होणार असून या क्षेत्राच्या सर्वांगिन विकासासाठी कठीबध्द आहेअसे त्यांनी म्हटले आहे.

00000

No comments:

Post a Comment