Search This Blog

Thursday 15 July 2021

पशुसंवर्धन पायाभूत सुविधा विकास निधीयोजनेच्या लाभासाठी लाभार्थ्यांनी ऑनलाईन प्रस्ताव सादर करावे -पशुसंवर्धन आयुक्त सचिन्द्र प्रताप सिंह

 

पशुसंवर्धन पायाभूत सुविधा विकास निधीयोजनेच्या लाभासाठी लाभार्थ्यांनी ऑनलाईन प्रस्ताव सादर करावे -पशुसंवर्धन आयुक्त सचिन्द्र प्रताप सिंह

चंद्रपूर दि.15 जुलै : केंद्र शासनाने सन 2020-21 या वर्षापासून पशुसंवर्धन पायाभूत सुविधा विकास निधी या नविन योजनेस मंजूरी प्रदान केली असून सन 2021-22 या वर्षात या योजनेकरीता 15 हजार कोटी इतका निधी उपलब्ध करून देण्यात आला आहे. या योजनेअंतर्गत दूध प्रक्रिया (आईस्क्रिम, चीज निर्मिती, दृध पाश्चराईजेशन, दूध पावडर इ.), मांस निर्मिती व प्रक्रिया, पशुखाद्य, टीएमआर ब्लॉक्स, बायपास प्रोटीन, खनिज मिश्रण मुरघास निर्मिती, पशुपक्षी खाद्य विश्लेषण प्रयोगशाळा या उद्योग व्यवसायांना 90 टक्के कर्ज उपलब्ध करून देण्यात येणार असून, व्याज दरामध्ये 3 टक्के सुट देण्यात येणार आहे. तरी इच्छुक लाभार्थ्यांनी सदर योजनेच्या लाभासाठी प्रस्ताव ऑनलाईन स्वरुपात सादर करावे, असे आवाहन पशुसंवर्धन आयुक्त सचिंद्र प्रताप सिंह यांनी केले आहे.

सदर योजनेच्या सर्व मार्गदर्शक सूचना केंद्र शासनाच्या पशुपालन व डेअरी विभागाच्या http://dahd.nic.in/ahdt या संकेतस्थळावर उपलब्ध असुन विभागाच्या http://ahd.maharashtra.gov.in या संकेतस्थळावर लिंक उपलब्ध करुन देण्यात आली आहे.

लाभार्थ्यांनी सदर योजनेच्या लाभासाठी संकेतस्थळावरील पोर्टलद्वारे ऑनलाईन प्रस्ताव सादर करावयाचा आहे. केंद्र शासनाने नमुद उद्योग व्यवसायासोबतच लिंग विनिश्चित वीर्य मात्रा निर्मिती, बाह्य फलन केंद्र (आयव्हीएफ), पशुधनाच्या शुद्ध वंशावळीच्या प्रजातींचे संवर्धन याबाबींचा समावेश करण्यात आला आहे.योजनेचा व्यक्तीगत व्यावसायिक, शेतकरी उत्पादक संस्था, खाजगी संस्था, कलम 8 अंतर्गत स्थापन झालेल्या कंपन्यांना लाभ घेता येईल.

यासोबतच योजनेच्या मार्गदर्शक सूचना, योजनेसंदर्भात वारंवार उपस्थित होणारी प्रश्नोत्तरे, योजनेसाठी ऑनलाईन पध्दतीने सादर करावयाच्या अर्जाचा नमुना आणि आवश्यक कागदपत्रांची यादी, तसेच सदर योजनेबाबत अवगत करावे. आपल्या कार्यक्षेत्रातील जास्तीत जास्त व्यक्ती अथवा संस्था यांना सदर योजनेचा लाभ घेण्याबाबत प्रोत्साहित करावे असे पशुसंवर्धन आयुक्त सचिंद्र प्रताप सिंह यांनी कळविले आहे.

00000

No comments:

Post a Comment