27 डिसेंबरला ध्वनिक्षेपक व ध्वनिवर्धक रात्री 12 पर्यंत वापरासाठी मुभा
◆ राष्ट्रीय शालेय क्रीडा स्पर्धेनिमित्त विशेष सवलत
चंद्रपूर, दि. 26 : 67 व्या राष्ट्रीय शालेय मैदानी क्रीडा स्पर्धेचा उद्घाटन सोहळा व इतर सांस्कृतिक कार्यक्रमानिमित्त दिनांक 27 डिसेंबर रोजी ध्वनिक्षेपक व ध्वनीवर्धकाचा सकाळी 6 वाजेपासून ते रात्री 12 वाजेपर्यंत वापर करण्यास जिल्हाधिकारी तथा जिल्हा दंडाधिकारी विनय गौडा जी.सी. यांनी आज एका आदेशान्वये चंद्रपूर जिल्ह्याकरिता सवलत देण्यात येत असल्याचे आदेश निर्गमित केले आहे.
चंद्रपूर जिल्ह्याकरीता सन-2023 मधील राखीव सवलतीच्या दिवसातून ही सवलत मंजूर करण्यात आली आहे. निश्चित करण्यात आलेल्या सवलतीच्या दिवशी सक्षम प्राधिकाऱ्यांकडून परवानगी घेऊन व त्यांनी ठरवून दिलेल्या अटी व शर्ती प्रमाणेच ध्वनिक्षेपक व ध्वनीवर्धकाचा वापर करता येईल, असेही जिल्हा दंडाधिकारी यांचे आदेशात नमूद आहे.
0000000
No comments:
Post a Comment