Search This Blog

Sunday 24 December 2023

राष्ट्रीय शालेय क्रीडा स्पर्धेनिमित्त आज स्कूटर रॅली

 

राष्ट्रीय शालेय क्रीडा स्पर्धेनिमित्त आज स्कूटर रॅली

Ø खेळाडूंचा उत्साह वाढविण्यासाठी रॅलीत सहभागी होण्याचे आवाहन

चंद्रपूर दि.24 : 67 वी राष्ट्रीय शालेय मैदानी क्रीडा स्पर्धा दिनांक 26 ते 31 डिसेंबर या कालावधीत तालुका क्रीडा संकुल बल्लारपुर येथे संपन्न होत आहे. या स्पर्धेनिमित्त जिल्ह्यात येणाऱ्या खेळाडूंचा उत्साह वाढविण्यासाठी 25 डिसेंबर रोजी शहरात स्कूटर रॅलीचे आयोजन करण्यात आले आहे. नागरिकांनी या रॅलीत सहभागी होण्याचे आवाहन जिल्हा प्रशासनाने केले आहे.

सदर स्कुटर रॅली 25 डिसेंबर रोजी सकाळी 11 वाजता जिल्हा क्रीडा संकुल येथून निघणार आहे. जिल्हा स्टेडियम, वरोरा नाका, प्रियदर्शनी चौक, जटपुरा गेट, माता महाकाली मंदिर, बल्लारपूर शहर ब्राह्मणी फाटा असा रॅलीचा मार्ग राहणार असून तालुका क्रीडा संकुल बल्लारपूर येथे रॅलीचा समारोप होणार आहे.

या रॅलीत जिल्हाधिकारी विनय गौडा जी.सी., जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी विवेक जॉन्सन, महानगरपालीकेचे आयुक्त विपीन पालीवाल, जिल्हा पोलिस अधिक्षक रविंद्रसिंह परदेशी, सहायक जिल्हाधिकारी मुरुगानंथम एम., तसेच क्रीडा, वन, महसूल आणि इतर विभागाचे अधिकारी-कर्मचारी व  विविध क्रीडा संघटनांचे पदाधिकारी सहभागी होणार असल्याचे जिल्हा क्रीडा अधिकारी अविनाश पुंड यांनी कळविले आहे.

000000

No comments:

Post a Comment