जिल्हा कृषी महोत्सवात पशु
प्रदर्शन, चर्चा व परिसंवाद
Ø चांदा क्लब ग्राऊंड येथे 3 ते 7 जानेवारी 2024
दरम्यान आयोजन
चंद्रपूर, दि. 31 : कृषी तंत्रज्ञान व्यवस्थान यंत्रणा (आत्मा), कृषी विभाग व पशुसंवर्धन विभागाच्या संयुक्त विद्यमाने 3 ते 7 जानेवारी 2024 या कालावधीत चांदा क्लब ग्राऊंड येथे जिल्हा कृषी महोत्सवाचे (चांदा ॲग्रो 2024) आयोजन करण्यात आले आहे. यात शेतीविषयक
तंत्रज्ञानासोबतच पशु प्रदर्शनी, चर्चा व परिसंवाद, आदींचा समावेश आहे.
कृषी विषयक प्रदर्शन व शासकीय योजना
शेतक-यांपर्यंत पोहचविणे,
शेतकरी, शास्त्रज्ञ आणि संशोधन विस्तार विपणन साखळी सक्षम करणे, समुह / गट स्थापित करून शेतकरी उत्पादन कंपन्यांचे सक्षमीकरण करणे, कृषी विषयक शेतकरी संवाद आयोजित करून शेतक-यांच्या समस्यांचे निराकरण करणे, विक्रेता ते खरीददार संमेलनाचे आयोजन करून बाजाराभिमुख कृषी उत्पादनास चालना
देणे या उद्देशाने जिल्हा कृषी महोत्सवाचे आयोजन करण्यात येत आहे.
कृषी प्रदर्शन : शासकीय दालने, विविध कंपन्या,
खाद्यपदार्थ व
प्रात्याक्षिके यांचा समावेश. परिसंवादमध्ये कृषी, कृषी प्रक्रिया व पुरक व्यवसाय आधारीत चर्चासत्रांचे आयोजन, उत्पादक ते ग्राहक थेट विक्री करणे, धान्य महोत्सवाचे आयोजन, विक्रेता खरेदीदार संमेलनाचे आयोजन, जिल्ह्यातील पुरस्कार
प्राप्त तसेच उल्लेखनीय काम केलेल्या शेतक-यांचा सन्मान करणे.
350 च्या वर स्टॉल: दि.3 ते 7 जानेवारी या कालावधीत आयोजित होणा-या जिल्हा
कृषी महोत्सवामध्ये प्रदर्शनासाठी 350 च्या वर स्टॉलची उभारणी
करण्याचे नियेाजन आहे. यात शासकीय योजनांची माहिती व तंत्रज्ञान, कृषी विद्यापीठ तंत्रज्ञान, कृषी विज्ञान केंद्र, कृषी महाविद्यालय,
मत्स्यव्यवसाय तंत्रज्ञान, बियाणे / निविष्ठा तंत्रज्ञान इत्यादी, कृषी व सिंचन तंत्रज्ञान, बँकिंग सेक्टर, मायक्रो स्मॉल ॲन्ड मिडीयम एंटरप्राईझेस (एम.एस.एम.ई), कृषी यांत्रिकीकरण,
अवजारे, उपकरणे, धान्य, फळे व भाजीपाला,
पौष्टिक तृणधान्य, शेतकरी उत्पादक कंपनी,
उमेद संलग्नित महिला गट व
इतर, माविम संलग्नित महिला गट व इतर नाबार्ड
संलग्नित उपक्रम,
फूडस्टॉल व
पशुप्रदर्शनीकरीता विविध स्टॉलची उभारणी होणार आहे.
०००००००
No comments:
Post a Comment