Search This Blog

Wednesday 20 November 2019

सैनिकी स्कूल येथे स्थानिक प्रशासकीय मंडळाची प्रथम बैठक


चंद्रपूर, दि. 20 नोव्हेंबर : देशातील 29 वी सैनिकी शाळा चंद्रपूर जिल्ह्यात सुरू करण्यात आली असून या शाळेच्या स्थानिक प्रशासकीय मंडळाची प्रथम बैठक दिनांक 21 नोव्हेंबर 2019 रोजी आयोजित करण्यात आली आहे. या बैठकीला प्रामुख्याने एअर मार्शल आर. के. एस. शेरा, एअर वाईस मार्शल बी. मानिकंटन, खासदार सुरेश धानोरकर, जिल्हाधिकारी डॉ. कुणाल खेमनार, अधीक्षक अभियंता सुषमा साखरवाडे, शिक्षणाधिकारी संजय डोर्लीकर व इतर सदस्य अधिकारी प्रामुख्याने उपस्थित राहणार आहेत, अशी माहिती सैनिकी शाळेचे प्राचार्य स्क्वार्डन लीडर नरेश कुमार यांनी दिली आहे.
चंद्रपूर जिल्ह्यातील  विसापूर येथे देशातील 29 वी सैनिकी शाळा स्थापन करण्यात आली असून या शाळेमध्ये एकूण 180 विद्यार्थ्यांना यावर्षी प्रथमच प्रवेश देण्यात आलेला आहे. या शाळेमध्ये विद्यार्थ्यांना उत्कृष्ट शैक्षणिक सोयीसुविधा उपलब्ध करुन देण्यात आल्या असून सैनिकी शाळेची भव्य दिव्य वास्तू व परिसर डोळ्याचे पाळणे फिटणारा आहे. या सैनिकी शाळेच्या प्रशासनिक मंडळाची प्रथम बैठक दिनांक 21 नोव्हेंबर 2019 या दिवशी पार पाडण्यात येणार असून या बैठकीला प्रमुख्याने एअरमार्शल आर. के. एस. शेरा प्रामुख्याने उपस्थित राहणार आहेत. यावेळी ते विद्यार्थी तसेच सैनिकी शाळेतील अधिकारी व कर्मचाऱ्यांशी चर्चा करणार आहेत. तसेच स्थानिक प्रशासकीय मंडळाच्या बैठकीला उपस्थित राहणार आहे. यादरम्यान ते स्थानिक प्रशासकीय मंडळांच्या सदस्यासोबत शाळेच्या शैक्षणिक विकासासंदर्भात चर्चा करणार आहेत. सोबतच संपूर्ण शाळेचा फेरफटका मारून शाळेच्या बांधकामाविषयीचा आढावा घेणार आहेत.
00000

No comments:

Post a Comment