Search This Blog

Saturday 30 November 2019

सैनिकी शाळेमध्ये मुलींना प्रथमच प्रवेश 6 डिसेंबरपूर्वी ऑनलाईन नोंदणीचे आवाहन


चंद्रपूर, दि. 30 नोव्हेंबर: चंद्रपूर जिल्ह्यामध्ये नव्याने उभारण्यात आलेल्या सैनिकी शाळा चंद्रपूर येथे मुलींना वर्ग सहावी करिता प्रवेश देण्यात येणार असून त्याकरिता चंद्रपूर जिल्ह्यातील जास्तीत जास्त मुलींनी 6 डिसेंबर 2019 पर्यंत ऑनलाईन नोंदणी करावी असे आवाहन प्राचार्य स्क्वार्डन लीडर नरेशकुमार यांनी केले आहे. केंद्र सरकारने मुलींसाठी प्रथमच सैनिकी शाळेत प्रवेश सुरू केला आहे. पश्चिम दक्षिण भारतात चंद्रपूरसैनिकी शाळेपासून हि सुरुवात होत आहे.
शैक्षणिक वर्ष 2020 करिता मुलींना सैनिकी शाळेचे शिक्षण मिळवण्याची दारे खुली झाली असून चंद्रपूर जिल्ह्यात नव्यानेच उभारण्यात आलेल्या सैनिकी शाळेमध्ये मुलींना प्रवेश देण्यात येणार आहे. या शाळेत प्रवेश घेण्याकरिता प्रवेश परीक्षा घेण्यात येणार असून त्याची ऑनलाईन नोंदणी करावी लागणार आहे. 26 नोव्हेंबर 2019 पासून ऑनलाईन नोंदणी सुरू झाली असून मुलींना वर्ग 6 वी करिता प्रवेश घेण्याकरिता साठी 6 डिसेंबर 2019 पर्यंत ऑनलाइन नोंदणी करता येणार आहे. तरी जिल्ह्यातील जास्तीत जास्त मुलींनी सैनिकी शाळेमध्ये प्रवेश घेण्याकरिता ऑनलाईन नोंदणी करावी, असे सैनिकी शाळेमार्फत आव्हान करण्यात आले आहे.
00000

No comments:

Post a Comment