Search This Blog

Sunday 25 April 2021

जिल्हा स्त्री रुग्णालयात 131 कोविड बेड उपलब्ध


 

जिल्हा स्त्री रुग्णालयात 131 कोविड बेड उपलब्ध

Ø  जिल्हाधिकारी अजय गुल्हाने यांनी केली पाहणी

Ø  रुग्णलयातील इतर विभागाचे स्थलांतर करून अधिक बेड उपलब्ध करणार

चंद्रपूर दि.25, जिल्हा स्त्री रुग्णालयात कोरोना रूग्णांसाठी काल नव्याने 44 बेड कार्यान्वित करण्यात आले असून उद्या अधिक 11 बेड सुरू करण्यात येत असल्याने आता तेथे एकूण 131 बेड उपलब्ध झाले आहेत. यात 45 बेड आय.सी.यु. चे तर 10 जनरल बेड असून उर्वरित सर्व 76 ऑक्सीजन बेड आहेत.  याशिवाय लवकरच येथे 200 नवीन बेड कार्यान्वित करण्यात येणार असून त्यातील 100 बेड येत्या आठवडयाभरातच उपलब्ध होणार आहेत. 

जिल्हाधिकारी अजय गुल्हाने व मुख्य कार्यकारी अधिकारी राहुल कर्डिले यांनी काल जिल्हा स्त्री रुग्णालयात भेट देवून पाहणी केली. यावेळी त्यांनी तेथील सी-विंगमधील ॲनाटॉमी, बायोकेमेस्ट्री, पिएसएम, पॅथॉलॉजी, फिजीओलॉजी यासह इतर हे प्रशासकीय विभाग तातडीने दुसऱ्या इमारतीत स्थलांतरीत करून कोविड रूग्णांसाठी जागा उपलब्ध करण्याचे निर्देश दिले. या रिक्त होणाऱ्या जागेत 200 ऑक्सीजन बेड कार्यान्वित करण्यात येणार आहेत. या ठिकाणी 20 किलोलीटरची लिक्वीड ऑक्सीजन टँक देखील पुर्ण क्षमतेने सुरू करण्यात आली आहे. स्त्री रूग्णालयात कोविड बेड उपलब्ध करण्याचे काम जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी राहुल कर्डिले यांच्या मार्गदर्शनात करण्यात येत आहे.

जिल्हाधिकारी अजय गुल्हाने यांनी विविध विभागात भेट देत उपलब्ध आरोग्य सोयी-सुविधांची पाहणी केली. तसेच कोविड वार्डला भेट देऊन उपलब्ध औषधसाठा, सेवा देणारे डॉक्टर व आरोग्य कर्मचारी यांच्या उपस्थितीची माहिती जाणून घेतली.

            यावेळी अपर जिल्हाधिकारी विद्युत वरखेडकर, सहाय्यक जिल्हाधिकारी रोहन घुगे, रूग्णालयाचे अधिष्ठता डॉ. अरूण हुमणे, जिल्हा शल्य चिकित्सक डॉ. निवृत्ती राठोड, डॉ. बंडू रामटेके हे उपस्थित होते.

0000000

No comments:

Post a Comment