Search This Blog

Monday, 19 April 2021

पालकमंत्री ना. विजय वडेट्टीवार चंद्रपूर जिल्ह्याच्या दौऱ्यावर


 

पालकमंत्री ना. विजय वडेट्टीवार चंद्रपूर जिल्ह्याच्या दौऱ्यावर

कोरोना विषयक घेणार आढावा

चंद्रपूर दि. 19 एप्रिल: राज्याचे आपत्ती व्यवस्थापन, मदत व पुनर्वसन, इतर मागास बहुजन कल्याणमंत्री तथा चंद्रपूर जिल्ह्याचे पालकमंत्री ना. विजय वडेट्टीवार हे दिनांक 20 एप्रिल 2021 रोजी चंद्रपूर जिल्ह्याच्या दौऱ्यावर येत असून त्यांचा दौरा कार्यक्रम पुढीलप्रमाणे आहे.

 मंगळवार दि. 20 एप्रिल  2021 रोजी  सकाळी 8:00 वाजता कमलाई निवास, रामदास पेठ, नागपूर येथून चंद्रपूर कडे प्रयाण करतील. सकाळी 10.30 वाजता शासकीय विश्रामगृह, चंद्रपूर येथे आगमन व राखीव. सकाळी 10.40 वाजता कोविड-19 संदर्भात संबंधित अधिकार्‍यांसमवेत जिल्हाधिकारी कार्यालयातील वीस कलमी  सभागृहात आढावा बैठक घेतील. दुपारी 12:00 वाजता कोविड-19 संदर्भात करावयाची उपाययोजना व नियोजनाकरिता वेळ राखीव. रात्री 07:30 वाजता हिराई विश्रामगृह, ऊर्जानगर, चंद्रपूर येथे आगमन व मुक्काम राहतील.

बुधवार दि. 21 एप्रिल 2021 रोजी सकाळी 8:30 वाजता चंद्रपूर येथून सिदेंवाहीकडे प्रयाण करतील. सकाळी 10:00 वाजता शासकीय विश्रामगृह, सिदेंवाही, येथे आगमन व राखीव. सकाळी 10:10 वाजता कोविड-19 संदर्भात संबंधित अधिकार्‍यांसमवेत तहसील कार्यालय, सिदेंवाही येथे आढावा बैठक घेतील. दुपारी 1:30 ते 2:00 वाजेपर्यंत राखीव वेळ राहील. दुपारी 2:00 वाजता सिंदेवाही येथून ब्रह्मपुरीकडे प्रयाण करतील. दुपारी 3:00 वाजता शासकीय विश्रामगृह, ब्रह्मपुरी येथे आगमन व राखीव. दुपारी 3:10 वाजता कोविड-19 संदर्भात संबंधित अधिकार्‍यांसमवेत शासकीय विश्रामगृह, ब्रह्मपुरी येथे आढावा बैठक घेतील. सायंकाळी 7:00 वाजता ब्रह्मपुरी येथून नागपूरकडे प्रयाण करतील. रात्री 9:00 वाजता कमलाई निवासस्थान,रामदासपेठ, नागपूर येथे आगमन व मुक्काम राहतील.

0000000

No comments:

Post a Comment