Search This Blog

Friday, 30 April 2021

'ब्रेक दी चेन' अंतर्गत निर्बंधास 15 मे पर्यंत मुदतवाढ

 

'ब्रेक दी चेन' अंतर्गत निर्बंधास 15 मे पर्यंत मुदतवाढ

चंद्रपूर दि. 30 एप्रिल : कोरोना विषाणूच्या वाढत्या पार्श्वभूमीवर राज्य शासनाच्या सूचनेनुसार  'ब्रेक दि चेन' अंतर्गत जिल्ह्यात लागू करण्यात आलेले निर्बंध व सूचनांना जिल्हाधिकारी अजय गुल्हाने यांनी चंद्रपूर जिल्ह्याच्या कार्यक्षेत्रात दि.1 मे 2021 रोजीचे सकाळी 7:00 वाजेपासून ते दि. 15 मे 2021 रोजीचे सकाळी 7:00 वाजेपर्यंत मुदतवाढ देण्यात येत असल्याचे आदेश निर्गमित केले आहेत.

 सर्व संबंधित प्रशासकीय विभाग प्रमुख यांनी उपरोक्त आदेशाची काटेकोरपणे अंमलबजावणी करावी. सदर आदेशाची कोणतीही व्यक्ती, संस्था किंवा संघटना यांनी अंमलबजावणी करण्यास टाळाटाळ केल्यास अथवा विरोध दर्शविल्यास संबंधितांविरुद्ध आपत्ती व्यवस्थापन कायदा, भारतीय दंड संहिता तसेच साथरोग कायदा  यातील कलमान्वये कायदेशीर कारवाई करण्यात येईल, असेही आदेशात नमूद करण्यात आले आहे.

0000000

No comments:

Post a Comment