Search This Blog

Friday, 16 April 2021

मका खरेदी करनेसाठी शेतकऱ्यांची नोंदणी सुरू

 मका खरेदी करनेसाठी शेतकऱ्यांची नोंदणी सुरू

चंद्रपूर, दि. 16 एप्रिल : आधारभुत दराने हंगाम 2020-21 मध्ये मका खरेदी करण्यासाठी शेतकऱ्याची नोंदणी 1 एप्रिल ते 30 एप्रिल 2021 पर्यंत करण्याबाबत महाराष्ट्र शासनाने मान्यता दिलेली आहे. कोरपणा तालुका सह. खेरदी विक्री संस्था पोंभुर्णा (बोर्डा) व गोंडपिपरी तसेच सेवा सह. संस्था पाथरी, आणि कृषि उत्पन्न बाजार समिती मुल येथे खेरेदी केंद्र सूरू आहेत. तसेच जिल्ह्यातील ज्या तालुक्यात खेरदी केंद्र सुरू नाही, अशा तालुक्यातील शेतकऱ्यांनी आपल्या लगतच्या केंद्रावर जावून मका खरेदीसाठी नोंदणी करावी.

शेतकऱ्यानी नोंदणी करणेसाठी आपले आधार कार्ड, वोटींग कार्ड, शेतीचा सातबारा, बँक खाते पासबुक इत्यादी संपूर्ण माहितीसह खरेदी केंद्रावर जावून नोंदणी करावी. असे आवाहन अनिल गोगीरवार, जिल्हा मार्केटिंग अधिकारी यांनी केले आहे.

0000000


No comments:

Post a Comment