Search This Blog

Tuesday 6 April 2021

बोटाच्या टोकावर उपलब्ध सेवेचा लाभ घ्यावा

 

बोटाच्या टोकावर उपलब्ध सेवेचा लाभ घ्यावा

‘चंद्रपूर ऑनलाईन’ ॲप चे उद्घाटनप्रसंगी पालकमंत्री विजय वडेट्टीवार

चंद्रपूर दि. 6 एप्रिल : जिल्ह्यात कोरोना प्रादुर्भावामुळे सामाजिक अंतर राखणे महत्वपुर्ण झाले आहे अशातच जिल्हा प्रशासनातर्फे तयार करण्यात आलेल्या चंद्रपूर ऑनलाईन ॲप (chandrapur online App) मुळे नागरिकांना घरबसल्या बोटाच्या टोकावर महत्त्वपूर्ण प्रशासकीय माहिती व सेवा उपलब्ध होत आहे. त्यामुळे त्यांचा वेळ, श्रम व पैशाची बचत होईल तरी चंद्रपूरकरांनी या मोबाईल तंत्रज्ञान सुलभ सेवेचा लाभ घ्यावा, असे आवाहन पालकमंत्री विजय वडेट्टीवार यांनी या ॲपचे उद्घाटन प्रसंगी केले.

राष्ट्रीय सूचना विज्ञान केंद्र चंद्रपूर यांनी जिल्हाधिकारी अजय गुल्हाने यांच्या मार्गदर्शनाखाली अँड्रॉइड स्टुडिओ व ओपन सोर्स फ्लटर फ्रेमवर्क वापरून विकसित केलेल्या अप्लीकेशनचे उद्घाटन पालकमंत्री वडेट्टीवार यांचे हस्ते करण्यात आले. याप्रसंगी जिल्हाधिकारी अजय गुल्हाने, जिल्हा परिषदेचे मुख्‍य कार्यकारी अधिकारी राहुल कर्डिले, जिल्हा सूचना विज्ञान अधिकारी सतिष खडसे, ओमप्रकाश आर्य प्रामुख्याने उपस्थित होते.

हे ॲप प्लेस्टोअरवर उपलब्ध असून या ॲप मध्ये कोविड-19 बाबत ची सर्व अध्यावत माहिती, प्रशासनाचे आदेश, जिल्हा माहिती कार्यालयाच्या ब्लॉगवरील बातम्या, प्रशासनाचे जनतेकरिता वेळोवेळी केलेली आवाहनेमहत्वाचे मदत कक्ष क्रमांक, आपत्कालीन मार्गदर्शक सूचना, आरोग्य विभागाच्या महत्वाच्या सुविधा, डॉक्टरांची उपलब्धता, सहाय्य आणि हेल्पलाईन क्रमांकइतर महत्वाची माहितीऑनलाईन ७/१२ सुविधा व ८अ, निवडणूक विभागाची मतदार यादी मध्ये नाव शोधण्याची सुविधा, पुरवठा विभागाची रेशन कार्ड शोधण्याची सुविधा, ताडोबा सफर ऑनलाईन बुकिंग, तसेच इतर जिल्हा स्तरीय महत्वाचे कार्यालयांच्या वेबसाईट च्या लिंक या ॲप मध्ये दिल्या असून यात पुढे अधिक सेवांचा समावेश करण्यात येणार असल्याचे जिल्हा सूचना विज्ञान अधिकारी सतिष खडसे यांनी यावेळी सांगितले. 

000

No comments:

Post a Comment