Search This Blog

Sunday 4 April 2021

वरिष्ठ अधिकारी घडविण्यासाठी ई-लायब्ररीचा उपयोग व्हावा




 

वरिष्ठ अधिकारी घडविण्यासाठी ई-लायब्ररीचा उपयोग व्हावा

-         पालकमंत्री विजय वडेट्टीवार

चंद्रपूर, दि. 04 एप्रिल : ब्रम्हपुरी येथील युवावर्गातून भविष्यात आय.ए.एस. व आय.पी.एस. सारखे वरिष्ठ अधिकारी घडावे म्हणून त्यांचेकरिता स्पर्धा परीक्षेच्या अभ्यासासाठी सर्व सुविधायुक्त अद्यावत व वातानुकूलित -ग्रंथालय बांधण्यात येत आहे, असे प्रतिपादन पालकमंत्री विजय वडेट्टीवार यांनी आज केले. ब्रम्हपुरी येथील ई-लायब्ररी बांधकामाचे भूमिपूजन आज पालकमंत्री विजय वडेट्टीवार यांचे हस्ते करण्यात आले. त्यावेळी ते बोलत होते.

            या ई-लायब्ररीचे बांधकामाची अंदाजीत किंमत 7 कोटी 56 लाख 44 हजार रुपये असून पुढील 8 ते 12 महिन्याच्या आत ही सुसज्ज इ-लायब्ररीची इमारत पुर्ण होईल असे त्यांनी सांगितले. जिवनात यशस्वी होण्यासाठी सातत्यपुर्ण कष्ट व सकारात्मक विचारप्रणाली आवश्यक असून शिक्षणाच्या बळावर देशासाठी व समाजासाठी मोठे कार्य येथील विद्यार्थ्यांच्या हातून घडावे, अशी अपेक्षाही पालकमंत्री यांनी यावेळी व्यक्त केली. पालकमंत्री यांनी याप्रसंगी तहसिल प्रशासकीय इमारतीच्या बांधकामाचीही पाहणी केली व इमारतीचे प्रवेशद्वार मोठे करण्याबाबत तसेच लिफ्ट व इतर बाबींमध्ये आवश्यक सुधारणा करण्याबाबत सांगितले.

            यावेळी नगरपालीका, महसुल, सार्वजनिक बांधकाम व नगरवाचनालयाचे अधिकारी व नागरिक उपस्थित होते.

0000


2 comments: