Search This Blog

Sunday, 7 May 2023

रामपूरच्‍या विकासासाठी पूर्ण शक्‍तीनिशी तुमच्‍या पाठिशी उभा राहील – पालकमंत्री सुधीर मुनगंटीवार

 






रामपूरच्‍या विकासासाठी पूर्ण शक्‍तीनिशी तुमच्‍या पाठिशी उभा राहील  पालकमंत्री सुधीर मुनगंटीवार

Ø रामपूर (ता. राजुरा) येथील ग्राम पंचायत स्‍थापना दिवसाला प्रमुख उपस्थिती

चंद्रपूरदि.7 : गेल्‍या अनेक वर्षांपासून रामपूर (ता. राजुरा) गाव अनेक सोयीसुविधांपासून व विकासापासून दूर राहीले आहेपरंतु आता मी पूर्ण शक्‍तीनिशी रामपूर वासियांच्‍या पाठिशी ठामपणे उभा राहीलअसे प्रतिपादन राज्‍याचे वनेसांस्‍कृतिक कार्यमत्‍स्‍यव्‍यवसाय मंत्री तथा चंद्रपूर जिल्‍हयाचे पालकमंत्री सुधीर मुनगंटीवार यांनी केले.

रामपूर येथील ग्राम पंचायत स्‍थापना दिवस व पाणी पुरवठा जलशुध्‍दीकरण केंद्राच्‍या भूमीपूजन तसेच विविध विकासकामांच्‍या लोकार्पण सोहळ्याप्रसंगी ते बोलत होते. याप्रसंगी  देवराव भोंगळेमाजी आमदार अॅड. वामनराव चटपसुदर्शन निमकरअॅड. संजय धोटेरामपूरच्‍या सरपंच वंदना गौरकारउपसरपंच सुनिता उरकुडेसामाजिक कार्यकर्ते नामदेव गौरकार,  नामदेव डाहूलेआशिष देवतळेमजिप्राचे कार्यकारी अभियंता विनोद उध्‍दरवारश्रीकृष्‍ण गोरेरामपूरचे ग्रामविकास अधिकारी श्री. विरूटकर यांची प्रामुख्‍याने उपस्थिती होती. यावेळी जलजीवन मिशन अंतर्गत रामपूर येथे १३ कोटी ६७ लाख रूपये किंमतीची पाणी पुरवठा योजना व पाण्‍याची टाकी तसेच जलशुध्‍दीकरण केंद्राचे भुमीपूजन संपन्‍न झाले. त्‍याचप्रमाणे गावात केलेल्‍या विविध कामांचे लोकार्पण तथा ग्राम पंचायतच्‍या विकासाकरिता मदत करणा-या आजी-माजी लोकप्रतिनिधींचा यावेळी सत्‍कार करण्‍यात आला.

यावेळी बोलताना ना. मुनगंटीवार म्‍हणालेआज बुध्‍द पोर्णिमा आहे. आजच्‍या दिवशी आकाशात सगळयात जास्‍त उजेड असतोअश्‍यावेळी रामपूरचा वर्धापन दिन आहे हा अतिशय उत्‍तम योग आहे. सरपंच बोलताना आपल्‍या भाषणात म्‍हणाल्‍या कीरामपूरला कोणी मंत्री पहिल्‍यांदा आले आहेतयाचा मला अतिशय आनंद आहे. याठिकाणी माजी आमदार सुदर्शन निमकर यांनी मागणी केल्‍यानुसार महिलांच्‍या बचतगटासाठी एक सभागृह माविमंतर्फे मंजूर करण्‍यात आले होतेपरंतु तांत्रीक अडचणींमुळे हे काम पुढे जावू शकले नाही. आज मी आपणा सर्वांना हे सभागृह जिल्‍हा विकास निधीतील नाविन्‍यपूर्ण योजनेतुन मंजूर करून लवकरात लवकर तयार करण्‍याची घोषणा करतो. तसेच रामपूर गावातील अंतर्गत रस्‍त्‍यासाठी सरपंचांनी मागीतल्‍यानुसार २० लाख रूपये मंजूर करण्‍याची सुध्‍दा घोषणा करतो. त्‍याचप्रमाणे राजुरा-आदिलाबाद या राष्‍ट्रीय महामार्गावरील रामपूरजवळील भवानी नाल्‍यामध्‍ये पुराचे पाणी निघुन जाण्‍यासाठी एका पुलाची मागणी झाली आहे. हा पुल सुध्‍दा लवकरात लवकर पूर्ण करण्‍याचे निर्देश मी अधिका-यांना देणार आहे. ज्‍यामुळे महाविद्यालयामध्‍ये पावसाळयात जाताना होणारा त्रास वाचेल.

२०१४ ते २०१९ या काळात संपूर्ण महाराष्‍ट्रात व चंद्रपूर जिल्‍हयातही अनेक विकासाची कामे झालीमध्यंतरी सरकार बदलल्यामुळे मुर्ती विमानतळराष्‍ट्रीय महामार्ग या व इतर अनेक कामांमध्‍ये खोळंबा निर्माण झाला. आता आमचे सरकार अतिशय वेगाने काम करून सर्व प्रकल्‍प अतिशय जलदगतीने पूर्ण करण्‍याचा संकल्‍प आम्‍ही केला आहे. रामपूर ही ग्राम पंचायत गेल्‍या काही वर्षात झपाटयाने वाढली आहे. त्‍यामुळे या गावाचा समावेश राजुरा नगर परिषद हद्दीत करावाअशी मागणी आली आहे. याचा अभ्‍यास करून निर्णय घेण्‍यात येईल.

याप्रसंगी माजी आमदार वामनराव चटपसंजय धोटेसुदर्शन निमकरदेवराव भोंगळे या सर्वांच्‍या या ग्राम पंचायतीला वेळोवेळी मदत व मार्गदर्शन केल्‍याबद्दल त्‍यांचा ग्राम पंचायतीतर्फे सत्‍कार करण्‍यात आला. यावेळी या सर्वांचे यथोचित मार्गदर्शन सुध्‍दा झाले. याप्रसंगी ग्राम पंचायत तथा अनेक सामाजिक संघटनातर्फे ना. मुनगंटीवार यांचा सत्‍कार करण्‍यात आला.

00000000

No comments:

Post a Comment