Search This Blog

Tuesday, 2 May 2023

22 ते 31 मे कालावधीत जिल्हास्तरावर क्रीडा शिक्षकांचे प्रशिक्षण शिबीर

 


22 ते 31 मे कालावधीत जिल्हास्तरावर क्रीडा शिक्षकांचे प्रशिक्षण शिबी

Ø तालुका क्रीडा संकुल बल्लारपूर,(विसापूर) येथे आयोजन

चंद्रपूर, दि. 02 क्रीडा व युवक सेवा संचालनालय, पुणे अंतर्गत जिल्हा क्रीडा अधिकारी कार्यालय, चंद्रपूरच्या वतीने जिल्हास्तरावर 100 उच्च माध्यमिक, माध्यमिक व प्राथमिक क्रीडा शिक्षकांचे 10 दिवसीय प्रशिक्षण शिबिर आयोजित करण्यात आले आहे. सदर प्रशिक्षण शिबिर 22 ते 31 मे 2023 या कालावधीत तालुका क्रीडा संकुल बल्लारपूर, (विसापूर) येथे पार पडणार आहे.

 खेळामधील बदललेले आधुनिक तंत्रज्ञान, प्रशिक्षणाच्या पद्धती, खेळांमधील कौशल्ये, नवीन खेळांची ओळख व खेळांची शास्त्रोक्त माहिती वेळोवेळी शिक्षकांना करून देणे आवश्यक आहे. तालुका, जिल्हा, विभाग व राज्यस्तरावर क्रीडा शिक्षकांच्या ज्ञानामध्ये भर पडावी व वेळोवेळी क्रीडा क्षेत्रामध्ये होणारे बदल अवगत करण्यासाठी तसेच जिल्ह्यातील शालेय शिक्षण विद्यार्थ्यांना योग्य क्रीडा प्रशिक्षण मिळण्यासाठी क्रीडा शिक्षकांचे अद्यावत प्रशिक्षण असणे आवश्यक आहे.

या प्रशिक्षण शिबिरामध्ये विविध खेळाचे तज्ञ, क्रीडा प्रशिक्षक किंवा संघटनेचे तांत्रिक पदाधिकारी, आहारतज्ञ, शरीर विज्ञानतज्ञ, क्रीडा मानसोपचार तज्ञ यांचे मार्गदर्शन शिबिरामध्ये सहभागी झालेल्या क्रीडा शिक्षकांना लाभणार आहे. यामध्ये प्रामुख्याने खो-खो, धनुर्विद्या, बास्केटबॉल, कबड्डी, व्हॉलीबॉल, मैदानी, बॅडमिंटन, हँडबॉल, जिम्नॅस्टिक, टेबल टेनिस, कुस्ती, फुटबॉल, बॉक्सिंग, शूटिंग, लॉनटेनिस, हॉकी, जलतरण व सायकलींग आदी खेळांचे क्रीडा मार्गदर्शकाद्वारा मार्गदर्शन करण्यात येणार आहे.

या प्रशिक्षण शिबिरामध्ये क्रीडा शिक्षकांना निवास, भोजन, तज्ञांचे मार्गदर्शन, ट्रॅकसूट, टी-शर्ट, शॉर्ट व शासन निर्णयान्वये प्रवास भत्ता देण्यात येणार आहे. प्रशिक्षण शिबिराच्या अधिक माहितीकरीता क्रीडा अधिकारी श्री. वडते 9975591175 यांच्याशी संपर्क साधावा, असे जिल्हा क्रीडा अधिकारी अविनाश पुंड यांनी कळविले आहे.

००००००

No comments:

Post a Comment