Search This Blog

Monday 15 May 2023

परिवहन विभागतर्फे अनुज्ञप्ती शिबीराचे आयोजन


परिवहन विभागतर्फे अनुज्ञप्ती शिबीराचे आयोजन

Ø वरोरा, चिमुर, ब्रम्हपुरी, गडचांदूर व गोंडपिंपरी तालुक्यांचा समावेश

चंद्रपूर, दि. 15: उपप्रादेशिक परिवहन कार्यालयातर्फे शिकाऊ अनुज्ञप्ती व पक्के अनुज्ञप्ती इत्यादी कामांकरिता वरोरा, चिमुर, ब्रम्हपुरी, गडचांदूर व गोंडपिंपरी या तालुक्याच्या ठिकाणी एक दिवसीय शिबिराचे आयोजन करण्यात आले आहे. यासाठी 15 तारखेपासून ऑनलाइन नोंदणी सुरू करण्यात आली आहे.

परिवहन विभागाच्या कार्यक्रमानुसार दिनांक 19 मे 2023 रोजी आनंदनिकेतन महाविद्यालय, आनंदवन वरोरा, 22 मे रोजी एन.एच.महाविद्यालय, ब्रम्हपुरी, 23 मे रोजी शरद पवार महाविद्यालय, गडचांदुर, 24 मे रोजी शासकीय विश्रामगृह चिमूर व 25 मे रोजी शासकीय विश्रामगृह गोंडपिपरी, या ठिकाणी शिबिराचे आयोजन करण्यात आले आहे.

तरी जिल्ह्यातील नागरिकांनी या संधीचा लाभ घ्यावा, असे आवाहन उपप्रादेशिक परिवहन अधिकारी किरण मोरे यांनी केले आहे. 

०००००

No comments:

Post a Comment