गाळमुक्त धरण-गाळयुक्त शिवार मोहिमेची अंमलबजावणी 15 दिवसात पुर्ण करा
जिल्हाधिकारी विनय गौडा यांचे यंत्रणेला निर्देश
चंद्रपूर, दि. 17: मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी आखुन दिलेल्या कार्यक्रमानुसार जिल्ह्यात गाळमुक्त धरण आणि गाळयुक्त शिवार मोहिमेंची अंमलबजावणी पुढील 15 दिवसात पूर्ण करण्याचे निर्देश जिल्हाधिकारी विनय गौडा यांनी यंत्रणेला आज दिले.
अलनिनोच्या पार्श्वभुमीवर जिल्ह्यात पाण्याची कमतरता भासू नये यासाठी जिल्हा परिषद, जलसंपदा विभाग, वनविभाग यांच्याकडील तलाव, धरणे व इतर जलसाठ्यातील गाळ पावसाळ्यापुर्वी काढून शेतकऱ्यांना उपलब्ध करून देण्यात यावा. शेतकऱ्यानी सदर गाळ घेवून जाण्यासाठी व ग्रामीण भागातील जलसाठ्यांचे पुनरूज्जीवन करण्यासाठी जनजागृती करावी. जलसाठ्यातील गाळ काढल्यामुळे पाणीसाठ्यात वाढ होऊन सिंचनासाठी त्याचा फायदा होईल. तसेच शेतकऱ्यांच्या शेतात सुपीक गाळ उपलब्ध झाल्यामुळे शेती उत्पादनात वाढ होईल, असा दुहेरी फायदा शेतकऱ्यांना होणार असल्याचे जिल्हाधिकारी गौडा यांनी सांगितले.
बैठकीला मुख्य कार्यकारी अधिकारी विवेक जॉन्सन, उपवनसंरक्षक श्वेता बोड्डू, विभागीय वन अधिकारी प्रशांत खाडे, उपजिल्हाधिकारी (रोहयो) पल्लवी घाटगे, मनपा उपायुक्त अशोक गराटे,कृषी विकास अधिकारी लक्ष्मीनारायण दोडके, जिल्हा जलसंधारण अधिकारी आर.आर.बहुरिया, जलसंधारण अधिकारी पवन देशट्टीवार व सारंग धकाते तसेच संबंधीत अधिकारी उपस्थित होते.
0000
No comments:
Post a Comment