Search This Blog

Thursday 4 May 2023

अनुसूचित जाती व नवबौद्ध मुला-मुलींच्या शासकीय निवासी शाळा प्रवेशासाठी अर्ज आमंत्रित

 


अनुसूचित जाती व नवबौद्ध मुला-मुलींच्या शासकीय निवासी शाळा प्रवेशासाठी अर्ज आमंत्रित

चंद्रपूर, दि. 4: सामाजिक न्याय व विशेष सहाय्य विभागातर्फे जिल्ह्यात अनुसूचित जातीच्या मुला-मुलींकरीता दोन शासकीय निवासी शाळा सुरू करण्यात आल्या आहेत. यापैकी भिवकुंड, विसापूर ता. बल्लारपूर येथे जून 2012 पासून वर्ग 6 ते 10 सेमी इंग्रजी माध्यमाची मुलांची निवासी शाळा तर ता. चिमूर येथे वर्ग 6 ते 10 सेमी इंग्रजी माध्यमाची मुलींची निवासी शाळा सुरू करण्यात आली आहे. या शाळेमध्ये वस्तीगृहाची सोय आहे. वस्तीगृहातील विद्यार्थ्यांना सकाळचा नाश्ता, दोन वेळचे जेवण, निवासी व्यवस्था तसेच इतर शैक्षणिक सोयीसुविधा मोफत पुरविण्यात येतात. प्रवेशाकरिता अर्जाचे वाटप दि. 31 मे 2023 पर्यंत करण्यात येणार असून अर्जस्वीकृती 10 जून पर्यंत सुरू राहील.

तरी, अनुसूचित जातीच्या विद्यार्थी-विद्यार्थिनींनी इयत्ता 6 वी व इयत्ता 7 ते 10 वीच्या रिक्त जागेवर प्रवेशासाठी संबंधित शाळेत संपूर्ण तपशिल व कागदपत्रांसह अर्ज सादर करावा. विद्यार्थ्यांना गुणवत्तेनुसार प्रवेश देण्यात येईल, असे समाज कल्याण विभागाचे सहाय्यक आयुक्त अमोल यावलीकर यांनी कळविले आहे.

00000

No comments:

Post a Comment